नागोराव सा. येवतीकर

Saturday, 14 February 2026

दिनविशेष माहिती - 16 फेब्रुवारी ( Thorale Madhavrao Peshave )

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 
कसे आहात ? मजेत ना !
 
मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो.

आजच्या कार्यक्रमात आपण मराठा साम्राज्याचे कर्तबगार आणि दूरदर्शी नेतृत्व असलेले श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांची माहिती पाहू या.
लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐकू या ......

श्रीमंत थोरले माधवराव पेशवे 
 
श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांचा जन्म १६ फेब्रुवारी १७४५ रोजी झाला. ते नानासाहेब पेशवे यांचे पुत्र होते. पेशवे माधवराव पेशवे हे त्यांच्या उदारतेसाठी प्रसिद्ध होते. त्यांच्या वाढदिवसानिमित्त ते गरिबांना पैसे, अन्न, कपडे आणि जमीन दान करायचे. त्यांच्याकडून दान घेण्यासाठी दूरदूरून लोक येत असत. त्यांच्या दारातून कोणीही रिकाम्या हाताने परत जात नसे. प्रत्येकाला जे हवे होते ते नक्कीच मिळायचे.
१४ जानेवारी १७६१ रोजी झालेल्या पानिपतच्या तिसऱ्या युद्धानंतर मराठा साम्राज्याची स्थिती अत्यंत बिकट झाली होती. राज्याची आर्थिक परिस्थिती ढासळली होती आणि जनतेमध्ये निराशा पसरली होती. अशा कठीण वेळी, केवळ १६ वर्षांच्या वयात माधवरावांनी पेशव्यांची जबाबदारी स्वीकारली.
माधवरावांनी सर्वप्रथम प्रशासनात शिस्त आणली. त्यांनी महसूल व्यवस्था सुधारली, लष्कराची पुनर्रचना केली आणि सरदारांमध्ये एकोपा निर्माण केला. त्यांच्या पराक्रमामुळे आणि कुशल नेतृत्वामुळे मराठा साम्राज्याने पुन्हा उत्तर भारतात आपला प्रभाव निर्माण केला. १७६१ ते १७७२ पर्यंत म्हणजे अकरा वर्षे त्यांनी पेशवाई सांभाळली. या अकरा वर्षाच्या काळात त्यांनी मराठेशाहीचा सुवर्णकाळ पुन्हा आणला.
माधवराव पेशवे यांनी 'राक्षसभुवन'च्या लढाईत निजामावर विजय मिळवून मराठ्यांची ताकद दाखवून दिली. म्हैसूरच्या हैदरअलीचा वारंवार पराभव करून आपला वचक निर्माण केला.
त्यांच्या कारकिर्दीत न्याय, शिस्त आणि पारदर्शकता यांना महत्त्व होते. त्यांनी वैयक्तिक स्वार्थापेक्षा राज्यहिताला प्राधान्य दिले. ते कठोर शिस्तप्रिय होते आणि त्यांनी मराठी साम्राज्याला पुन्हा एकदा 'सर्वोच्च शक्ती' म्हणून उभे केले
थोरले माधवराव हे मराठी इतिहासातील 'छत्रपती शिवाजी महाराजांनंतरचे' सर्वात कर्तबगार प्रशासक आणि मुत्सद्दी नेते मानले जातात.
दुर्दैवाने, पुणे जिल्ह्यातील थेऊर येथे १८ नोव्हेंबर १७७२ रोजी वयाच्या अवघ्या २७ व्या वर्षी क्षयरोगाने त्यांचे निधन झाले, परंतु अल्पायुष्यात त्यांनी केलेले कार्य अजरामर आहे.
माधवराव पेशवे यांचे जीवन आपल्याला सांगते की, संकट कितीही मोठे असले तरी योग्य नेतृत्व, आत्मविश्वास आणि चिकाटी यामुळे परिस्थिती बदलता येते. चला, त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ आपण कर्तव्यनिष्ठ, शिस्तप्रिय आणि देशभक्त नागरिक बनण्याचा संकल्प करूया.


मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा. 
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या 

पहिला प्रश्न - माधवराव पेशवे हे कोणाचे पुत्र होते ?
बरोबर उत्तर आहे, माधवराव पेशवे हे नानासाहेब पेशवे यांचे पुत्र होते.

दुसरा प्रश्न - माधवराव पेशवे यांनी कोणत्या वयात पेशव्यांची जबाबदारी स्वीकारली ?
बरोबर उत्तर आहे, १६ वर्षांच्या वयात माधवराव पेशवे यांनी पेशव्यांची जबाबदारी स्वीकारली.

तिसरा प्रश्न - माधवराव पेशवे यांनी कोणत्या लढाईत निजामचा पराभव केला ?
बरोबर उत्तर आहे, राक्षसभुवनच्या लढाईत माधवराव पेशवे यांनी निजामचा पराभव केला

चौथा प्रश्न - माधवराव पेशवे यांनी किती वर्षे पेशवाई सांभाळली ?
बरोबर उत्तर आहे, अकरा वर्षे माधवराव पेशवे यांनी पेशवाई सांभाळली

आणि आता शेवटचा पाचवा प्रश्न - माधवराव पेशवे यांचे कोणत्या आजाराने निधन झाले ?
बरोबर उत्तर आहे - क्षयरोगाने माधवराव पेशवे यांचे निधन झाले.

चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. 🙏

( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )

संकलन :- नासा येवतीकर, 9423625769

दिनविशेष माहिती - 15 फेब्रुवारी ( Sant Sevalal Maharaj )

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 
कसे आहात ? मजेत ना !
 
मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमात आपण यांच्या विषयी माहिती पाहू या. 
लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐकू या ......

          संत सेवालाल महाराज
संत सेवालाल महाराज हे बंजारा समाजाचे आराध्य दैवत, संत आणि समाजसुधारक होते. सेवालाल महाराजांचा जन्म १५ फेब्रुवारी १७३९ रोजी गुत्तीबल्लारी कर्नाटक राज्यात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भिमा नाईक राठोड आणि आईचे नाव धरमळी माता असे होते. त्यांच्या आई-वडिलांनी त्यांच्यावर धार्मिक व संस्कारशील वातावरणाचा प्रभाव टाकला, ज्यामुळे पुढे त्यांनी समाजजागृतीचे कार्य केले.
त्या काळात बंजारा समाज भटक्या स्वरूपात जीवन जगत होता. समाजात अज्ञान, अंधश्रद्धा आणि काही वाईट प्रथा प्रचलित होत्या. त्यांनी समाजाला शिक्षण, स्वच्छता आणि नीतिमत्तेचा मार्ग दाखवला. त्यांनी स्त्रियांना अधिकार मिळवून देण्यासाठी व व्यसनमुक्तीसाठी कार्य केले. संत सेवालाल महाराजांनी समाजाला योग्य दिशा देण्याचे महान कार्य केले.
लहानपणापासूनच त्यांच्यात आध्यात्मिकता आणि सेवा वृत्ती दिसून येत होती. ते अत्यंत साधेपणाने जीवन जगत आणि लोकांमध्ये राहून त्यांना नैतिकतेचे धडे देत. 
ते म्हणत कसाईन गावढी मत वेचो. अर्थात खाटीकला गाय विकू नका. 
पशू प्राण्यावर प्रेम करा हा त्यांचा मुख्य संदेश होता. त्यांनी बळीप्रथा बंद करण्यासाठी प्रयत्न केले.
संत सेवालाल महाराजांनी बंजारा समाजात एकोपा आणि संघटन निर्माण करण्यावर भर दिला. त्यांनी लोकांना सत्य, प्रामाणिकपणा, अहिंसा आणि परस्पर प्रेम यांचा संदेश दिला.
त्यांनी बंजारा बोलीभाषेत भजने, लोकगीताच्या माध्यमातून समाजप्रबोधन केले. त्या काळी निरक्षर असूनही त्यांनी लोकांना ज्ञानाचा मार्ग दाखवला
त्यांच्या शिकवणुकीमुळे बंजारा समाजात नैतिक व सामाजिक जागृती झाली.
संत सेवालाल महाराजांनी ईश्वरभक्ती आणि सत्कर्म यांचा समन्वय साधला. त्यांनी लोकांना केवळ पूजा-अर्चा नव्हे तर चांगले आचरण आणि सेवाभाव यांचे महत्त्व पटवून दिले. “समाजाची सेवा हीच खरी पूजा” असा त्यांचा संदेश होता.
दरवर्षी १५ फेब्रुवारी रोजी त्यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि मध्यप्रदेश या राज्यांत मोठ्या प्रमाणावर मिरवणुका, भजन-कीर्तन आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यांच्या नावाने मंदिरे आणि स्मारके उभारण्यात आली आहेत.
संत सेवालाल महाराजांचे जीवन हे समाजसेवा, एकता आणि नैतिकतेचे प्रतीक आहे. त्यांनी बंजारा समाजाला स्वाभिमान आणि योग्य दिशा दिली. आजही त्यांचे विचार समाजाला प्रेरणा देतात. दिनांक ४ डिसेंबर १८०६ रोजी त्यांचे निधन झाले. वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे त्यांची समाधी आहे, ज्याला बंजारा समाज 'काशी' मानतात.
त्यांच्या शिकवणुकीतून आपण सेवा, सदाचार आणि बंधुभाव यांचे महत्त्व शिकायला हवं. 🙏
आज संत सेवालाल महाराज यांची जयंती त्यानिमित्ताने त्यांच्या विचारांचे स्मरण करून समाजहिताचे कार्य करण्याचा संकल्प करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल. 🙏


मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा. 
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या 

पहिला प्रश्न - संत सेवालाल महाराज यांचा जन्म कोठे झाला ?
बरोबर उत्तर आहे, गुत्तीबल्लारी कर्नाटक राज्यात संत सेवालाल महाराज यांचा जन्म झाला

दुसरा प्रश्न - संत सेवालाल महाराज यांच्या वडिलांचे नाव काय होते ?
बरोबर उत्तर आहे, भीमा नाईक राठोड असे संत सेवालाल महाराज यांच्या वडिलांचे नाव होते.

तिसरा प्रश्न - संत सेवालाल महाराज यांनी कोणत्या बोलीभाषेत भजने, लोकगीताच्या माध्यमातून समाजप्रबोधन केले ?
बरोबर उत्तर आहे, संत सेवालाल महाराज यांनी बंजारा बोलीभाषेत भजने, लोकगीताच्या माध्यमातून समाजप्रबोधन केले. 

चौथा प्रश्न - संत सेवालाल महाराज यांची समाधी कोठे आहे ?
बरोबर उत्तर आहे, वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे संत सेवालाल महाराज यांची समाधी आहे

शेवटचा पाचवा प्रश्न - पोहरादेवीला बंजारा समाज काय मानतो ?
बरोबर उत्तर आहे - पोहरादेवीला बंजारा समाज 'काशी' मानतात.

चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. 🙏

( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )

संकलन :- नासा येवतीकर, 9423625769

दिनविशेष माहिती - महाशिवरात्री ( Mahashivratri )

🌺 महाशिवरात्री
महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र व महत्त्वाचा सण आहे. हा सण भगवान शिव यांच्या आराधनेसाठी साजरा केला जातो. फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते. या दिवशी भक्त मोठ्या श्रद्धेने उपवास, पूजा व जागरण करतात.
महाशिवरात्रीचे महत्त्व
पुराणांनुसार या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह झाला. तसेच या दिवशी शिवांनी तांडव नृत्य केले, असेही मानले जाते. त्यामुळे हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. महाशिवरात्रीला शिवभक्त मंदिरात जाऊन शिवलिंगाचे दर्शन घेतात आणि "ॐ नमः शिवाय" हा मंत्र जपतात.
पूजा आणि विधी
या दिवशी भक्त उपवास करतात आणि रात्रभर जागरण करतात. शिवलिंगावर दूध, पाणी, बेलपत्र, धतूरा व फुले अर्पण केली जातात. बेलपत्र हे भगवान शिवांना अत्यंत प्रिय मानले जाते. अनेक ठिकाणी कीर्तन, भजन आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
भारतामध्ये काशी, उज्जैन, सोमनाथ इत्यादी ठिकाणी महाशिवरात्री मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. विशेषतः काशी विश्वनाथ मंदिर येथे लाखो भाविक दर्शनासाठी येतात.
उपसंहार
महाशिवरात्री हा सण भक्ती, श्रद्धा आणि संयम यांचा संदेश देतो. हा सण आपल्याला चांगले विचार, सत्य आणि सदाचार यांचे पालन करण्याची प्रेरणा देतो. भगवान शिवांच्या कृपेने सर्वांच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी लाभो, हीच प्रार्थना. 🙏

Friday, 13 February 2026

दिनविशेष माहिती - 14 फेब्रुवारी ( Sanjeevani Marathe )

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 
कसे आहात ? मजेत ना ! 
मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो..
मुलांनो तुम्हांला हे गीत आठवते का ? ( Audio) हे गीत कुणी लिहिलं आहे ? हे तुम्हांला माहित आहे काय ? 
तर हे गीत मराठीतील प्रसिद्ध कवयित्री संजीवनी मराठे यांनी लिहिलं आहे, तर आजच्या कार्यक्रमात आपण त्यांच्या विषयी अधिक माहिती जाणून घेऊ या. तयार आहात ना तुम्ही........!
लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐका......

मराठी साहित्यातील बहुआयामी कवयित्री : संजीवनी मराठे

मराठी साहित्यात अनेक प्रतिभावान कवयित्रींनी आपल्या लेखणीतून समाजमनाला स्पर्श केला आहे. त्या प्रतिभावान कवयित्रींपैकी एक म्हणजे संजीवनी मराठे. त्यांच्या काव्यातून स्त्रीमनातील कोमल भावना, निसर्गप्रेम, तसेच सामाजिक जाणीवा प्रभावीपणे व्यक्त झालेल्या दिसतात. त्यांचा जन्म १४ फेब्रुवारी १९१६ रोजी पुण्यात झाला. लहानपणापासूनच प्रतिभावान
संजीवनी रामचंद्र मराठे यांचे शिक्षण पुण्यात झाले. शाळकरी वयातच त्यांनी कविता लिहिण्यास सुरुवात केली आणि मॅट्रिकनंतर वडिलांनी त्यांच्या कवितांचा 'काव्यसंजीवनी' संग्रह प्रकाशित केला. त्यांना बा. भ. बोरकर, पद्मा गोळे आणि गजानन वाटवे यांसारख्या साहित्यिकांचा सहवास लाभला, ज्यामुळे त्यांची प्रतिभा बहरली. त्यांच्या आयुष्यातील अनुभव, निरीक्षणे आणि समाजातील बदल यांचा प्रभाव त्यांच्या कवितांवर स्पष्टपणे दिसून येतो.
संजीवनी मराठे या मुख्यतः कवयित्री म्हणून ओळखल्या जातात. त्यांच्या कवितांमध्ये स्त्रीभावविश्व, प्रेम, करुणा, निसर्ग, तसेच सामाजिक वास्तव यांचे सुंदर चित्रण आढळते. त्यांच्या रचनांमध्ये साधी, सुबोध आणि प्रभावी भाषा वापरलेली दिसते. त्यामुळे त्यांच्या कविता सर्वसामान्य वाचकांनाही सहज समजतात. त्यांच्या काही कवितांमध्ये स्त्रीच्या आत्मसन्मानाचा आणि स्वातंत्र्याचा प्रभावी स्वर उमटतो. त्यांनी स्त्रीच्या मनातील भावना अत्यंत संवेदनशीलतेने मांडल्या आहेत.
संजीवनी मराठे यांनी कविता, गीते, बालसाहित्य, अनुवाद आणि संपादन केले. 'बरं का गं आई' आणि 'हसू बाई हसू' या कवितासंग्रहांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला.
बालकवितांमध्ये निसर्ग, उत्सव, नातेसंबंध आणि देशभक्ती यांचे वैविध्य आहे; उदा. 'टाळी वाजली कड कड कड' सारख्या ओळी लहानांना भुरळ घालतात.
स्वतः गायिका असल्याने कविसंमेलनांत त्या आपल्या कविता सुरेल आवाजात गायच्या. गायनासोबत त्यांना चित्रकलादेखील आवडीचा विषय होता. 
त्यांच्या कवितांमध्ये उत्साह, सकारात्मकता आणि जीवनाचा आस्वाद सदैव असतो.
शालेय अभ्यासक्रमात अमर
'माय मराठी', 'मी पंथती' सारख्या कविता आहेत आणि आजही गायल्या जातात. संजीवनी मराठे यांचे १ एप्रिल २००० रोजी निधन झाले.
संजीवनी मराठे यांनी आपल्या काव्यलेखनातून मराठी साहित्यात मोलाची भर घातली. त्यांच्या कवितांमुळे वाचकांच्या मनात संवेदनशीलता आणि सकारात्मक विचारांची जागृती होते. मराठी कवयित्रींमध्ये त्यांचे स्थान आदराचे आहे.
आज त्यांची जयंती त्यानिमित्ताने त्यांच्या लेखणीला सादर प्रणाम 🙏


मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा. 
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या 

पहिला प्रश्न - कवयित्री संजीवनी मराठे यांचा जन्म कोठे झाला ? 
बरोबर उत्तर आहे, विद्येचे माहेरघर पुण्यात कवयित्री संजीवनी मराठे यांचा जन्म झाला. 

दुसरा प्रश्न - वडिलांनी प्रकाशित केलेल्या कविता संग्रहाचे नाव काय होते ?
बरोबर उत्तर आहे, 'काव्यसंजीवनी' हा कवितासंग्रह त्यांच्या वडिलांनी प्रकाशित केला.

तिसरा प्रश्न -  'हसू बाई हसू' या कवितासंग्रहांला कोणता पुरस्कार मिळाला ?
बरोबर उत्तर आहे,  'हसू बाई हसू' या कवितासंग्रहांला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला.

चौथा प्रश्न - माय मराठी ही कविता कुणी लिहिली ?
बरोबर उत्तर आहे, कवयित्री संजीवनी मराठे यांनी माय मराठी ही कविता लिहिली. 

शेवटचा पाचवा प्रश्न - गायनासोबत त्यांना अन्य कोणता विषय आवडीचा होता ?
बरोबर उत्तर आहे - गायनासोबत त्यांना चित्रकलादेखील आवडीचा विषय होता. 

चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार.

( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )
संकलन :- नासा येवतीकर, 9423625769

Wednesday, 11 February 2026

दिनविशेष माहिती - 13 फेब्रुवारी ( sarojini naidu )

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 
कसे आहात ? मजेत ना ! 

मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमात आपण भारताची कोकिळा : सरोजिनी नायडू यांच्या विषयी माहिती पाहू या. 

लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐका......
Video पाहण्यासाठी link 


सरोजिनी नायडू या भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील अग्रगण्य नेत्या, उत्कृष्ट कवयित्री आणि प्रभावी वक्त्या होत्या. त्यांचा जन्म १३ फेब्रुवारी १८७९ रोजी हैदराबाद येथे झाला. त्यांचे वडील अघोरनाथ चट्टोपाध्याय हे शिक्षणतज्ज्ञ होते आणि आई वरदसुंदरी देवी या बंगाली कवयित्री होत्या. बालपणापासूनच सरोजिनींमध्ये साहित्य, कला आणि समाजसेवेची ओढ दिसून येत होती. वयाच्या १२ व्या वर्षी मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्या होत्या. 
त्यांनी मद्रास, लंडन व केंब्रिज येथे शिक्षण घेतले. इंग्रजी भाषेतील त्यांच्या कवितांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली. The Golden Threshold, The Bird of Time आणि The Broken Wing ही त्यांची प्रसिद्ध काव्यसंग्रह आहेत. मधुर भाषा, भारतीय जीवनचित्रण आणि देशभक्तीची भावना ही त्यांच्या कवितांची वैशिष्ट्ये होती. त्यामुळे त्यांना “भारताची कोकिळा” (Nightingale of India) असे म्हटले जाते.
सरोजिनी नायडू यांनी महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय सहभाग घेतला. सत्याग्रह, असहकार चळवळ आणि 1930 च्या मिठाच्या सत्याग्रहात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्या महिलांच्या हक्कांसाठीही सातत्याने लढल्या आणि समाजातील अन्यायाविरुद्ध आवाज उठवला.
१९२५ मध्ये त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष ठरल्या, ही भारताच्या राजकीय इतिहासातील महत्त्वाची घटना होती. स्वातंत्र्यानंतर त्या उत्तर प्रदेशच्या पहिल्या महिला राज्यपाल बनल्या (१९४७). सार्वजनिक जीवनात त्यांनी प्रामाणिकपणा, करुणा आणि देशप्रेम यांचा आदर्श ठेवला.
२ मार्च १९४९ रोजी त्यांचे निधन झाले. सरोजिनी नायडू यांचे कार्य केवळ राजकीयच नव्हे तर साहित्यिक आणि सामाजिक क्षेत्रातही प्रेरणादायी ठरले. भारतीय स्त्रीशक्तीचे प्रतीक म्हणून त्यांचे नाव इतिहासात अजरामर राहील.

आज त्यांची जयंती त्यानिमित्ताने कोटी कोटी प्रणाम 

मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा. 
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या 

पहिला प्रश्न - सरोजिनी नायडू यांचा जन्म कोठे झाला ?
बरोबर उत्तर आहे, हैद्राबाद येथे सरोजिनी नायडू यांचा जन्म झाला.

दुसरा प्रश्न - सरोजिनी नायडू यांना कोणत्या नावाने ओळखले जाते ? 
बरोबर उत्तर आहे, भारताची कोकिळा किंवा नाईटिंगल ऑफ इंडिया या नावाने सरोजिनी नायडू यांना ओळखले जाते.

तिसरा प्रश्न - कोणाच्या नेतृत्वाखाली सरोजिनी नायडू यांनी स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय सहभाग घेतला ?
बरोबर उत्तर आहे, महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली सरोजिनी नायडू यांनी स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय सहभाग घेतला.

चौथा प्रश्न - सरोजिनी नायडू कोणत्या राज्याचे पहिल्या महिला राज्यपाल बनल्या ?
बरोबर उत्तर आहे, सरोजिनी नायडू ह्या उत्तर प्रदेशच्या पहिल्या महिला राज्यपाल बनल्या. 
आणि शेवटचा पाचवा प्रश्न - सरोजिनी नायडू यांचे निधन केव्हा झाले ?
बरोबर उत्तर आहे - २ मार्च १९४९ रोजी सरोजिनी नायडू यांचे निधन झाले.

चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार.

( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )
संकलन :- नासा येवतीकर, 9423625769

Tuesday, 10 February 2026

दिनविशेष माहिती - 12 फेब्रुवारी ( Swami Dayanand Sarswati )

        नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 
कसे आहात ? मजेत ना ! 

मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमात आपण स्वामी दयानंद सरस्वती यांच्या विषयी माहिती पाहू या. 
लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐका......
Video पाहण्यासाठी 
         स्वामी दयानंद सरस्वती नावावर clik करावे. 

स्वामी दयानंद सरस्वती हे भारतातील महान समाजसुधारक, वैदिक धर्माचे पुनरुज्जीवन करणारे विचारवंत आणि आर्य समाजाचे संस्थापक होते. त्यांचा जन्म १२ फेब्रुवारी १८२४ रोजी गुजरातमधील टंकारा (जि. मोरबी) येथे झाला. त्यांचे मूळ नाव मूळशंकर होते. संन्यास घेतल्यावर त्यांनी दयानंद सरस्वती असे नाव धारण केले. बालपणापासूनच त्यांना धर्म, साधना आणि सत्याचा शोध याविषयी विशेष जिज्ञासा होती.
लहान वयातच त्यांनी मूर्तिपूजेसंबंधी प्रश्न उपस्थित केले. शिवरात्रीच्या दिवशी मंदिरात उंदराने शिवलिंगावरील नैवेद्य खाल्ला हे पाहून त्यांना “ईश्वर हा सर्वशक्तिमान असतो, मग तो स्वतःचे रक्षण का करू शकत नाही?” असा प्रश्न पडला. यामुळे त्यांनी पारंपरिक अंधश्रद्धांपासून दूर जाऊन सत्याच्या शोधासाठी घरत्याग केला. विविध गुरूंकडून वेद, व्याकरण, योग आणि तत्त्वज्ञानाचे अध्ययन करून त्यांनी वैदिक धर्माचा शुद्ध स्वरूपात प्रसार करण्याचा संकल्प केला.
१० एप्रिल १८७५ मध्ये मुंबई येथे त्यांनी आर्य समाजाची स्थापना केली. “वेदांकडे परत चला” हा त्यांचा मुख्य संदेश होता. त्यांनी ईश्वर एक आहे, निराकार आहे आणि वेद हे सर्वोच्च प्रमाण आहेत, असे प्रतिपादन केले. जातिभेद, अस्पृश्यता, बालविवाह, अंधश्रद्धा यांना त्यांनी विरोध केला. स्त्रीशिक्षण, विधवाविवाह आणि समाजातील समतेचा त्यांनी पुरस्कार केला. त्यांच्या विचारांचा देशातील सामाजिक आणि धार्मिक जीवनावर मोठा प्रभाव पडला.
स्वामी दयानंद सरस्वती यांनी संस्कृत व हिंदी भाषेत प्रसिद्ध ग्रंथ ‘सत्यार्थ प्रकाश’ लिहिला आहे. या ग्रंथात त्यांनी वेदांचे तत्त्वज्ञान, सामाजिक सुधारणा आणि धर्मातील शुद्धतेचा संदेश सुस्पष्ट मांडला. त्यांच्या प्रभावामुळे देशभरात शिक्षणसंस्था, गुरुकुल पद्धतीची शाळा आणि सुधारणा चळवळी उभ्या राहिल्या. आर्य समाजाने पुढे स्वातंत्र्य चळवळीतही महत्त्वाचे योगदान दिले.
३० ऑक्टोबर १८८३ रोजी अजमेर येथे त्यांचे निधन झाले. सत्य, विवेक, समता आणि राष्ट्रहित या मूल्यांचा प्रचार करणारे स्वामी दयानंद सरस्वती आजही प्रेरणास्थान मानले जातात. त्यांच्या कार्यामुळे भारतीय समाजात आत्मचिंतन, सुधारणा आणि नवचैतन्य निर्माण झाले, हे त्यांचे अमूल्य योगदान होय.

मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा. 
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या 

पहिला प्रश्न - स्वामी दयानंद सरस्वती यांचे जन्मनाव काय होते ?
बरोबर उत्तर आहे, मूळशंकर असे स्वामी दयानंद सरस्वती यांचे जन्मनाव होते.

दुसरा प्रश्न - स्वामी दयानंद सरस्वती यांनी कोणत्या समाजाची स्थापना केली ?
बरोबर उत्तर आहे, आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली.

तिसरा प्रश्न - स्वामी दयानंद सरस्वती यांनी लिहिलेल्या ग्रंथाचे नाव काय होते ? 
बरोबर उत्तर आहे, सत्यार्थ प्रकाश असे स्वामी दयानंद सरस्वती यांनी लिहिलेल्या ग्रंथाचे नाव होते.

चौथा प्रश्न - स्वामी दयानंद सरस्वती यांनी कोणता संदेश दिला होता ?
बरोबर उत्तर आहे, वेदांकडे परत चला” हा मुख्य संदेश स्वामी दयानंद सरस्वती यांनी दिला होता.

शेवटचा पाचवा प्रश्न - स्वामी दयानंद सरस्वती यांचे निधन केव्हा झाले ?
बरोबर उत्तर आहे - ३० ऑक्टोबर १८८३ रोजी अजमेर येथे स्वामी दयानंद सरस्वती यांचे निधन झाले. 

चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार.

( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )
संकलन :- नासा येवतीकर, 9423625769

जानेवारी महिन्यातील महत्वाचे दिनविशेष ( Importance day in January )

जानेवारी महिन्यातील महत्वाचे दिवस
प्रत्येक दिनविशेष माहितीसाठी Mazishala You Tube चॅनेल पाहावे. त्यासाठी link खाली दिले आहे 
Mazishala you tube चॅनेल 
01 - डॉ. शांती स्वरूप भटनागर पुण्यतिथी 
02 - महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुण्यतिथी 
03 - सावित्रीबाई फुले जयंती 

05 - श्रीपाद नारायण पेंडसे जयंती 
06 - बाळशास्त्री जांभेकर जयंती 
07 - जानकीदेवी बजाज जयंती 
08 - लॉर्ड बेडन-पॉवेल पुण्यतिथी 
09 - डॉ. हरगोविंद खुराना जयंती 
10 - दत्ताजी शिंदे पुण्यतिथी 

12 - राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती 
13 - राकेश शर्मा जयंती 
14 - भूगोल दिनांक 
15 - खाशाबा जाधव जयंती 
16 - न्यायमूर्ती महादेव रानडे पुण्यतिथी 
17 - दत्तात्रय रामचंद्र कापरेकर जयंती 

19 - जेम्स वॅट जयंती 
20 - अपा शेर्पा जयंती 
21 - कवी माधव ज्यूलियन जयंती 
22 - समर्थ रामदास स्वामी 
23 - नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे जयंती 
24 - डॉ. होमी जहागीर भाभा पुण्यतिथी 

26 - प्रजासत्ताक दिन
27 - जनरल अरुणकुमार वैद्य जयंती 
28 - लाला लाजपत राय पुण्यतिथी 
29 - थॉमस पेन जयंती 
30 - महात्मा गांधी पुण्यतिथी 
31 मेजर सोमनाथ शर्मा जयंती

Monday, 9 February 2026

दिनविशेष माहिती - 11 फेब्रुवारी ( thomas Edison )

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 
कसे आहात ? मजेत ना ! 

मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमात आपण संशोधक थॉमस अल्वा एडिसन यांच्या विषयी माहिती पाहू या. 

लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐका......
Video पाहण्यासाठी 

नावावर clik करावे. 
थॉमस अल्वा एडिसन हे जगप्रसिद्ध अमेरिकन संशोधक आणि उद्योजक होते. त्यांचा जन्म ११ फेब्रुवारी १८४७ रोजी अमेरिकेतील ओहायो राज्यातील मिलान येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव सॅम्युएल एडिसन व आईचे नाव नॅन्सी एडिसन होते. लहानपणी त्यांचे औपचारिक शिक्षण कमी झाले असले तरी आईच्या मार्गदर्शनामुळे त्यांनी स्वतः अभ्यास करून विज्ञानाची गोडी निर्माण केली.
एडिसन यांनी आयुष्यभर सुमारे १००० पेक्षा अधिक शोधांचे पेटंट घेतले. अथक प्रयत्नाने त्यांनी विद्युत बल्बचा शोध लावला व व्यावहारिक उपयोगी प्रकार विकसित केल्यामुळे त्यांना विशेष प्रसिद्धी मिळाली. याशिवाय फोनोग्राफ (ध्वनिमुद्रक), चलचित्र कॅमेरा, टेलिग्राफ सुधारणा, आणि विद्युत वितरण प्रणाली यांसारखे अनेक महत्त्वाचे शोध त्यांनी लावले. त्यांच्या शोधांमुळे मानवाचे दैनंदिन जीवन अधिक सोयीचे व आधुनिक झाले. त्यांनी जगातील पहिली औद्योगिक संशोधन प्रयोगशाळा स्थापन केली. 
एडिसन यांचे कार्यपद्धती अत्यंत मेहनतीची होती. “मी अपयशी झालो नाही; मी फक्त १०,००० मार्ग शोधले जे काम करत नाहीत, अपयश म्हणजे "First Attempt In Learning” हे त्यांचे प्रसिद्ध वाक्य त्यांच्या चिकाटीचे दर्शन घडवते. माणूस सकारात्मक असला की त्याच्या हातून होणाऱ्या गोष्टीसुद्धा सकारात्मक आणि भव्यदिव्य असतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे थॉमस अल्वा एडिसन. त्यांनी न्यू जर्सी येथील मेनलो पार्क येथे संशोधन प्रयोगशाळा स्थापन केली, जी जगातील पहिली औद्योगिक संशोधन प्रयोगशाळा मानली जाते.
जीवनातल्या प्रत्येक गोष्टीकडं सकारात्मक दृष्टिकोनातून बघायला शिकवणाऱ्या या महान संशोधकाचा मृत्यू १८ ऑक्टोबर १९३१ मध्ये झाला. त्यांनी दिलेल्या शोधांमुळे विज्ञान, उद्योग आणि मानवजीवनावर अमिट ठसा उमटवला आहे. म्हणूनच त्यांना “आधुनिक विद्युत युगाचा जनक” असेही म्हटले जाते. त्यांच्या जीवनातून परिश्रम, चिकाटी आणि नवकल्पनांची प्रेरणा मिळते.

आज त्यांची जयंती त्यानिमित्ताने या महान संशोधकाला विनम्र अभिवादन 

मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा. 
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या 

पहिला प्रश्न - थॉमस अल्वा एडिसन यांचा जन्म केव्हा झाला ?
बरोबर उत्तर आहे, थॉमस अल्वा एडिसन यांचा जन्म ११ फेब्रुवारी १८४७ रोजी झाला.

दुसरा प्रश्न - विद्युत बल्बचा शोध कोणी लावला ? 
बरोबर उत्तर आहे, थॉमस अल्वा एडिसन ने विद्युत बल्बचा शोध लावला.

तिसरा प्रश्न - थॉमस अल्वा एडिसन हे कोणत्या देशाचे संशोधक होते ?
बरोबर उत्तर आहे, थॉमस अल्वा एडिसन हे अमेरिकेचे संशोधक होते ?

चौथा प्रश्न - थॉमस अल्वा एडिसन यांना काय म्हटले जाते ?
बरोबर उत्तर आहे, थॉमस अल्वा एडिसन यांना “आधुनिक विद्युत युगाचा जनक” असेही म्हटले जाते.

शेवटचा पाचवा प्रश्न - थॉमस अल्वा एडिसन यांचा मृत्यू केव्हा झाला ?
बरोबर उत्तर आहे - १८ ऑक्टोबर १९३१ रोजी थॉमस अल्वा एडिसन यांचा मृत्यू झाला.

चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार.

( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )
संकलन :- नासा येवतीकर, 9423625769

Sunday, 8 February 2026

दिनविशेष माहिती - 10 फेब्रुवारी ( Narhar Kurundkar )

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 
कसे आहात ? मजेत ना ! 

मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमात आपण विचारवंत नरहर कुरुंदकर यांच्या विषयी माहिती पाहू या. 
लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐका......
Video पाहण्यासाठी 

नावा वर clik करावे. 
नरहर कुरुंदकर हे आधुनिक मराठी साहित्यातील एक महत्त्वाचे विचारवंत, समीक्षक व प्रभावी वक्ते होते. त्यांनी मराठी साहित्याला तर्कशुद्ध विचार, निर्भीड मतप्रदर्शन आणि समाजाभिमुख दृष्टिकोन दिला. त्यांच्या लेखनातून विवेक, चिकित्सक बुद्धी आणि मूल्याधिष्ठित जीवनदृष्टी प्रकर्षाने दिसून येते.
नरहर कुरुंदकर यांचा जन्म १५ जुलै १९३२ रोजी परभणी जिल्ह्यातील ( सध्या हिंगोली जिल्हा ) नांदापूर येथे झाला. हिंगोली जिल्ह्यातील कुरुंदा हे त्यांचे मूळ गाव. प्राथमिक शिक्षण वसमतला झाल्यानंतर ते त्यांच्या मामाच्या घरी हैदराबादला गेले आणि तिथं त्यांनी पुढचं शिक्षण घेतलं. साधारणतः अकराव्या वर्षापासून कुरुंदकरांनी लिखाणाला सुरुवात केली. त्यांचे शिक्षण वाचन, चिंतन आणि अध्ययनप्रधान वातावरणात झाले. त्यांनी नांदेड येथील प्रतिभा निकेतन माध्यमिक विद्यालयात शिक्षक म्हणून तर नांदेड एज्युकेशन सोसायटीचे पीपल्स कॉलेजचे प्राचार्यपद भूषविले होते. विशेष बाब म्हणजे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद दोनदा बिनविरोध त्यांच्याकडे येऊनही त्यांनी त्याला नम्रपणे नकार दिला होता.
आपल्या अध्यापनातून त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये विचार करण्याची सवय लावली. व्याख्यानांमधून त्यांनी सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि साहित्यिक विषयांवर स्पष्ट व ठाम भूमिका मांडली. ते विद्यार्थीप्रिय शिक्षक होते. विद्यार्थ्यांच्या अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी ते काम करत. किशोरवयीन अवस्थेतच ते हैदराबाद मुक्तिसंग्रामात उतरले होते. या लढ्याच्या निमित्ताने त्यांना अनेक मोठ्या लोकांना जवळून पाहता आलं.
त्यांचे लेखन विशेषतः निबंध आणि समीक्षा या प्रकारांत महत्त्वाचे मानले जाते. त्यांनी परंपरेचा आदर राखत आधुनिक विचारांना स्थान दिले. भावनावश लेखनापेक्षा तर्क, विवेक आणि वस्तुनिष्ठता यांवर त्यांनी भर दिला. त्यामुळे त्यांचे लेखन वाचकांना विचार करायला प्रवृत्त करते. 
‘साहित्य आणि समाज’, ‘विचार आणि विवेक’ यांसारखी त्यांची पुस्तके मराठी वैचारिक साहित्यात मोलाची मानली जातात. त्यांच्या निबंधांतून सामाजिक वास्तवाचे भान, मानवी मूल्यांची जाणीव आणि लोकशाही मूल्यांप्रती निष्ठा व्यक्त होते. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ नांदेड शहरात २०१० मध्ये त्यांच्या नावाचे ’नरहर कुरुंदकर प्रतिष्ठान’ स्थापन करण्यात आले.त्यांची मुलगी श्यामल पत्की या प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्ष होत्या. त्यांच्या धार आणि काठ या पुस्तकाला महाराष्ट्र राज्य पुरस्कार मिळाला आहे.
१० फेब्रुवारी १९८२ साली त्यांचे निधन झाले; मात्र त्यांच्या विचारांची परंपरा आजही मराठी साहित्यात जिवंत आहे. विवेकशील विचार, निर्भीड लेखनशैली आणि समाजाभिमुख दृष्टिकोन यांमुळे नरहर कुरुंदकर हे मराठी साहित्यातील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व ठरले आहेत.
आज नरहर कुरुंदकर यांची पुण्यतिथी त्यानिमित्ताने त्यांच्या विचारांना त्रिवार वंदन !

मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा. 
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या 

पहिला प्रश्न - नरहर कुरुंदकर हे कोणत्या शाळेत शिक्षक म्हणून काम पाहिले ? 
बरोबर उत्तर आहे, नांदेड येथील प्रतिभा निकेतन विद्यालयात नरहर कुरुंदकर यांनी शिक्षक म्हणून काम पाहिले.

दुसरा प्रश्न - नरहर कुरुंदकर हे कोणत्या कॉलेजचे प्राचार्यपद भूषविले होते ? 
बरोबर उत्तर आहे, नांदेड एज्युकेशन सोसायटीचे पीपल्स कॉलेजचे प्राचार्यपद भूषविले होते. 

तिसरा प्रश्न -  ’नरहर कुरुंदकर प्रतिष्ठान’ स्थापना कोठे करण्यात आली ?
बरोबर उत्तर आहे, नांदेड येथे  ’नरहर कुरुंदकर प्रतिष्ठान’ स्थापना करण्यात आले.

चौथा प्रश्न - नरहर कुरुंदकर यांच्या कोणत्या पुस्तकाला महाराष्ट्र राज्य पुरस्कार मिळाला आहे ?
बरोबर उत्तर आहे, नरहर कुरुंदकर यांच्या धार आणि काठ या पुस्तकाला महाराष्ट्र राज्य पुरस्कार मिळाला आहे.

शेवटचा पाचवा प्रश्न - नरहर कुरुंदकर यांचे मूळ गाव कुरुंदा कोणत्या जिल्ह्यात येते ?
बरोबर उत्तर आहे - नरहर कुरुंदकर यांचे मूळ गाव कुरुंदा हिंगोली जिल्ह्यात येते.

चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार.

( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )
संकलन :- नासा येवतीकर, 9423625769

दिनविशेष माहिती - 09 फेब्रुवारी ( बाबा Amte )

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 
कसे आहात ? मजेत ना ! 

मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमात आपण पद्मविभूषण बाबा आमटे यांच्या विषयी माहिती पाहू या. 
लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐका......

      पद्मविभूषण बाबा आमटे

बाबा आमटे हे थोर समाजसेवक, मानवतावादी कार्यकर्ते आणि गांधीवादी विचारांचे प्रचारक होते. कुष्ठरोगग्रस्त, अपंग, आदिवासी आणि वंचित घटकांच्या पुनर्वसनासाठी त्यांनी आपले आयुष्य समर्पित कार्य केले. त्यांच्या कार्यामुळे समाजात करुणा, समता आणि सेवा यांची मूल्ये दृढ झाली.
बाबा आमटे यांचा जन्म 26 डिसेंबर 1914 रोजी महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे झाला. बाबा आमटे यांचे पूर्ण नाव मुरलीधर देविदास आमटे असे होते. बाबा आमटेंना लहानपणी चित्रपट फार आवडायचे. बाबा आमटे लहानपणापासून स्वतंत्र विचारांचे होते. बाबा आमटेंनी वकिलीचे शिक्षण पूर्ण केल्यावर काही काळ वकिलीही केली. मात्र समाजातील दुःख, अन्याय आणि उपेक्षा पाहून त्यांनी सामाजिक सेवेला आपले जीवन समर्पित केले. कुष्ठरोगग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी वरोरा येथे आनंदवन आश्रमाची स्थापना केली. याठिकाणी कुष्ठरोग्यावर उपचार, शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मान यांची सोय करून रुग्णांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील केले. भामरागड तालुक्यातील आदिवासींच्या विकासासाठी हेमलकसा येथे बाबांनी लोकबिरादरी प्रकल्प सुरू केले.
त्यांनी भारत जोडो यात्रा, नर्मदा बचाव आंदोलन यांसारख्या जनआंदोलनांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आणि सामाजिक न्यायासाठी आवाज उठवला. त्यांच्या पत्नी साधना आमटे, तसेच मुले डॉ. विकास आमटे व डॉ. प्रकाश आमटे यांनीही त्यांच्या कार्याचा वारसा पुढे नेला.
बाबा आमटे यांना त्यांच्या अद्वितीय सेवेसाठी पद्मश्री, पद्मविभूषण, जमनालाल बजाज पुरस्कार, रॅमन मॅगसेसे पुरस्कार, महाराष्ट्र भूषण अवार्ड यांसारखे अनेक सन्मान मिळाले. बाबा आमटे यांचा दिनांक ९ फेब्रुवारी २००८ रोजी निधन झाले.
बाबा आमटे यांचे जीवन हे करुणा, त्याग आणि मानवसेवेचे प्रेरणादायी उदाहरण आहे. त्यांच्या कार्यामुळे लाखो वंचितांना नवी आशा आणि सन्मानाचे जीवन मिळाले, आणि ते भारतीय समाजसेवेचे उज्ज्वल प्रतीक म्हणून सदैव स्मरणात राहतील.
आज त्यांची पुण्यतिथी त्यानिमित्ताने त्यांच्या कार्याला त्रिवार वंदन !

मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा. 
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या 

पहिला प्रश्न - बाबा आमटे यांचा जन्म केव्हा झाला ?
बरोबर उत्तर आहे, बाबा आमटे यांचा जन्म 26 डिसेंबर 1914 रोजी झाला.

दुसरा प्रश्न - बाबा आमटे यांचे पूर्ण नाव काय होते ? 
बरोबर उत्तर आहे, मुरलीधर देविदास आमटे असे बाबा आमटे यांचे पूर्ण नाव होते.

तिसरा प्रश्न - कुष्ठरोगाने ग्रस्त रुग्णासाठी स्थापन केलेल्या आश्रमाचे नाव काय होते ?
बरोबर उत्तर आहे,  कुष्ठरोगाने ग्रस्त रुग्णासाठी स्थापन केलेल्या आश्रमाचे नाव आनंदवन आश्रम होते.

चौथा प्रश्न - बाबा आमटे यांच्या पत्नीचे नाव सांगा.
बरोबर उत्तर आहे, बाबा आमटे यांच्या पत्नीचे नाव साधना आमटे 

शेवटचा पाचवा प्रश्न - बाबा आमटे यांनी लोकबिरादरी प्रकल्प कोठे सुरु केले ?
बरोबर उत्तर आहे - भामरागड तालुक्यातील हेमलकसा येथे बाबा आमटे यांनी लोकबिरादरी प्रकल्प सुरू केले.

चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार.

( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )
संकलन :- नासा येवतीकर, 9423625769