नागोराव सा. येवतीकर

Wednesday, 17 January 2024

जय श्रीराम ( Jay Sri Ram )

             ।। जय श्रीराम ।।

अयोध्या नगरी ही श्रीरामाची 
पवित्र स्थळ आहे हिंदू धर्माची

राजा दशरथाचा जेष्ठ सुपुत्र
भगवान श्रीराम सत्याचे सूत्र

लक्ष्मण भरत शत्रुघ्न सखा
प्रेम न दिसे यांच्यासारखा
 
जानकी त्यांची धर्मपत्नी
श्रीराम ही होते एकपत्नी
 
भक्त नाही हनुमंतासारखा 
भगवंत नाही रामासारखा

प्राणप्रतिष्ठा होतेय अयोध्यानगरी
रामनामचा जयघोष चाले घरोघरी

सर्वांमुखी आहे फक्त एकच नाम
श्रीराम जय राम जय जय राम

- नासा येवतीकर, धर्माबाद
9423625769


उजाडली तारीख बावीस जानेवारी
कशी सजली पहा अयोध्या नगरी
रांगोळीने नटले अंगण दारोदारी
जणू दिवाळी आली पुन्हा घरोघरी

तोरण पताके फुलांनी सजली धरा
देशात वाहतोय आनंदाचा धुमारा
रामभक्तीत लीन झाला देश सारा
सर्वांमुखी फक्त जय श्रीरामचा नारा

- नासा येवतीकर, धर्माबाद