नागोराव सा. येवतीकर

Friday, 31 March 2023

April fool Day

एप्रिल फूल दिन 


( पूर्ण लेख वाचल्यावर उत्तर कळेल )

एप्रिल महिन्याचा पहिला दिवस. ह्या दिवशी गमतीने एखाद्यास बनविण्याची प्रथा पाश्चिमात्य राष्ट्रांत प्रामुख्याने दिसून येते. बनलेल्या व्यक्तीस ‘एप्रिल फूल’  म्हणण्याचा प्रघात आहे. ह्या प्रथेची सुरुवात केव्हा व कशी झाली हे निश्चितपणे सांगता येत नाही. तथापि काही लोक तिचा संबंध प्राचीन रोममधील व्हीनस व फॉर्चुना व्हिरिलीस या देवतांच्या उत्सवाशी लावतात. ग्रेगोरियन पंचांग १५६४  साली स्वीकारल्यानंतर फ्रान्समध्ये या प्रथेस सुरुवात झाली व ती १६०० पर्यंत इतरत्र पसरली असेही म्हटले जाते. काही लोक त्यास लूच्या वसंतोत्सवाची स्मृती मानतात.

प्राचीन रोममधील हिलेरिया व भारतातील होळी या उत्संवाशी या एप्रिल फूलचे बरेच साम्य आहे. होळी व हिलेरिया यांच्याप्रमाणेच हा प्रकार वसंतागमनाच्या वेळीच साजरा करतात.

मेक्सिकोत २८ डिसेंबरला हा दिवस पाळतात. त्या दिवशी उसनी घेतलेली वस्तू परत न करण्याची तेथे प्रथा आहे. बनलेल्या व्यक्तीस इंग्‍लंडमध्ये  ‘एप्रिल फूल’, स्कॉटलंडमध्ये ‘एप्रिल गॉक’ व फ्रान्समध्ये ‘एप्रिल फिश’ म्हणतात. ब्रिटिशांच्या अंमलाबरोबर ही प्रथा भारतात आली. या दिवसास सकल मूर्खांचा दिवस असेही म्हणतात.

खोडवे, अच्युत.

संकलन :- इंटरनेट

उत्तर -