या ब्लॉग वरील सर्व लेखाचे हक्क सौ.अर्चना नागोराव येवतीकर यांच्याकडे आहेत. परवानगी शिवाय लेख फॉर्वर्ड किंवा प्रकाशित करू नये पाऊलवाट पुस्तकाचे प्रा. इंद्रजित भालेराव यांच्या हस्ते प्रकाशन
नागोराव सा. येवतीकर
Saturday, 1 May 2021
02/05/2021 Dogs story
Friday, 30 April 2021
02/05/2021 avkali
29/04/2021 corona self disipline
30/04/2021 dole
Thursday, 29 April 2021
01/05/2021 majha maharshtra
सर्वगुणसंपन्न माझा महाराष्ट्र
आजपासून एक्याऐंशी वर्षांपूर्वी म्हणजे एक मे एकोणिशे साठ रोजी भाषावार प्रांत रचनेनुसार महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली होती. बहुसंख्य मराठी भाषा बोलणाऱ्या लोकांचे राज्य म्हणून महाराष्ट्र राज्य निर्माण करण्यात आले. संपूर्ण देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी तर दीक्षाभूमीसाठी प्रसिद्ध असलेले नागपूर ही उपराजधानी झाली. तसे मुंबई आणि नागपूर हे दोन्ही शहर महाराष्ट्रातील प्रमुख शहरात गणले जातात. मुंबई ही राज्याचीच नव्हे तर देशातील देखील महत्वाचे शहर आहे. गेटवे ऑफ इंडिया, बॉलीवूडची चंदेरी दुनिया, वानखेडे स्टेडियम, सीएसटी, यासारख्या अनेक स्थळामुळे मुंबई सर्वांसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरते. संत्र्याच्या उत्पादनासाठी नागपूर शहर प्रसिद्ध आहेच त्यासोबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी येथे दीक्षाभूमीवर लाखों अनुयायांसोबत बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती, म्हणून देखील हे शहर प्रसिद्ध झाले आहे. त्याखालोखाल ज्या शहराचे नाव घेतले जाते ते म्हणजे पुणे होय. पुणे तिथे काय उणे असे या शहराच्या बाबतीत बोलल्या जाते. पुणे हे महाराष्ट्रातील सांस्कृतिक शहर आहे. अनेक सारस्वत मंडळी पुण्यातून निर्माण झाले. आज ही पुणे शहर आपल्या संस्कृतीला नावाप्रमाणे टिकवून ठेवले आहे. राज्यातील महाबळेश्वर, पाचगणी सारखी थंड हवेची ठिकाणं उन्हाळ्यात पर्यटकांनी भरून जातात. शिखांचे दहावे गुरू गोविंदसिंह यांची समाधी गुरुद्वारा म्हणून प्रसिद्ध आहे जे की नांदेड येथे आहे. शीख धर्मातील लोकांसाठी हे स्थळ काशी म्हणून प्रसिद्ध आहे. पंजाबमधून लाखो भाविक दरवर्षी नांदेड येथे ये-जा करतात.
राज्यात एकूण छत्तीस जिल्हे असून कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर असे राज्यात प्रशासकीय कामासाठी एकूण सहा विभाग करण्यात आले आहेत, ज्यामुळे अनेक कामांची विभागणी होऊन काम सुरळीत पार पडण्यास मदत मिळते.
महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळ्खले जाते. येथील भूमीत संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ, समर्थ रामदास स्वामी यासारखे अनेक संत होऊन गेले. त्याचसोबत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा यांच्या सारख्या समाजसुधारक संतांनी देखील येथील भूमी पवित्र झाली आहे. लोकांच्या कल्याणासाठी झटणारे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्या थोर महापुरुषांनी आपल्या कार्याने आणि विचाराने महाराष्ट्राला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. महाराष्ट्रातील जनता या महापुरुषांच्या कार्याला आणि विचाराला कदापिच विसरू शकणार नाही. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात देखील महाराष्ट्राच्या अनेक शूरवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, आपले संपूर्ण जीवन अर्पण केले, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, गोपाळ गणेश आगरकर, आदी क्रांतिकारकाविषयी आमच्या मनात नेहमीच कृतज्ञतेची भावना तेवत असते. साहित्याच्या क्षेत्रात देखील कवयित्री बहिणाबाई चौधरी, अण्णाभाऊ साठे, वि. स. खांडेकर, गदिमा, ना. सी. फडके, कुसुमाग्रज, प्र. के. अत्रे, भा. रा. तांबे, सुरेश भट, बालकवी, केशवसुत इत्यादी साहित्यिकांनी उत्तम साहित्य निर्माण करून ठेवले आहे, ज्याच्या बळावर आज नवीन साहित्यिक नवे साहित्य निर्माण करत आहेत. खेळाच्या बाबतीत देखील महाराष्ट्रातील खेळाडूचे अनन्यसाधारण महत्व आहे. सुनील गावसकर, दिलीप वेंगसरकर, सचिन तेंडुलकर, खाशाबा जाधव यासारख्या खेळाडूंनी महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे नाव जगाच्या नकाशावर कोरून ठेवले आहे. तर चित्रपट क्षेत्रातील भालजी पेंढारकर, डॉ. श्रीराम लागू, निळू फुले, दादा कोंडके, सचिन पिळगावकर, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, महेश कोठारे माधुरी दीक्षित, उषा नाडकर्णी, लता मंगेशकर, आशा भोसले, पंडीत भीमसेन जोशी यासारखे अनेक कलाकारांनी आपल्या कला कौशल्याने महाराष्ट्राचे नाव सर्वदूर पोहोचविले आहे. सह्याद्री पर्वत रांगेतील कळसूबाईचे शिखर अनेक गिर्यारोहकाना नेहमी खुणावत असते. कर्नाळा पक्षी अभयारण्य, ताडोबाचे व्याघ्रप्रकल्प, स्व. बाबा आमटे यांचे आनंदवन, यासारखे अनेक स्थळ महाराष्ट्रात पर्यटकांना आकर्षित करत असतात. राज्याला सातशे वीस किमीचा समुद्रकिनारा लाभला आहे ज्यामुळे राज्याला अनेक बाबतीत समृद्धता मिळाले आहे. कोयना, जायकवाडी, भंडारदरा यासारख्या धरणामुळे राज्य सुजलाम सुफलाम होण्यास मदत मिळाली आहे. उद्योगधंद्यात देखील महाराष्ट्र मागे नाही. मुंबई, पुणे, सोलापूर, इचलकरंजी, औरंगाबाद या शहरातील उद्योगाने अनेक कामगारांच्या हाताला काम देऊन उद्योगाच्या क्षेत्रात आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. पर्यटकांना आकर्षित करणारे महाराष्ट्र हे एक प्रमुख राज्य आहे. औरंगाबाद येथील अजिंठा व वेरूळच्या लेण्यांचा अभ्यास करण्यासाठी जगभरातून लोकं येत असतात. त्याचसोबत राज्यात असलेले अनेक किल्ले आणि गड हे देखील पर्यटकांना आपल्याकडे नेहमीच भुरळ घालत असतात. तिरुपती बालाजी नंतर दुसरे देवस्थान म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथील साईबाबा यांचे मंदीर होय. सबका मलिक एक असा संदेश देणारे साईबाबा हे सर्व धर्मियांचे दैवत आहे. येथे अनेक लोकं दरवर्षी दर्शनासाठी गर्दी करतात. कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची तुळजाभवानी, माहूरची रेणुका माता आणि वणीची सप्तश्रृंगी देवी हे साडे तीन पीठ स्थळ अनेक महिलांसाठी प्रेरणेचे स्थान आहेत. वारकरी संप्रदायाचे विठ्ठल भक्त दरवर्षी आषाढी आणि कार्तिकेला पंढरपूर येथे पायी वारी करण्यासाठी येतात. शेगावचे गजानन महाराजाचे मंदीर स्वच्छतेच्या बाबतीत सर्वाना एक मार्गदर्शक ठरेल असे ठिकाण आहे. तेथे गेल्यानंतर जे आत्मिक व मानसिक समाधान मिळते ते कदाचित कुठे ही मिळत नसेल. कोकणची किनारपट्टी, तेथील हापूस आंबा, नारळ आणि इतर वृक्ष पाहिल्यावर डोळ्याचे पारणे फिटतात. त्याचसोबत महाराष्ट्रातील अजून घटना घडली, देशातील सर्वप्रथम रेल्वे ठाणे - मुंबई दरम्यान धावली होती, ज्यामुळे इतिहासात याची ठळक नोंद घेतली आहे. कारण आज देशातील रेल्वेचे जाळे पाहिलं तर त्यात महाराष्ट्राचे स्थान अग्रस्थानी दिसून येते. महाराष्ट्रात दर कोसावर भाषा बदलत जाते. मुंबईची भाषा वेगळी तर पुण्याची भाषा वेगळी. मराठवाड्याची भाषा अनेकांना अवघडल्यासारखे वाटते तर विदर्भाची भाषा प्रेमळ वाटते. खानदेशाची अहिराणी भाषा आणि पश्चिम महाराष्ट्रातील रुबाबदार भाषा आपले वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे. तसे महाराष्ट्रात गोदावरी, कोयना, कावेरी, चंद्रभागा, भीमा अश्या अनेक नद्यांनी समृद्ध केले आहे तर अमरावती, गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातल्या जंगलाने विविध प्राणी, पशु-पक्षी यांना खरा आधार दिले आहे. विविध जातीचे, धर्माचे, पंथाचे लोकं या महाराष्ट्रात गुण्यागोविंदाने नांदत आले आहेत. शिक्षणाच्या बाबतीत देखील महाराष्ट्र मागे नाही. मुंबई, नागपूर, पुणे, औरंगाबाद इत्यादी शहरात शाळा, विद्यालये, महाविद्यालये, विद्यापीठ, कृषी विद्यापीठ विद्यार्जनासाठी निर्माण करण्यात आले आहे. सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे असतील किंवा पोपटराव पवार यासारखे व्यक्तींच्या आदर्शावर आज महाराष्ट्रातील ग्रामीण जनता पाऊल ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते. त्यानंतर मुख्यमंत्री बनलेल्या वसंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण, विलासराव देशमुख, शरद पवार, सुधाकरराव नाईक, मनोहर जोशी इत्यादी लक्षात राहणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेण्यास अनेक योजना आखल्या आणि त्या कार्यान्वित देखील केले. सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून मा. उद्धव ठाकरे साहेब जे बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र आहेत, ते काम पाहत आहेत. त्यांच्या हाती सत्ता आल्यापासून कोरोना व्हायरसने संपूर्ण जगासह महाराष्ट्र देखील पादांक्रांत केले आहे. मा. उद्धव ठाकरे साहेबांची खरी कसोटी या क्षणी पाहायला मिळत आहे. या कोव्हीड-19 काळातील एक कणखर मुख्यमंत्री म्हणून इतिहास त्यांची नोंद घेईल इतके सुंदर कार्य चालू आहे. महाराष्ट्र दर्शन करायला निघालं तर आयुष्य देखील कमी पडू शकते, एवढं समृद्धता राज्यात आढळून येते. मी महाराष्ट्रयीन असल्याचा मला नेहमीच अभिमान आहे. असा माझा हा महाराष्ट्र सर्वगुणसंपन्न असून देशात आपले एक वेगळे अस्तित्व निर्माण करून ठेवले आहे. आज महाराष्ट्र दिन त्यानिमित्ताने आपणा सर्वांना हार्दीक शुभेच्छा ....!
- नागोराव सा. येवतीकर, विषय शिक्षक, कन्या शाळा धर्माबाद जि. नांदेड 9423625769
महाराष्ट्र माझा
देशात उंचावलेली आहे मान
देशाचे हृदय महाराष्ट्र माझा
संपूर्ण देशात गाजावाजा
जय जय महाराष्ट्र माझा
आपली भाषा आपले लोक
आपला प्रांत आपले राष्ट्र
चालावा आपला व्यवहार
असा हा आपला महाराष्ट्र
येथील लोकं बोलती मराठी
येथे व्यवहार होतो मराठी
पुस्तकाची भाषा ही मराठी
महाराष्ट्राची राजभाषा मराठी
मुंबई आहे राज्याची राजधानी
येथे घडते आर्थिक कहाणी
नागपूर राज्याची उपराजधानी
संत्री खाऊन गाती गोड गाणी
राज्यात एकूण छत्तीस जिल्हे
आहेत अनेक गड आणि किल्ले
राष्ट्रावर झाले आहेत अनेक हल्ले
घाबरणार कसे महाराष्ट्राची पिल्ले
सोनियाचा मे महिन्याचा एक
राज्यात नांदती लोकं अनेक
गुण-गौरव गातसे माय लेक
माझा महाराष्ट्र सर्वात नेक
- नासा येवतीकर, विषय शिक्षक,
कन्या शाळा धर्माबाद, 9423625769
।। माझा महाराष्ट्र ।।
महात्मा फुले शाहू आंबेडकर
लाभले टिळक नि आगरकर
देशासाठी केली अपार सेवा
राज्याचे नाव पोहोचले जगभर
या थोर समाजसुधारकासह
होती महाराष्ट्र संतांची भूमी
भारताच्या स्वातंत्र्यासाठी आले
राज्यातील अनेक वीर कामी
छत्रपती शिवाजी राजे यांनी
निर्मिले मराठ्यांचे स्वराज्य
त्यांची प्रेरणा घेऊनच झालं
मराठी भाषिक लोकांचे राज्य
देशाच्या प्रगतीमध्ये हातभार
मुंबई शहर असतो अग्रेसर
देशाच्या विकासात महाराष्ट्र पुढे
प्रत्येक शहराची दिशा विकासाकडे
एक्याऐंशी वर्षांपूर्वी झाली होती
महाराष्ट्र राज्याची निर्मिती
मुंबई बनली राज्याची राजधानी
तर नागपूर ठरले उपराजधानी
महाराष्ट्राला आहे एक इतिहास
प्रत्येक जिल्ह्याचे स्थान वेगळं
प्रत्येक जिल्हा वैशिष्टयपूर्ण
पर्वत डोंगर जंगल हे सगळं
- नासा येवतीकर, विषय शिक्षक
कन्या शाळा धर्माबाद, 9423625769
Monday, 26 April 2021
akbar birbal marathi katha
त्या राजाने स्वतःचा मोठेपणा दाखवण्यासाठी त्या सेवकाजवळ एक मेना पासून बनवलेला वाघ एका पिंजरा मध्ये बंद करून पाठवला होता आणि असे सांगण्यात आले होते की पिंजरा न खोलता या वाघाला बाहेर काढून दाखवा.
दरबारामध्ये बीरबल नसल्यामुळे अकबर विचारात गुंतला होता की या समस्यांमधून मार्ग कसा काढावा. जर आपण या वाघाला बाहेर काढले नाही तर सर्व लोक आपल्यावर हसतील. एवढ्यात बुद्धिमान चतुर आणि हुशार बिरबल दरबारामध्ये येऊन सर्व सूत्रे आपल्या हाती घेतो.
तेव्हा बिरबलाने एक गरम सळई मागवली आणि ती पिंजऱ्यामध्ये घालून तो मेना पासून बनवलेला वाघ वितळविला. बघता बघता मेन वितळून बाहेर येऊ लागले. अकबर-बिरबलाच्या कल्पनेवर खूप प्रसन्न झाला आणि पुन्हा त्या राजाने अकबराला आव्हान दिले नाही.
तात्पर्य बुद्धीच्या जोरावर कितीही मोठ्या समस्येवर मात केली जाऊ शकते.
तेव्हा बिरबल हसत म्हणाला की तू फक्त विहीरच शेतकऱ्याला विकली आहेस आणि पाणी नाही तेव्हा तुला या विहिरींमध्ये पाणी ठेवण्याचा काहीही अधिकार नाही तेव्हा तू लगेच या विहिरीतील पाणी काढून ने नाहीतर त्याचे व्याज शेतकऱ्याला दे. एवढे ऐकून तो माणूस समजला की आपले या महाचतुर माणसासमोर काहीही चालणार नाही तेव्हा त्याने आपली चूक कबूल केली आणि त्या शेतकऱ्याला व्याजही दिले. बिरबलाच्या या न्यायावर अकबर ही खुश झाला.
तेव्हा बिरबल म्हणतो राजे मला याचे उत्तर देता येणार नाही परंतु आपल्या राज्यात डोळे असलेल्या आंधळ्याची संख्या भरपूर आहे. राजाने विचारले, असे तु ठामपणे कसे सांगू शकतो? त्यावर बिरबल म्हणतो, राजा मला दोन दिवसाची मुदत द्या मी तुम्हाला या दोन दिवसांमध्ये अशा लोकांची नावे आणून देतो.
दुसऱ्या दिवशी बिरबलाने आपला बिछाना अंगणात आणला आणि त्याचे राहिलेले अर्धे काम पूर्ण करू लागला. बिरबलाने रस्त्यावरून चाललेल्या एका माणसाला बोलावले आणि कागद-लेखणी घेऊन बसण्यास सांगितले.
रस्त्यावरून जाणारी सर्व लोक बिरबलाला येऊन विचारत होती की, हे काय चालले आहे?. बिरबलाने त्या सर्व लोकांची नावे लिहून घेण्यास सांगितले. बघता बघता ही माहिती संपूर्ण गावामध्ये पसरली. त्यामुळे गावातील सर्व लोक येऊन पाहू लागले की बिरबल हे काय करत आहे.
तेव्हा राजाने विचारले या कागदावर माझे नाव सर्वप्रथम का आहे? बिरबल म्हणाला मी माझ्या बिछान्याचे काम करत होतो हे पाहत असूनही लोक मला विचारत होते आणि तुम्हालाही उत्सुकता असल्यामुळे तुम्हीही माझ्या घरी आलात, तुम्ही राजा असल्यामुळे तुमचे नाव सर्वप्रथम असावे अशी माझी इच्छा होती.
त्यालाही हाच प्रश्न विचारण्यात येतो. बिरबलाने पटकन उत्तर दिले ही मागच्याच वर्षे कावळ्यांची जनगणना करण्यात आली होते. आग्रा मध्ये एकूण पंधराशे कावळे आहेत.
हे ऐकून बिरबल म्हणाला मी मोजलेल्या संख्या बरोबरच आहे त्यामध्ये तेव्हाच तफावत असेल जेव्हा आग्रा मधून काही कावळे बाहेर गेले असतील किंवा काही बाहेरचे पाहुणे कावळे आग्रा मध्ये आले असतील.
बिरबलाचे हे बोलणे ऐकून राजा खूष झाला आणि त्याला दहा हजार रुपये सुवर्णमुद्रा बक्षीस म्हणून दिल्या.
त्यावर तो मंत्री म्हणाला महाराज जर बिरबलाने मी केलेल्या प्रश्नांची उत्तरे व्यवस्थित दिली तर आपण त्याला मानू.
प्रश्न १ पृथ्वीचा मध्य कोठे आहे? प्रश्न २ आकाशात तारे किती आहेत? प्रश्न ३ पृथ्वीवर स्त्री-पुरुषांची संख्या किती आहे?
लगेच बादशहाने बिरबलाला आमंत्रण पाठविले. बिरबल लगेच दरबारामध्ये उपस्थित झाला. झालेली हकीकत बिरबलाला व्यवस्थित रित्या सांगण्यात आली.
बिरबल विचार करू लागला नंतर त्याने एक लाकडाची काठी आणली आणि ती दरबारामध्ये रोवली आणि म्हणाला हा आहे पृथ्वीचा मध्य विश्वास बसत नसेल तर मोजून पहा.
तिसऱ्या प्रश्नाची म्हणजे स्त्री व पुरुषांची संख्या किती आहे याचे उत्तर देताना बिरबल म्हणाला स्त्री-पुरुषांची संख्या तेव्हाच समान होईल जेव्हा ह्या मंत्र्याला आपण ठार मारू कारण हा ना तर स्त्री आहे ना तर पुरुष.
हे ऐकताच तो मंत्री दरबार सोडून पळून गेला व अकबराने बिरबलाच्या सत्कार केला आणि प्रशंसा करत राहिला.
यावर अकबर म्हणाला सात-आठ दिवस घे पण मला बैलाचे दूध आणून दे. हे झाल्यानंतर बिरबल त्याच्या घरी गेला. काही वेळाने तो त्याच्या मुलीला म्हणाला मी सांगेन तसे करायचे. महाराज अकबर यांच्या महालाच्या बाजुलाच एक नदी आहे त्या नदीवर मध्यरात्री जाऊन जोरात कपडे धुवायचे त्याचा आवाज अकबर यांच्यापर्यंत गेला पाहिजे.
वडिलांचे बोलणे ऐकून दुसर्या दिवशी मध्यरात्री बिरबलाच्या मुलीने तसेच केले. ती मध्यरात्री त्या नदीवर गेली आणि तिथे जोरात कपडे आपटून लागली. या होणाऱ्या जोरदार आवाजामुळे अकबराची झोप मोड झाली आणि तो क्रोधित झाला. त्याने शिपायांना आदेश दिला जो कोणी मध्यरात्री जोरात आपटून कपडे धूत आहे त्याला तात्काळ माझ्याकडे घेऊन या.
शिपायांनी त्यांच्या महाराजांचा आदेश पाळला आणि त्या मुलीला घेऊन ते महालात आले. महालात आल्यानंतर अकबराने विचारपूस केली एवढी गरजच काय एवढ्या रात्री कपडे धुवायची?
त्यावर त्या मुलीने घाबरत घाबरत उत्तर दिले काल मला खूप काम होते कारण माझ्या वडिलांना मूळ झाले. त्यामुळे माझा सर्व दिवस याच कारणामुळे व्यक्त केला. म्हणून माझी इतर कामे झाली नाहीत त्यामुळे मी एवढ्या रात्री माझी कामे करण्याचा निर्णय घेतला म्हणून मी मध्यरात्री कपडे घेऊन नदीवर धुण्यासाठी आले.
यावर अकबर बोलला काय बोलतेस!!! पुरुषाला मूल कसे होईल?
त्यावर त्या मुलीने उत्तर दिले 'हो महाराज तुमचे बरोबर आहे जसे बैल दूध देऊ शकतो तसेच पुरुष देखील मुले देऊ शकतोस ना?'
यावर लगेच अकबराला कळाले की व्यक्ती बहुदा बिरबलाने पाठवली असावी. नंतर त्या मुलीने अकबराला संपूर्ण गोष्ट सांगितली आणि अकबराने आपली चूक मान्य केली.
मंदिराच्या गाभार्यातील ब्रह्मदेवाच्या चतुर्मखी म्हणजे चार मुखे असलेल्या मूर्तीला वडील भक्तिभावाने नमस्कार करू लागले, तेव्हा भुकेने कासावीस झालेला महेश रडू लागला. हे बघून वडिलांनी त्याला विचारले, ''महेश, का रे बाळा असा का बर रडतोस आहे ?''
आई आपल्याला जेवण करून जा, असे सांगत असूनही आपण तिचे ऐकले नाही. आणि आता जर वडिलांना सांगितले, तर ते आपल्यास रागवतील, अशी भीती वाटून हजर जबाबी महेश वडिलांना म्हणाला, ''बाबा, मला एकच नाक आहे व सर्दी झाल्यानंतर ते वाहू लागले की, पुसून-पुसून नाकी नऊ येतात, तर मग या चार मुखे असलेल्या ब्रह्मदेवाला सर्दी झाली आणि याची चारही नाके एकाच वेळी वाहू लागली, तर याचे कसे हाल होत असतील ? त्याच्या त्या वेळी होणार्या फक्त कल्पनेनेच मला रडायला येत आहे.''
आपला मुलगा का रडत आहे, हे माहीत असल्यामुळे त्याने सांगितलेली सबब ऐकताच वडील आश्चर्यचकित झाले आणि म्हणाले, ''बाळा, तू पुढे फार मोठा माणूस होशील.''
तसेच एकदा महेश सोळा वर्षांचा असताना एकटाच रानातील रस्त्याने परगावी चालला होता. इतक्यात एका झाडीतून एक वाघ बाहेर आला आणि त्याच्या अंगावर धावला. तेव्हा त्याच्याशी महेशने कडवी झुंज देऊन त्याला पळून जाण्यास भाग पाडले. तेव्हापासून अंगात वीराचे असलेल्या महेशला लोक मोठ्या प्रेमाने 'वीरबल' असे म्हणू लागले, आणि पुढे वीरबल म्हणता-म्हणता त्याचे नाव बिरबल झाले.
बिरबलची खिचडी
बिरबलाला तंबाखू खाण्याचा नाद होता. हुक्की आली, ती तो मधूनच तंबाखूची चिमूट तोंडात टाकून बराच वेळ ती चघळत असे.
एकदा तो आणि बादशहा परप्रांतात गेले होते. सांयकाळच्या वेळेस ते फिरायला म्हणून गावाबाहेर गेले तेव्हा त्यांना वाटेत एक तंबाखूचे शेत दिसले. त्यात तंबाखूची रोपटी चांगलीच तरारून उठली होती. अशातच एक गाढव तेथून चालले असता मधूनच ते गाढव तंबाखूच्या झाडाचा वास घेई आणि न खाताच पुढे निघून जाई. असे त्याने दोन-चार वेळा केले, बिरबलाला टोमणा देण्याच्या हेतूने बादशहा म्हणाला, ”बिरबल, बघितलंस ना? तो गाढवसुद्धा तंबाखूला तोंड लावीत नाही.”
तेव्हा बिरबल म्हणाला, ”महाराज, अहो ते बोलून-चालून गाढवच. त्याला तंबाखू खाण्याची मजा काय कळणार?”
बिरबलाने आपल्याला फिरवून टोमणा मारल्याचे पाहून बादशहा फारच केविलवाणा झाला
एकदा अकबर बादशहाचा दरबार भरलेला असतो. तेथे बिरबल सुद्द्धा असतो. तेव्हा अकबर बादशहा सर्व दरबारातील लोकांना त्याला पडलेले स्वप्न सांगतो.
अकबर बादशहा म्हणतो : मला आज रात्री स्वप्न पडले की, ” मी एका मधाच्या डबक्यात पडलेलो, आणि बिरबल एका चिखलाच्या डबक्यात पडलेला होता. ”
त्यावर बिरबल म्हणतो : ”बादशहा मला हि असेच स्वप्न पडलेले होते, पण त्यात तुम्ही मला आणि मी तुम्हाला चाटत होतो.”
त्या नंतर कधी बादशहाने बिरबलची थट्टा-मस्करी केली नाही.
एकदा एक कवी श्रीमंत माणसाकडे गेला .त्याने आपल्या सर्व कविता गावून दाखविल्या कवीला वाटले आपलेला काही तरी बक्षिस मिळणार परंतु तो श्रीमंत माणूस अतिशय चिकू होता .तो कवीला खुश करण्यासाठी म्हणाला तुमच्या कविता एकूण मी फारच खुश झालो आहे .उद्या तुम्ही परत माझ्या घरी या म्हणजे मी हि तुम्हाला खुश करून टाकेन बक्षीस मिळाले नाही म्हणून कवीला वाईट वाटले परंतु परंतु उद्या बक्षीस भेटेल या आशेवर कवी घरी निघून गेला दुसऱ्या दिवशी ठरलेल्या वेळी न चुकता तो त्या श्रीमंत माणसाच्या घरी हजर झाला .परंतु बराच वेळ झाला तरी श्रीमंत त्याला बक्षीस देण्याच नाव काढीना अखेर कवी घरी जाण्यासाठी उठला तेव्हा श्रीमंत म्हणाला कविराज आपण मला काल कविता ऐकवून खुश केलत तस तुम्ही उद्या माझ्या घरी या मी तुम्हाला खुश करून टाकेन अस म्हणून खुश केल प्रत्यक्षात तुम्ही मला काही दिल नाही .मी हि तुम्हाला काही दिल नाही आपला व्यवहार संपला या आता परत केव्हातरी बिचारा निराश होऊन निघून गेला एकदा संधी साधून घडलेली हगिगत बिरबलाला सांगितली बिरबलाने त्या श्रीमंत माणसाशी ओळख करून घेतली मैत्री वाढवली आणि एक दिवस त्याला आपल्या घरी जेवायला बोलवले कवीलाही त्याने आमंत्रण दिले सर्व मंडळी बिरबलाच्या घरी जमा झाली .तो कंजूष घरी येण्यापूर्वी सर्वांनी जेवून घेतले आणि ते गप्पा मारू लागले थोड्या वेळाने तो श्रीमंत हि घरी आला व त्या गप्पात सामील झाला.
परंतु बराच वेळ झाला तरी बिरबल जेवनाच नाव घेईना न राहवून श्रीमंत म्हणाला जेवायचं नाही का? त्यावर बिरबल म्हणाला आपलेला फक्त खुश करण्यासाठी म्हणालो उद्या माझ्या घरी जेवायला या कंजूष श्रीमंत जे समजायचे ते समजला आणि काही न बोलता निघून गेला
तात्पर्य-
मित्रांनो, आयुष्यात असे क्षण येतील जेंव्हा तुम्ही खचून जाणार, पण लक्षात ठेवा जे होतं ते चांगल्यासाठीच होतं….कदाचित पुढे त्याचा ऊपयोग तुमच्या चांगल्यासाठी होईल…!!!
तो म्हणाचा, ‘‘मी या कलेत पारंगत झालो, कारण माझ्या वडिलांनी ही विद्या मला शिकवली. वयाच्या आठव्या वर्षापासून मी पान लावतो आहे. ते आपल्या पसंतीला उतरते, हे माझे परमभाग्य आहे. माझ्या अंगांगात ही कला भिनली आहे. आणि आपल्याकडून तिचे कौतुक झाल्याने मी धन्य झालो आहे.’’
बादशहा अकबर कुठेही जाताना शौकतअलीला आपल्याबरोबर घेऊन जायचे. जेवणानंतर ते हमखास पान खात असत. अशीच तीन वर्षे गेली.
एके दिवशी शौकतअलीच्या हातून पानांत चुना थोडा जास्त पडला. बादशहाने ते पान खाल्ल्यावर त्याची जीभ भाजली.
त्यामुळे पान थुंकून देत तो म्हणाला, ‘‘तुझे पान खाल्ल्याने माझी जीभ भाजली. विडा करण्यात माझा हात कोणीही धरू शकणार नाही, असे म्हणत असतोस. त्यावेळी तुला लाज वाटली नाही?’’
शौकतअली भीतीने थरथर कांपू लागला.
आपली भाजलेली जीभ सारखी बघत बादशहा म्हणाला, ‘‘शौकतअली, आत्ताच्या आत्ता जाऊन तुझी पिशवी भरून चुना आण. समजलं?’’
या अपराधासाठी बादशहा आपल्याला तुरूंगात टाकतील कीं आपला शिरच्छेद करतील, असा विचार करीत शौकत दुकानांत गेला.
पिशवी चुन्याने भरल्यानंतर दुकानदाराने विचारले, ‘‘एवढा चुना कां नेतोस?’’
‘‘मलाही माहित नाही. बादशहाने मागवला आहे.’’ नेमका त्याच वेळी महेशदास तिथे आला. त्याने विचारले, ‘‘बादशहांनी इतका चुना कां मागवला आहे?’’
पिशवी चुन्याने भरल्यानंतर दुकानदाराने विचारले, ‘‘एवढा चुना कां नेतोस?’’
‘‘मलाही माहित नाही. बादशहाने मागवला आहे.’’ नेमका त्याच वेळी महेशदास तिथे आला. त्याने विचारले, ‘‘बादशहांनी इतका चुना कां मागवला आहे?’’
‘‘बादशहांनी अशी आज्ञा कां केली, ते मलाही समजत नाही’’ शौकतअली दीनवाण्या स्वरांत म्हणाला.
‘‘बादशहांनी यापूर्वीं कधी अशी आज्ञा केली होती कां?’’ महेशदासने विचारले.
शौकतअली म्हणाला, ‘‘कधीच नाही.’’
‘‘मग एक काम कर. भरपेट तूप पिऊन जा.’’ महेशने उपाय सांगितला.
‘‘आधीच मी जाड्य़ा, त्यांत माझे पोट सुटलेले आहे. तूप पिऊन जायला सांगून माझी खिल्ली उडवता कीं काय?’’ शौकतने विचारले.
‘‘मी तुझी खिल्ली उडवत नाही. तुझ्या चांगल्यासाठी सांगतो आहे. बादशहांच्या समोर जाण्यापूर्वी पोटभर तूप अवश्य पी. असे केल्यानेच तुझा प्राण वाचेल. मला आता लवकर निघायला हवे’’ असे म्हणून महेशदास तेथून निघाला.
शौकतअली विचारांत पडला. चुन्याची पिशवी घेऊन घरी आला आणि बायकोकडून तूप मागवले. मग ते पोटभर प्यायला.
‘‘हे काय करताहात? असे बायकोने विचारले. तो कांही न बोलताच घाईने बाहेर पडला आणि बादशहांसमोर हजर झाला.
त्याच्याकडे न पहाताच ‘‘आलास?’’ असे म्हणून बादशहाने एका दरबार्याला सांगितले, ‘‘याला बाहेर घेऊन जा व तो चुना खायला घाल.’’
‘‘हीच तुझी शिक्षा आहे’’ अकबर बादशहा गंभीरपणे म्हणाला. दरबारी त्याला बाहेर घेऊन आला व त्याला चुना खाण्याची आज्ञा केली.
राजाज्ञेचे उल्लंघन कसे करणार? म्हणून दोन्ही मुठी भरून चुना त्याने खाल्ला. आणि तेवढा चुना खाऊनच तो बेशुद्ध पडला. इतक्यांत, बादशहा तेथे आले व शौकतला पाहून म्हणाले, ‘‘अजून हा जिवंत आहे?’’
महत्प्रयासाने अली उठला व म्हणाला, ‘‘तूप प्यायल्यामुळे वाचलो, खाविंद.’’
‘‘तूप कां प्यायलास?’’ बादशहाने विचारले.
‘‘मी चुना खरेदी करत असताना महेशदास नांवाचा एक तरुण तेथे आला व त्याने सल्ला दिला कीं, तूप पिऊन महाराजांसमोर जा. बरे झाले, मी त्याचे ऐकले’’ शौकत म्हणाला.
‘‘तो महेशदास कोठे आहे? लवकर जा आणि त्याला माझ्याकडे घेऊन ये’’ अकबराने हुकूम केला.
थोड्य़ाच वेळांत शौकतअली महेशदासला घेऊन तेथे आला. त्याला पहाताच बादशहा म्हणाला, ‘‘छान बिरबल, तर हे तुझे काम आहे. शौकतअलीला तूप प्यायला कां सांगितलेस?’’
‘‘शौकतअलीने तूप पिऊन येऊ नये, अशी कांही आपली आज्ञा नव्हती. खाविंद, माफ करा. आपण अलीला पिशवीभर चुना आणण्याची आज्ञा केलीत. तेव्हांच मला अंदाज आला कीं, आपण त्याला शिक्षा देण्यासाठीच ही आज्ञा केली आहे. म्हणूनच मी त्याला तूप पिऊन येण्याचा सल्ला दिला. नाहीतर तो लगेचच मरण पावला असता’’ बिरबल म्हणाला.
‘‘तो मेला असता तर तुझे काय बिघडले? जास्त चुना घालून याने माझ्या जिभेला चटका दिला. त्याला शिक्षा झालीच पाहिजे.’’ अकबर म्हणाला.
‘‘शौकतअलीच्या मृत्यूने माझे कांहीच बिघडले नसते. त्यामुळे आपलेच नुकसान झाले असते. गेली तीन वर्षे तो आपल्या सेवेत आहे. आपण मला कित्येक वेळा सांगितले आहे कीं, त्याने तयार केलेले पान उत्तम असते. अशी व्यक्ती मरण पावली तर सर्वोत्तम पानवाला कसा मिळेल? तो आपल्यावर अवलंबून आहे. माणसाच्या हातून सहज चूक घडूं शकते. अनवधानाने झालेली चूक माफ करणे, हेच आपल्यासारख्या बादशहालाच शोभते’’ बिरबल म्हणाला. शौकत अलीने वांकून पुन्हां मुजरा केला.
ते पाहून बादशहा म्हणाला, ‘‘वांकून जमिनीला डोके टेकवायला सांगितले असते, तर बरे झाले असते. तीच तुझ्यासाठी योग्य शिक्षा ठरली असती.’’
नंतर क्षणार्धाने बादशहा अकबर हंसून अलीला म्हणाला, ‘‘ठीक आहे. जे झाले, ते झाले. ताबडतोब आम्हा दोघांसाठी उत्तम पान तयार करून दे.’’
तुम्ही, मी आपण सर्वजण अकबर बिरबलाच्या गोष्टी ऐकतच लहानाचे मोठे झालो. यातील बिरबल ही व्यक्ती अतिशय हुशार,चतुर,कुशाग्र बुद्धिमत्ता असलेली. आपले म्हणणे समोरच्या व्यक्तीच्या गळी उतरवायचं असं कौशल्य बिरबलाकडे होतं की समोरची व्यक्ती कुणी सर्वसामान्य असो किंवा खुद्द अकबर बादशाह असो, बिरबलाच्या बुद्धीचातुर्यापूढे सपशेल दंडवत घालायचाच अशा या विद्वान व चतुर बिरबलाचा मृत्यू कसा झाला हे जाणून घ्यायचय ? असं म्हणतात की बिरबलाला अकबर फक्त प्रधानच नव्हे तर राजा बनवू इच्छित होता. ही गोष्ट तेंव्हाची आहे जेंव्हा हिमाचल प्रदेशातील कांगडावर राजा जयचंद्र चे राज्य होते. इसवी सन १५७० ला राजा जयचंद्राने दिल्ली व आग्रा शहरात हवेली बांधून घेतली होती. मुघल व कांगडा राज्यात विस्तव सुद्धा अडवा जात नसे व काही ऐकीव गोष्टींनुसार हेच कारण होते अकबराने राजा जयचंद्रला कैद करण्याचे राजा जयचंद्रास कैद करण्यामुळे जयचंद्राचा मुलगा बिथरला. त्याने स्वतःला राजा घोषित केले व अकबराविरुद्ध उठाव केला. अकबराने राजा जयचंद्राचा मुलाचा बीमोड करण्यासाठी आपल्या आधिपत्याखाली असलेल्या पंजाब प्रांतातील सुभेदार हुसेन कुली खान यांस कांगडा वर हल्ला करण्याचे आदेश दिले.
अकबराच्या आदेशानुसार सुभेदार कुली खान सैन्य व युद्ध सामग्री घेवून कांगडा कडे निघाला. कांगडा ला हादरा देण्यासाठी कुली खानने एक योजना आखली. प्रथम त्याने दिल्ली प्रांतातील कोटलाच्या किल्ल्यावर हल्ला चढवला कारण कांगडावर हल्ला करताना कुलीखानला या कोटला नजीकच्या किल्यावर तैनात असलेल्या कांगडाच्या सैन्यतुकडीचा व्यत्यय नको होता. या युद्धात मुघलांची सरशी झाली व दोन दिवसांनंतर मुघलांचा सैन्याने कुलीखानच्या नेतृत्वाखाली कांगडावर हल्ला केला व तेथील एका किल्ल्यास वेढा दिला. कांगडाचे सैन्यबल तोकडे होते व त्यांचा मुघलांसमोर टिकाव मुश्किल होता. मुघलांचा कांगडावर विजय जवळजवळ निश्चित होता तोच एक बातमी अकबराला मिळाली की पंजाब प्रांतात मुघलांविरुद्ध उठाव झाला त्यामुळे नाइलाजाने अकबराने कुलीखानला हे बंड मोडून काढण्याचे आदेश दिले. पण अकबराला एक बाब सलत होती ती म्हणजे, जवळजवळ काबिज केलेले कांगडा त्याला पूर्णपने जिंकता आले नव्हते. काहीही करून त्याला हाती आलेले कांगडा गमवायचे नव्हते. त्याने राजा जयचंद्र व त्याचा मुळाशी बोलणी सुरू केली व या चर्चेदरम्यान अनेक तह व अटी ठरवल्या गेल्या.ठरल्याप्रमाणे बिरबलास किल्ल्याचा प्रवेश द्वाराजवळ एक मस्जिद बांधून देण्यात आली आणि मुबलक प्रमाणात सोने-नाणे देण्यात आले अर्थात बिरबल आता राजा झाला होता. अनेक इतिहासकारांनी त्याचा उल्लेख राजा असा केलेला तुम्हाला पाहायला मिळेल. पण बिरबलास आपण संपूर्ण राज्य देवू शकलो नाही ही खंत अकबराच्या मनात होती म्हणून त्याने बिरबलाला आपल्या विशेष सैन्यातील एक तुकडी उपहारस्वरूप दिली. सर्व काही सुरळीत चालू असतांना एके दिवशी अकबराला एक वार्ता समजली की अफगाणिस्तानातील बाजौर या प्रांतात काही दरोडेखोर व लुटारू सामान्य नागरिकांचा साधन संपत्तीची लूट करत आहेत. लोकांना त्या भागात राहणे मुश्किल बनले असून अनेक नागरिकांनी लुटारू व दरोडेखोरांच्या भीतीने स्थलांतर केले असून बाजौर जवळजवळ उजाड झाले आहे. ही बातमी समजताच अकबरने आपल्या एका सरदारास ज्याचे नाव जेनखान कुका असे होते त्यास लुटारूंचा बीमोड करावयास पाठवले सोबत सैन्य व युद्धासाठी आवश्यक सामग्री ही दिली. जेन खान मजल दरमजल करत अफगाणीस्तानच्या दिशेने जात होता. प्रचंड जंगल व दुर्गम भाग पार करत करत तो अखेर अफगाणला पोहोचला तिथे पोहोचल्यावर सर्वप्रथम मुघलांचा सामना अफगाणी यूसुफझाई कबिल्याशी झाला.
अफगाणिस्तानात तिघे जेंव्हा एकत्र भेटले तेंव्हा बिरबलने एक रणनीती ठरवली पण नेहमीप्रमाणे या तिघांचे एकमत होऊ शकले नाही व ते तिघेही वेगवेगळ्या वाटेने निघाले. बिरबल आपल्या वाटेने निघाला व ३-४ कोस प्रवास करून रात्री मुक्कामी आपल्या सैन्यासाह एका ठिकाणी त्याने डेरा टाकला. आणि इथेच घात झाला. पुढे जे होणार होते ते बिरबलच्या ध्यानीमनीही नव्हते.
कारण….. ती रात्र बिरबलच्या आयुष्यातली अखेरची रात्र होती. कारण बिरबलाने ससैन्य जिथे डेरा टाकला तिथे अफगाणी आधीच दबा धरून बसले होते. अफगाण्यांनी मुघल सैन्यास चहूबाजूंनी घेरले व बाण आणि दगडांचा वर्षाव केला. मुघल सैन्यामध्ये अफरातफरी माजली मुघल सैरावैरा पळू लागले, घोडे बिथरले होते. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे मुघल छावणीत हल्लकल्लोळ माजला होता. तीर आणि दगडांनी अनेक मुघल सैनिक घायाळ झाले व काही सैनिक तर जागीच ठार झाले होते. त्यातच एका बाणाने बिरबलाचा वेध घेतला. त्या काळोख्या रात्रीत बिरबलाने स्वतःला वाचविण्याचा खूप प्रयत्न केला पण बिरबलाचा काळ जवळ आला होता व त्या रात्री एका महान राजनीतीज्ञ, कुशल व कर्तव्यनिष्ठ अशा महान बिरबलाचा मृत्यू झाला.
मित्रांनो अकबराने घेतलेल्या या एका निर्णयामुळे महान बिरबलाचा मृत्यू झाला. अर्थात अकबराला तरी याची कुठे कल्पना होती की आपण आपल्या दरबारातील रत्नास मृत्युचा दाढेत पाठवतोय. अकबर बिरबलाच्या अनेक कथा अतिशय प्रसिद्ध आहेत पण बिरबलचा मृत्यू नेमका कसा झाला याविषयी फारशी माहिती कुणाला नाही. आम्ही या लेखातून तुम्हाला ही माहिती देण्याचा केलेला हा प्रयत्न