नागोराव सा. येवतीकर

Saturday, 3 April 2021

04/04/2021 Tea

हाच तो चहा
टपरीवरचा चहा
एकदा पिऊन पहा
त्यात असते प्रेम
अन थोडं जिव्हाळा
कुठे ही मिळत नाही
असा गोड चहा
घोटभर पिताक्षणी
दूर करी कंटाळा
किंमत असते कमी
म्हणून टाळू नका
चव घेतल्याशिवाय
तुम्ही राहू नका
चार पैसे मिळती
संसार चाले त्याचा
एक कप चहा पिऊन
हातभार द्यायचा

- नासा येवतीकर, धर्माबाद
  9423625769

Thursday, 1 April 2021

बेरोजगारी

बेरोजगारी 
सर्वात जास्त बेरोजगारी कोठे भारतात आढळून येते. वास्तविक पाहता काम करण्यासाठी येथे येथे उद्योगधंदे, कारखाने आणि आणि शेती आहे. मात्र येथील प्रत्येक नागरिक गलेलठ्ठ पगारीची नोकरी मिळावी म्हणून प्रयत्न करत राहतो. एवढं प्रयत्न करत राहतो की त्यात त्याचे कमावण्याचे वय निघून जाते. शरीराला आळस प्रिय बनलेला असतो मग कोणतेही काम करावेसे वाटत नाही. थोडं काम केल्यावर भरपूर पगार मिळाव असे त्याला वाटते. नोकरी मिळाली नाही म्हणून तो हताश होतो, नाराज होतो, स्वतःचा आत्मविश्वास गमावून बसतो आणि गैरमार्गाला लागतो. गुटखा खाणे, दारू पिणे ई. गैर मार्गामुळे तो पूर्णतः वाया जातो. त्याऐवजी स्वतःच्या डोक्यातील कल्पना व विचाराने छोटा-मोठा उद्योग चालू करून चार पैसे मिळवले तर बेरोजगारी समाप्त होऊ शकते. मात्र मोठे स्वप्न आणि मोठी आशा यामुळे नेहमीच निराशा पदरात पडते. यावर बेरोजगार युवकांनी विचार करावे.

02/04/2021

माझी कविता
मला कोणी लाईक करावं
म्हणून मी लिहित नाही
मनातल्या विचार भावना
 कवितेत व्यक्त करत राही

शब्दच देती मला प्रेरणा
शब्दांमुळेच मिळे चालना
अनुभव असता पाठीशी
बोलत जातो कवितेशी

कवितेची नि माझी अशी
नव्हती कधीच दाट मैत्री
वाचनाने कविता करू शकतो 
पटली मला देखील खात्री

कुणाला मी आवडतो तर
कुणाला माझ्या कविता
परमेश्वराच्या हातात सर्व
तोच आहे कर्ता नि करविता

- नासा येवतीकर, धर्माबाद
   9423625769

स्वप्नातलं घर

प्रत्येकाचं एक स्वप्न असतं
घर असावं आपल्या हक्काचं
तेथे चालावी आपलीच मर्जी
राहावं आपल्या मनासारखं
संपूर्ण आयुष्याची जमापुंजी
लावतो स्वप्नांच्या पूर्तीसाठी
अहोरात्र कष्ट करत राहतो
सर्वजण सुखी राहण्यासाठी
कित्येकांचे स्वप्न धुळीस मिसळतात
कित्येकजणांचे प्राण ही जातात
लग्न करावे पाहून नि
घर पाहावे बांधून
जुने जाणते लोकं म्हणतात
झोपडी, कौलारू वा बिल्डिंग
घर कसे ही असो शेवटी
ते स्वप्नातील घरच असते
निवाऱ्याचे एक स्थान असते
घराला जास्त महत्व देऊ नये
स्वप्नपूर्ती करतांना आपल्या
शरीराला जास्त त्रास देऊ नये. 

- नासा येवतीकर, धर्माबाद
  9423625769

Wednesday, 31 March 2021

01/04/2021 April Fool

एप्रिल फुल
एक एप्रिल रोजी लोकांना एप्रिल फुल करण्याची एक प्रथा आहे. एप्रिल फुल म्हणजे मूर्ख बनविणे. फक्त आजच्या दिवशी लोकांना मूर्ख बनविले तर माफ असते कारण शेवटी कळते की एप्रिल फुल केलंय. पण कधी कधी याचा खूप राग येतो. एका हिंदी गाण्यात हे म्हटलं आहे, " एप्रिल फुल बनाया, तो उनको गुस्सा आया ।" मित्रांनो, हे ही खरंय, मित्रांना खूप राग येईल अशा प्रकारचा कोणतेही कृत्य करू नये. हसी मजाक कधी कधी अंगावर बेतण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून इतरांना मूर्ख बनवतांना थोडी काळजी घेतली तर त्या मजेची किरकिर होत नाही. पण अजून काही गोष्टीची यानिमित्ताने उजळणी घ्यावी असे वाटते. फक्त या एकाच दिवशी आपण मूर्ख बनवल्या जातो का ..... ? 
समाजात असे अनेक लोकं, अनेक मंडळी आहेत, जे की आपणाला बऱ्याच वेळा एप्रिल फुल केले आहे. किराणा दुकान असो वा कोणतेही दुकान तेथे आपणाला बहुतांश वेळा मूर्ख बनविल्या जाते. पैसे कमावण्याच्या नादात तो आपणाला म्हणजे ग्राहकाला नेहमीच लुबाडत असतो. त्याच्यावर कोणाचेही अंकुश नसते, शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून तो आपला व्यवसाय वाढवतो आणि बंगल्यावर बंगले बांधतो. इकडे सामान्य नागरिक मात्र दररोज लुबाडल्या जातो, म्हणजे त्याला नेहमीच एप्रिल फुल केल्या जाते. ज्या ज्या ठिकाणी भेसळ होते त्या त्या ठिकाणी लुटला जाणारा सामान्य नागरिकच असतो, हो ना. सर्वात जास्त नागरिकांना एप्रिल फुल केल्या जाते ते म्हणजे राजकारणी लोकांकडून. होय, ही मंडळी निवडणुकांच्या वेळी खूप मोठी आश्वासन देत मतदारांना दिवसा स्वप्न दाखवतात, जेंव्हा निवडून सत्तेवर जातात तेंव्हा त्यांनी दिलेल्या आश्वासनाची त्यांना साधी आठवण देखील नसते. कारण पुढच्या निवडणुकीत पुन्हा तोच अजेंडा असतो. मतदारांना तर ते निव्वळ मुर्खच समजतात. बिचारे, मतदार तरी काय करणार म्हणा, तो देखील शेवटी कुणाच्या तरी आशेवरच जगत असतो. लहानपणी आई काही तरी खोटेनाटे बोलून आपल्याकडून काम करवून घेत असे. बाबा ही कधी तरी खोटे बोलून आपली सुटका करून घेत असत. ताई आणि दादा काही वेगळं सांगणं नको, ते देखील त्यांच्या कामासाठी कधी तरी खोटे बोलत असतातच. प्रेयसी व प्रियकर यांच्यात अधूनमधून असे घटना घडतच राहतात. नवरा-बायको या दोघांत देखील असेच नाट्यमय वळण चालूच राहते.  म्हणून म्हणावेसे वाटते मानवाच्या जीवनात एक एप्रिल रोजीच एप्रिल फुल नसून पदोपदी तेच जीवन आहे. कुठे कळत असते तर कुठे नकळत होत असते. 

- नासा येवतीकर, 9523625769
लेख आवडल्यास comment मध्ये अभिप्राय द्यायला विसरू नका.


कविता 
*..... एप्रिल फुल .....*

आई बाबा दादा ताई यांना
सर्वानाच लागली होती चाहूल
आज घरातला छोटा बंटी
करणार आहे सर्वाना एप्रिल फुल

सकाळपासून लागला कामाला
एक छानशी संधी शोधू लागला
खूप विचार नि अनेक कल्पना
पडले नाही एक ही कामाला

आईला चकवून पाहिलं तसं
बाबांना ही त्याने चकवलं
ताई दादांनी दादच नाही दिलं
बंटी मग नाराज होऊन बसलं

जीवनात नेहमी जागृत राहावं
कुणाच्या बोलण्यात फसू नये
खोटे खोटे बोलून आपण ही
दुसऱ्याला कुणाला फसवू नये

खरी शिकवण मिळाली बंटीला
एप्रिल फुलच्या दिवशी खास
सर्वाना धन्यवाद देत म्हणाला
बनवणार नाही कोणाला मूर्ख
आजपासून ठेवा माझ्यावर विश्वास

- नासा येवतीकर, धर्माबाद
    *9423625769*

🌿 🌹 🍃 🌹 ☘️  🍀



shivjaynti

शिवजयंती


आमचे लाडके राजे श्री छत्रपती
त्यांची आज आहे शिवजयंती
कुलदैवत हे संपूर्ण महाराष्ट्राचे

सेनापतीसह मायबाप मावळ्यांचे

जगभर पसरली त्याची कीर्ती
नाव घेताच तनामनात येते स्फूर्ती
सर्वगुणसंपन्न स्वभावाने प्रेमळ
त्यांच्या सहवासात होई सारे निर्मळ
जिजाऊंच्या स्वप्नपूर्तीसाठी लढले
दुश्मनाला हैराण करून सोडले
हर हर महादेवची गर्जना फोडू
चला पुन्हा एक एक मावळे जोडू
जय भवानी जय शिवाजीचा नारा देऊ
शिवाजी महाराजांचा जयकार करू

- नासा येवतीकर, धर्माबाद
  9423625769

Tuesday, 30 March 2021

31/03/2021 आत्मपरीक्षण

कोरोना आत्मपरीक्षण
तोंडावर ज्यांनी मास्क वापरले
कोरोना त्याच्यापासून दूर राहिले

वारंवार ज्यांनी हात स्वच्छ धुतले
विषाणू त्यांच्या घरात नाही शिरले

ज्यांनी लोकांशी संपर्क केला कमी
आयुष्याची त्याला मिळाली हमी

विनाकारण ज्याने बाहेर गेलाच नाही
कोरोना त्याच्याजवळ आलाच नाही

ज्यांनी घेतली नाही थोडी काळजी
त्यांना लागली आता घोर काळजी

ज्यांनी केली नाही कशाची चिंता
त्यांची जळत आहे सरणावर चिता

कोरोनाने आपली का वाट लावली
आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली

शासनाच्या कोरोना नियमाचे पालन करा
संकटाचे हे ही दिवस जातील थोडं दम धरा

- नासा येवतीकर, धर्माबाद
   9423625769
🌿 🌹 🍃 🌹 ☘️  🍀

Monday, 29 March 2021

29/03/2021 maan

सांग तुझ्या मनात आहे तरी काय
येता जाता मला पाहतोस काय ?
डोळ्याने असा खुणावतोस काय ?
न बोलता मला कळेल तरी काय ?
सांग तुझ्या मनात आहे तरी काय ?

मोबाईलवर कॉल करून बोलत नाय
हॅलो हॅलो म्हटलं तरी उत्तर देत नाय
आवाज ऐकण्या फोन करतो की काय ?
सांग तुझ्या मनात आहे तरी काय ?

आजकाल तुझे पत्र कोरेच येतात
कुणी तरी वेडा आहे असं समजतात
किती दिवस असेच चालणार हाय
सांग तुझ्या मनात आहे तरी काय ?

गुपचूप सांग कोणी ऐकणार नाय
तुझ्यावर कोणी रागावणार नाय
अशी संधी पुन्हा कधी मिळणार नाय
सांग तुझ्या मनात आहे तरी काय ?

 - नासा येवतीकर, धर्माबाद
   *9423625769*

🌿 🌹 🍃 🌹 ☘️  🍀

Sunday, 28 March 2021

29/03/2021 rang

*..... रंग झाले मी ......*

चिंब झाले मी, दंग झाले मी
मित्रांसंगे खेळून, गुंग झाले मी

रंग झाले मी, भंग झाले मी
इंद्रधनुष्याचे सप्तरंग झाले मी

अभंग झाले मी, गंध झाले मी
फुलाफुलातील सुगंध झाले मी

अंग झाले मी, संग झाले मी
प्रवचनातून सत्संग झाले मी

मंद झाले मी, तंग झाले मी
तुझ्या हातातील पतंग झाले मी

छंद झाले मी, धुंद झाले मी
तुझ्या प्रेमात बेधुंद झाले मी

तरंग झाले मी, तवंग झाले मी
सत्यमेवसाठी दबंग झाले मी

आरंभ झाले मी, प्रारंभ झाले मी
श्री गणेशाने शुभारंभ झाले मी

 - नासा येवतीकर, धर्माबाद
   *9423625769*

🌿 🌹 🍃 🌹 ☘️  🍀

*...... रंग ........*
रंग लावू प्रेमाचा
रंग देऊ स्नेहाचा
रंग बांधू नात्याचा
रंग मनी हर्षाचा
रंग टाकू उल्हासाचा
रंग नव्या उत्सवाचा
रंग हा धुलीवंदनाचा

- नासा येवतीकर, धर्माबाद
    9423625769 

( पिरॅमिड रचना )

           हे 
          रंग
       आपल्या
       जीवनात
      सुखसमृद्धी
    निरोगी आयुष्य
   तुम्हा प्रदान करो

- नासा येवतीकर, धर्माबाद
 9423625769

चारोळी ... सप्तरंग 
लाल हिरवा काळा पिवळा
सप्तरंगात गेले मिसळून
आकाशाचा निळा रंग ही
विविध रंगात गेला न्हाऊन

- नासा येवतीकर, धर्माबाद

holi karu yaa

होळी करू या 
होळी करू या दुर्गुणाची
होळी करू या संशयाची
होळी करू या कुविचारांची
होळी करू या द्वेषाची
होळी करू या आळसाची
होळी करू या कपट बुद्धीची
होळी करू या वासनेची
होळी करू या लालसेची
होळी करू या मत्सरेची
होळी करू या व्यसनाची
होळी करू या वाईट संगतीची
होळी करू या वाईट बाबींची

- नासा येवतीकर, धर्माबाद
9423625769

उन्हाळ्यात घेऊ या काळजी

उन्हाळ्यात घेऊ या काळजी 
मागील तीन दिवसांपासून कमाल तापमान वाढत असून सध्या पारा थेट ३८-४० अंशापर्यंत सरकल्याने नागरिकांच्या अंगाची काहिली होत आहे. दुपारी एक वाजेपासून चार वाजेपर्यंत उन्हाचा तीव्र तडाखा जाणवू लागत आहे. त्यामुळे प्रत्येकांनी उन्हात बाहेर न पडता घरात किंवा ज्याठिकाणी सावली आहे अश्या ठिकाणी विश्रांती करणे आवश्यक आहे. अत्यंत आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे अन्यथा घरात थांबलेलेच बरे राहील. कारण अश्या तीव्र उन्हामुळे उष्माघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. उन्हात बाहेर निघताना छत्री, पांढरा रुमाल सोबत असणे आवश्यक आहे. लहान मुलांना शक्यतो बाहेर घेऊन जाणे टाळावे. शाळेत जाणारी मुले 12 च्या आत घरात येतील असे वेळापत्रक तयार करावे. शालेय मुलांनी स्वतः आजारी पडणार नाही याची काळजी जरूर घ्यावी. बाहेर पडताना सोबत थोडे पाणी नेहमी असू द्यावे कारण या वातावरणात आपल्या शरीरातील पाणी कमी त्यामुळे डीहायड्रेशन होण्याची शक्यता असते. त्याचसोबत जास्तीत जास्त पाणी पीत राहावे. या काळात शक्यतो फ्रीजमधील पाणी पिणे टाळावे. त्यापेक्षा नैसर्गिक थंड पाणी करून पाणी पीत राहावे. दुपारच्या वेळी विश्रांती घ्यावे. उन्हाचा त्रास सहन करण्यापेक्षा त्याची काळजी घेतलेली केव्हाही बरे. म्हणून आपण ही काळजी घ्या आणि इतरांना काळजी घ्यायला सांगू या. 

- नागोराव सा. येवतीकर
विषय शिक्षक, धर्माबाद, 9423625769

कविता - आलाय उन्हाळा

ऋतूमध्ये बदल झाला की
हवामानात देखील बदल होते
हिवाळ्याचा गारवा संपला की
हवेतील उष्णता जाणवू लागते

उन्हाचा चढत चाललाय पारा
उन्हाळ्याची लागली चाहूल
बाहेरच्या उष्णतेला पाहून
घराबाहेर पडत नाही पाऊल

आला उन्हाळा आरोग्य सांभाळा
बाहेर जातांना रुमाल बांधा डोक्याला
भरपूर पाणी प्या आराम करा
उन्हात न फिरता उष्माघात टाळा

सकाळ सायंकाळ कामे करा
दुपारच्या वेळी थोडं आराम करा
शरीराला येऊ देऊ नये थकवा
आरोग्याची काळजी घ्या जरा

- नासा येवतीकर, धर्माबाद
   9423625769