नागोराव सा. येवतीकर

Saturday, 2 April 2016

साहित्य मंथन ने काय दिले

Sahity Manthan
[4/2, 9:55 AM]
Utkarsh devanikar
ठीक 10 वाजता विचार मंथन विशेष भागास सुरुवात होत आहे..नियमांचे उल्लंघन होऊ नये अशी आपेक्षा आहे...🙏

[4/2, 10:07 AM]
Aravind Kulakarni a"nagar
विचारमंथन - भाग  50
* साहित्यमंथन * ने मला काय दिले
सुरू होत आहे

[4/2, 10:07 AM]
Utkarsh devanikar
चला तर मग करा सुरुवात...

💐🌹💐🌹💐🌹🌹💐🌹💐🌹💐🌹
[4/2, 10:16 AM]
Utkarsh devanikar
<---साहित्य मंथनने मला काय दीले--->

     साहित्य मंथनने मला काय दीले या सदरात लीहीत असताना शब्दभांडार अपुरा पडणार याची मला कल्पना होतीच..व झाले ही तसेच..
     कारण प्रश्न असा पडतोय की साहित्य मंथनने मला काय नाही दीलय..? जीवाला
जीव लावणारे मित्र दीले..जेष्ट
मंडळीचे आशीर्वाद दीले..मोठ्या व समवयस्क बहिणी दील्या..लहाण भावासमान मित्र दीले..
समजसपणा कसा असतो हे
समजले..थोडीबहोत नोकझोक दीली..थोडेबहोत हट्ट परवीले..थोडे कटु अनुभव दीले आणी भरभरुन प्रेम दीले..वेळोवेळी शिस्त शीकवली....आणी सर्वात महत्वाचे एक प्रेमळ परिवार दीला...आणखी काय लीहु
शब्द अपुरे आहेत.....

        कॉलेजमधे असताना कविता करायचो परंतु नंतर
पोट भरण्याच्या नादात सर्व
विसरुन गेलो होतो..साहित्य
मंथनने मला त्याची आठवण करुन दीली व मी परत लीहु
लागलो..मला प्लॅटफॉर्म मीळऊन देऊन माझ्यातील
कवी,लेखक जागा केला..मला गगन भरारीसाठी पंख दीले..
        आणखी काय लीहु..?
साहित्य मंथनने मला इतकं काही दीलं की ते मला शब्दात
सांगताच येणार नाही..इतकच
म्हणेन की धन्यवाद अरविंद सर..धन्यवाद साहित्य मंथन
💐🌹💐🌹💐🌹🌹💐🌹💐🌹💐🌹

[4/2, 10:27 AM]
‪+91 98603 14260‬
साहित्य मंथनने मला काय दिले?
                साहित्य मंथन या समूहात माझी प्रिय मैत्रिण सुनिताताई यांच्यामुळे माझा प्रवेश झाला.अरविंदजी यांचे व सुनिताताईंचे मनापासून धन्यवाद , या समूहात पहिल्याच दिवशी एकापेक्षाएक एरिल फुल या विषयावर चारोळ्या वाचायला मिळाल्या. सकाळी  बातम्या चांगले विचार वाचायला मिळाले.चांगले सुहृद मिळाले.
   सध्यातरी मी एवढेच म्हणू शकते, भाग मात्र सगळ्यात घेणार आहे.लिखाणाची नि वाचनाचीही आवड आहे .सर्वांना नमस्कार व धन्यवाद.
💐🌹💐🌹💐🌹🌹💐🌹💐🌹💐🌹

[4/2, 11:13 AM]
‪+91 83085 58995‬
साहित्यमंथनने  मला काय दिले?

       "साहित्यमंथन" मध्ये तशी मी नवागत आहे, तरी मला हा ग्रुप
माझा, हवाहवासा वाटतो.यातच
खरंतर या प्रश्नाचं उत्तर सामावलंय
        अरविंदसरांनी मला या
ग्रुपमध्ये स्थान दिलं आणि मी
नवोदित असतानाच चारोळीस्पर्धेच्या परीक्षकाचा सन्मान दिला , ही माझ्यासाठी
महत्वाची गोष्ट . सदस्यांना आपुलकी वाटावी, स्नेह वाटावा
इतका जिव्हाळा प्रत्येकाच्या
बाबतीत मला आढळून आला.

      त्याहीपेक्षा महत्वाची त्यांची
सामाजिक कर्तव्याची जाण .
त्यानेही मी भारावून गेलेय . माझ्या
वतीने मी रु.५००/- देऊ करतेय.

      धन्यवाद मंडळी !
💐🌹💐🌹💐🌹🌹💐🌹💐🌹💐🌹
[4/2, 11:21 AM] नासा येवतीकर, नांदेड

साहित्य मंथन ने काय दिले ?

हा प्रश्न जर इतर whatsapp ग्रूप च्या लोकांना विचारण्यात आले तर बाकीचे नक्कीच मुर्खात काढले असते आणि म्हटलं असते की whatsapp मुळे खरं काय मिळते ? काहीच मिळत नाही. उलट वेळ तर वाया जातोच शिवाय पैसे सुध्दा वाया जातात. परंतु साहित्य मंथन whatsapp ग्रूप मध्ये जॉईन झाल्यापासून असे काही घडले नाही. उलट याठिकाणी सर्व काही जिवाभावाचे मित्र मिळाले. अनेक वेगवेगळ्या प्रकारची साहित्यिक मंडळी भेटली. रामराव काकाची प्रत्यक्षात अहमदनगर मध्ये नवरंगच्या निमित्ताने भेट झाली आणि मी त्यांच्या उत्साह आणि धाडस दोन्ही बाबी ला सलाम केला. न भुतो न भविष्यति असे त्यांचे कार्य आहे. परमेश्वर त्यांना दीर्घायुष्य देवो हीच प्रार्थना. या परिवारातील दूसरे व्यक्ती अरविंद सर. ज्यांच्या कल्पनेतून हा परिवार एकत्र आला. वयाची साठी उलटल्यानंतरही त्यांची काम करण्याची प्रवृत्ती त्यांना शांत बसू देत नाही. याच त्यांच्या ध्येयाने नवरंग चारोळी संग्रह प्रकाशन शक्य झाले. कोणत्याच बाबतीत कमतरता न जाणवू देता सरांनी सुरेख पध्दतीने कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने परिवारातील सर्व साहित्यिक मंडळीच्या गाठीभेटी झाल्या. 25 डिसेंबर 2015 चा दिवस कसा उजाडला आणि मावळला कळलेच नाही. या निमित्ताने मात्र गजानन वारणकर, संदीप धोंडगे पाटील, दिलीप धामणे, जयश्री पाटील, अनिल हिस्सल, योगेश देवकर, राजेश काळे, जागृती निखारे, शिल्पा जोशी, सुलभा कुलकर्णी, गजानन पवार, वृषाली शिंदे अजून ही यादी भरपूर आहे. असे परिवारातील सदस्याची भेट ही अवर्णनीय नि अविस्मरणीय असे होते. एवढा मोठा परिवार कोणी दिला तर ते साहित्य मंथन परिवार ने दिला आहे. अजून बरेच काही मिळाले या साहित्य मंथन परिवार कडून ते थोड्या वेळाने पाहू या.

. . . . . फिर मिलेंगे इस छोटे से ब्रेक के बाद . . . . . . . .

*** आप कही नहीँ जाईयेगा . . . . .

हम जल्द ही लौटेगे . . . नासा के साथ

💐🌹💐🌹💐🌹🌹💐🌹💐🌹💐🌹
[4/2, 11:36 AM] Aravind Kulakarni a"nagar
साहित्यमंथन ने मला काय दिले

ना सा सर  तुमच्या सारखा कायम शिकत राहाणारा शिकवत राहाणारा हडाचा शिक्षक , विनयशिल ,नंम्र व हुषार मित्र मला साहित्यमंथन मुळे मिळाला "ना सा येवतीकर ब्लाॅग स्पाॅट सारखी लोकप्रिय वेबसाईट (हक्काची ) मिळाली !
खुप खुप धन्यवाद !

[4/2, 11:40 AM] Bhuddewar Kranti
साहित्यमंथनने मला काय दिले?-

            सर्वप्रथम मी आभार मानतो आप्पासाहेब सरांचे🙏🏽 कारण आमची तेवढी ओळख नसताना देखील त्यांनी मला पर्सनली बोलून या ग्रुपमधे घेतले.

             आप्पा सरांची ओळख होण्याअगोदर जेंव्हा जेंव्हा नासा सर साहित्यमंथनच्या स्पर्धेत क्रमांक मिळविल्याचा ग्राफ़िक्स फेसबुकवर टाकायचे तेंव्हा प्रत्येकवेळी वाटायचे की मी सरांना म्हणाव की सर मला पण त्या ग्रुप मधे यायचे आहे........ पण कधी म्हणालो नाही..
परंतु असेच एकदा खुल्या चारोळी स्पर्धेत भाग घेतला आणि आलो ग्रुपमधे..
आणि तुमचा सहवास लाभला.

              येवतीकर सर आणि आप्पा सर यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही हा विश्वास मनी बाळगुण साहित्यमंथनचा माझा प्रवास सुरु झाला.

              सुरुवातीच्या एक दोन स्पर्धेत विजयी झाल्याचे पाहून मला अधिक प्रोत्साहन मिळू लागले आणि जोमाने कामाला लागलो.
              थोड्याच दिवसांत माझ्या इच्छेनुसार अरविंद सरांनी मला ग्राफिक्स चे काम दिले आणि मी खुप कमी वेळात या ग्रुप मधे फेमस झालो😎
माझे ग्राफिक्स फेसबुकवर गेल्यामुळे माझ्या मित्रांचे सुद्धा मला अभिनंदनाचे कॉल येऊ लागले. मला माहीत नव्हते किंवा याअगोदर मी कधी ग्राफिक्स बनवलो नव्हतो परंतु शिकत गेलो आणि सर्व येत होतं.

             साहित्यमंथनमुळे मला रामराव काका, अरविंद सरांपासून ते निलेश पर्यन्त सर्व थोरामोठ्यांची ओळख झाली.
आज मी सुद्धा अभिमानाने सांगू शकतो की माझे मित्र नगर, नाशिक, पुणे,मुंबई एवढेच नव्हे तर अमेरिकेत बोस्टन, व कॅलिफ़ोर्निया येथे सुद्धा आहेत.

              दिवसभराचा थकवा साहित्यमंथनचे msg दूर करतात. मी एका प्रतिष्ठीत व्हाट्सएप्प ग्रुपचा सदस्य असल्याचा मला अभिमान आहे.
              साहित्यमंथनने मला व माझ्या चारोळी' लेख व सापांना भरभरुन प्रेम दिलत. मी आपला सदैव आभारी आहे🙏🏽

       _क्रांती एस. बुद्धेवार,
         धर्माबाद जि. नांदेड
💐🌹💐🌹💐🌹🌹💐🌹💐🌹💐🌹

[4/2, 11:50 AM] Aravind Kulakarni a"nagar
2) साहित्यमंथन ने मला काय दिले  !
क्रांती बुद्धेवार सर
----------------
तो आला ,त्याने पाहिले आणि जिंकून घेतले सारे .....
कधी आले आणि बिन वाजउन आम्हाला पोतडीत कधी बांधून टाकले काही कळलेच नाही ,
मोठ मोठे अजगर ,कोब्रा पकडणारा हा माणूस माणसांना सुद्धा आपल्या पोतडीत कधी गुंडाळतो ते कळणार सुद्धा नाही !
ग्राफिक तर सर्वात सुंदर !
धन्यवाद क्रांती सर !
💐🌹💐🌹💐🌹🌹💐🌹💐🌹💐🌹

[4/2, 1:01 PM] Aravind Kulakarni a"nagar
4) साहित्यमंथन ने मला काय दिले

श्री .नंदकिशोरजी सोवनी सर ----:-----------------
एक सतत आनंदी ,उत्साही व  त्यागात सुख माननारे हरहुन्नरी व्यक्तिमत्व !
दुर्धर आजारालाही  हार मानायला लावणार स्वतः आनंदी राहून दुसर्याला आनंदी ठेवण्याची धडपड व निरपेक्ष पणे दुसर्यांना मदत करीत राहाण्याची वृत्ती ,
भाई बद्दल किती ही बोलले तरी थोडेच आहे
साहित्यमंथन चा तो आवाज आहे ,नंदाचा किशोर म्हणजे च श्री कृष्ण आहे त्या कृष्णाच्या बासरीने तर या कृष्णाच्या शिट्टीने साहित्यमंथन ला वेड लावले आहे !
धन्यवाद "भाई "
💐🌹💐🌹💐🌹🌹💐🌹💐🌹💐🌹

[4/2, 1:25 PM] जयश्री पाटील
साहीत्य मंथन ने मला काय दिले❓
   "दुसरयासाठी जगलास तर जगलास
स्वतःसाठी जगलास तर मेलास"
   साररूपात हेच शिकवलयं मला साहीत्यमंथन ने.यामुळेच मी सदैव साहीत्यमंथनच्या ऋणाईतच रहाणार आहे.
     "आनंदाचे डोही
       आनंद तरंग" असे आमचे प्रेरणास्त्रोत कुलकर्णी काका ज्यांच्या खांद्यावर हा डोल्हारा उभा आहे.पहिल्याच भेटीत आपलसं करणारं व्यक्तीमत्व , साहीत्यमंथनमुळे लाभले. जगण्याची दिशा,जिवन सत्कारणी लावण्याची सुयोग्य कारममिमांसा उलगडली व साहीत्यमंथनचं साहीत्यरूपी लोणी वर आलं.मुळातच आपण भारतीय उत्सवप्रिय ्न त्यात या गृपची भर हा जणू दुग्धशर्करा योगच म्हणावा लागेल.
      प्रत्येक सण-उत्सव-घडामोडी इथे एकोप्याने रमतात.प्रत्येकाला साहीत्याची सेवा करण्याची संधी मिळते,  माझं तर सोनचं झालं असं म्हटलं तर वावगं ठरू नये.
      विविधांगी गुणी माणसं जोडली जावून मला त्यात साखळीचा एक भाग बनता आलं हे माझं अहोभाग्यच.पदार्पणातच मी "नवरंग"ची साक्षिदार झाले.हे ही नसे थोडके.
    मला इथे 'आक्का'ही माहेरची उपाधी लाभली जी मला माहेराशी जो़डते. इथे येवून मी सामाजीक भान व ऋण दोन्ही जपायला शिकले.
        कवितेचेच नव्हे तर एकंदर साहीत्याच्या बारीक सारीक अंगांचा सखोल अभ्यास जुळून आला.जिवनाला एक अर्थ प्राप्त झाला.महाराष्ट्रातील नामवंत कवि, लेखक,नाटककार,सिनेकलावंत यांच्यासी नाळ आपसूकच जोडली गेली.मी कृतकृत्य पावले.
       सरतेशेवटी एवढेच म्हणेन की कुलकर्णी काका ...त्यांचा परीवार व गृपचे खंदे शिलेदार यांनी मानवी साखळी बनवलीय जी समाजाचे ेक आदर्श रूप ठरतेय.
        साहीत्यमंथनसाठी👇🏻
"झडो दुदुंभी तुझ्या यशाच्या उंच उंच अंबरात
तुझी पोवाडे गातील पुढती
शाहीर अन भाट"......
............जयश्री पाटील.

💐🌹💐🌹💐🌹🌹💐🌹💐🌹💐🌹
[4/2, 1:31 PM] Aravind Kulakarni a"nagar
दि , 28/ 6 2013 रोजी नांदेड रेल्वे स्टेशन वर मला हार्टअॅटॅक आला  , आमचे व्याही श्री .श्रीकांतजी पाठक साहेब व विहीण बाई सौ ,प्रतिभाताईंनी मला त्वरीत हाॅस्पिटल ला अॅडमिट करून माझे प्राण वाचवले ,आपले गजानन वारणकर ही मदतीला धाउन आले ,नंतर माझी अॅजीओप्लास्टीही झाली परंतू  सतत अॅटॅक ची भिती वाटत होती ! थोडे छातीत दुखले तरी वाटायचे आपल्याला अॅटॅक आलाच !
मी डिप्रेशन मधे गेलो ,कुठे बाहेर जात नव्हतो ,गावाला तर नाहीच !
पण जेव्हा पासून "साहित्यमंथन " चा सहवास मिळाला तेंव्हा मी या डिप्रेशन मधून बाहेर आलो व "नवरंग " सारखी साहित्य निर्मिती तुमच्या सोबतीत करू शकलो!
साहित्यमंथन ने मला आयुष्य दिले नव्हे साहित्यमंथन हा माझा श्वास आहे
💐🌹💐🌹💐🌹🌹💐🌹💐🌹💐🌹
[4/2, 2:56 PM] Utkarsh devanikar
हारा वही जो लडा नही..या नावाचा गृप आम्ही चालवायचो..त्याचेच रुपांतर परत साहिंत्यमंथन मधे झाले
धनंजय पाटील यांच्याकडुन कुलकर्णी सरांना माझा नंबर मीळाला व त्यांनी मला यात घेतले ..त्या वेळी मलाही असे वाटले नव्हते की आपण एक उतुंग झेप घेत आहोत..ग्राफीक्सची जीम्मेदारी अरविंद सरांनी माझ्यवर सोपवली..तसा मी यात पारांगत होतो असे नाही
शेवटी म्हणतात ना की गरज ही शोधेची जननी आहे...गरजेप्रमाणे मी ग्राफीक्स ची तंत्रे एकलव्य बनुन शीकु लागलो..मला बरेच
लोकांचा असा मॅसेज यात असे की सर तुम्ही ग्रफीक्सचा डीप्लोमा कोठे केलेला आहे..😀
     मग काय..अरविंद सरांनी देलेल्या प्रत्तेक जीम्मेदारीवर मी खरा उतरत गेलो..त्यांच्या
मुळेच मी ही सर्व तंत्रे हताळत व शिकत गेलो..
     नाही तर आजही मी ह्या गृपचे मॅसेज त्या गृपवर करत बसलो असतो....😀
     वारणकर सर व अरविंद सर यांनी माझ्या कामात मला खुप प्रोत्साहीत केले
त्यांच्यमुळेच मी येथे आहे..
      धन्यवाद अरविंद सर.🙏
वारणकर सर..🙏
💐🌹💐🌹💐🌹🌹💐🌹💐🌹💐🌹
[4/2, 3:17 PM] Aravind Kulakarni a"nagar
6) विचारमंथन भाग -50
साहित्यमंथन ने मला काय दिले
-----------------------
उत्कर्ष देवणीकर सर

*आपल्या ग्रूप चे नाव हारा वही जो लडा नही असे होते
ती सुरूवात होती ,मी व वारणकर सर आम्ही दोघांनी मिळून एक ग्रूप स्थापण कला पण gm , gn झाले का जेवन ,अशा मॅसेजला आम्ही दोघेही कंटाळलो मग विचाराला गती मिळावी ,काही चांगले व स्वतःचे निर्माण करता यावे म्हणून दर रविवारी "विचारमंथन "कार्यक्रमवसुरू केला ,जेंव्हा देवणीकर सर आम्हाला मिळाले तेंव्हा त्यांनी पहिल्यांदा या कार्यक्रमाला ग्राफिक करून दिले व निकाल ही ग्राफिक मधेच दिला !
आजपर्यंत  ते किती ही बिझी असले तरी जी जबाबदारी देण्यात येईल ती आनंदाने पार पाडत आहेत ,साहित्यमंथन च्या जडणघडणीत त्यांचा फार मोठा वाटा आहे ,
धन्यवाद उत्कर्षजी

💐🌹💐🌹💐🌹🌹💐🌹💐🌹💐🌹
[4/2, 3:36 PM] ‪+91 81779 64444‬
सर आपला मोठे पणा. मी दरोरोज 800 ते 1000 ग्रुप हताळतो, पण आपल्या ग्रुप सारखे प्रेम, माया व मार्गदर्शन कुठे मिळत नाही. मला साहित्य मंथन ग्रुप द्वारे ह्या गोष्टी मिळाल्या आहेत. आपले सर्व मेंबर्स हे जीवभावाचे आहेत. 🌹 साहित्य मंथन हा ग्रुप एकमेकाना जोपसनारा व सांभाळून नेणार ग्रुप आहे.🌹 सर्वात महत्वाची म्हणजे उदिष्टय ही सर्वात चांगली आहेत.
💐🌹💐🌹💐🌹🌹💐🌹💐🌹💐🌹

[4/2, 4:01 PM] Kale
साहित्य मंथन ने मला काय दिले ? विचार मंथन भाग 50वा
नागेश काळे चाकुर जि लातूर
तसा मी लेखक , कवी , साहित्यि क कोणीच नाही
मी मूळ कलाकार चित्रकार आहे पण मला वाचन
व नाते जमवूने (वधू वर सेवा )फार आवडत एकदा
असेच मा . श्री कुलकर्णी सरा ची एका विवाह केंद्र
तूनओळख झालि प्रथमच भेटीत त्यानी मला साहित्य मंथन ग्रुप मध्ये येण्यास सांगितले मी पण काही विचार केलो नाही ग्रुप मध्ये प्रवेश घेतलं पण
येथील नियम व मराठी लिखाण , चारोळी इ ,
फक्त वाचन करायच , मला आता असे झाले आहे
की साहित्य मंथन परिवार हे माजे kuthub आहे
मी जवळ जवळ15वर्षे वधू वर सर्वधर्मसमभावाचे
220नाते जमवली पण माजे नाते 440पेक्षा जास्त
कुलकर्णी सरा नी जमवली मी त्यांचा व साहित्य
परिवार चा आभारी आहे 🙏🏻
काही चुकलं बिक्ल तर क्षमा असाव 🙏🏻
💐🌹💐🌹💐🌹🌹💐🌹💐🌹💐🌹

[4/2, 4:01 PM] ‪+91 74989 64901‬
साहित्यमंथन भाग :  ५०
---------------------------------
साहित्यमंथनने मला काय दिले?
        ११ ऑक्टोबरला शरयुताई अन् शिल्पाताईमुळे मला साहित्यमंथनच्या
पटावर हजेरी लावण्याची संधी कुलकर्णीसरांनी दिली.म्हणून त्यांचे शतशः धन्यवाद🙏🏽😊
  "हरवले ते गवसले"असे म्हटले तरी ते साहित्यमंथनसाठी योग्यच आहे.माझ्यातली निद्रिस्त झालेली प्रतिभा पुनःश्चः जागृत झाली; सातत्याने सुंदर चालू परिस्थितावरील विषयांवर चारोळीस्पर्धा, विविध समाजोपयोगी विषयांवर आयोजित विचारमंथन स्पर्धा, आजचा दिवस माझा सारखे स्वतःवर लिहायला उद्युक्त करणारे सदर.या व्यतिरिक्त एखाद्या वेळी सरप्राईज चारोळ्यांची मैफल! गरीब, परिस्थितीने गांजलेल्यांना मदत करण्याची तळमळ, त्यात साहित्यमंथनच्या सभासदांनी लावलेला भरघोस मदतीचा हात! हे सगळे आगळेवेगळे ! आनंददानाचे चित्र मी साहित्यमंथनवर जवळून पाहिले.घरातील कामे बाजूला टाकून विचामंथनाच्या विषयात गुंतून त्या विषयावर उजेड पाडण्यासाठी संशोधनाची धडपड, आपले लिखाण ओघवते वाचनीय कसे होईल याची धडपड, स्पर्धेत नंबर यावा म्हणून नव्हे तर सगळ्यांच्या वैविध्यपूर्ण लेखनातून त्या त्या विषयाची विविधांगी माहिती कशी मिळेल याचा विचार महत्वाचा! तरीही स्पर्धांमधून मिळालेल्या प्रथम, द्वितीय, तृतिय क्रमांकाने मन जरूर प्रसन्न झाले.त्यावर सभासदांची पसंतीची पावती! मग तर दुधात साखरच!
त्यातच मी सभासद झाल्यानंतर " नवरंगा" त दोन महिन्यातच न्हाऊन निघाले.२५ डिसेंबरला रंगीत तालीम न झालेला आमचा नवरंग प्रकाशन सोहळा असा रंगला की रंगीत तालीम झाली नाही हे प्रेक्षकांना जाणवलेच नाही.तिकडे नव्याने भेटलेले साहित्यमंथनचे सभासद
नव्याने भेटलेत असे जाणवलेच नाही.तिकडे नंदकिशोरजींचे शीळवादन,गायन, माझी गाणी यामुळे कार्यक्रमात सुंदर झलक निर्माण झाली.रंगबहार म्हटले तरी चालेल असे हे साहित्यमंथन!
साहित्यिक, सिने-नाट्य दिग्दर्शक, विविधरंगी कलाकार, नर्तक, चित्रकार, सर्पमित्र, सामाजिक कार्यकर्ते, ग्राफिक डिझायनर, विद्यार्थी, लहान तरूणांपासून ते वयोवृद्धांपर्यंत नटलेले हे साहित्यमंथनचे सुंदर छोटेखानी जग आहे.ईथे कोणीही कोणाला लहानमोठे समजत नाही.आदर, शुद्ध सात्विक प्रेमाचा ओलावा अनुभवावा तो याच ग्रुपवर! मनापासून दिलेल्या वाढदिवसांच्या शुभेच्छा मनाला नवी उमेद, ताकद देतात.प्रत्येक सभासदांची कौतुकास्पद दाद मिळाली की खुप बरें वाटते. फाल्तूच्या गप्पा नाही, सारे काही ब्रेनटॉनिक!
अजून बरेंच काही सांगता येईल. छानश्या नव्या मैत्रिणी, सहकारी ह्याच ग्रुपमुळे लाभले.हे माझे सद्भाग्य म्हणेन मी! पुन्हा नव्याने गझलप्रेमीसाठी उभारलेला नवा ग्रुप, कलाकारांच्या कलेतून विद्यार्थांसाठी मदतीचा विचार करणारा कलामंच ग्रुप! सगळेचं अनोखे! ह्याचे जनक कुलकर्णी सर सादर प्रणाम! 🙏🏽😊
हे
जग
सुंदर
शब्दांचेच
गंधाळलेले
लेख कवितांचे
साहित्य मंथनचे
👏🏻👏🏻👏🏻🙏🏽💐🎹🎵🎼🎂👍👌&#0;😀😀😊😊
© जागृती सुधीर निखारे.२/४/२०१६.

💐🌹💐🌹💐🌹🌹💐🌹💐🌹💐🌹
[4/2, 5:10 PM] ‪+91 94040 71984‬ साहित्य मंथनने मला काय दिले  :-
१)स्वतः ची अोळख
२)समविचारी मिञ अाणि बहिणी
३)आदरणीय व्यक्तीमत्वाची अनेक माणसं
४) कविता करण्याची स्फूर्ती
५)हक्काची जागा
६)मनमोकळेपणाने लिहिण्याचे व्यासपीठ
७)पारितोषिके (शाबासकी )
८)कुलकर्णी सर, वारणकर यांच्या सारखे माणसं असणारे संचालक मंडळ
९) वादविवाद करायला  वॆचारिक आखाडा
१०)सदस्यांच्या कवितेचा आनंद घेण्याची सवय
११)लेखक होण्याची संधी
१२)आणखी न लिहीता येणाऱ्या पुष्कळ गोष्टी
धन्यवाद साहित्य मंथन
               
🙏🍀🙏🌺🙏🌸

💐🌹💐🌹💐🌹🌹💐🌹💐🌹💐🌹
[4/2, 5:55 PM] ‪+91 94221 18604‬
साहित्य मंथन.             एक लेखन चळवळ.नवागत लेखक निर्मिती शाळा.नवीन लेखकांना अदभूत व्यासपीठ.अनुभवी व्यक्तीचे मार्गदर्शन .कवींची मांदीयाळी.नव्याचा शोध अन् जुन्याचा बोध.अँडमीनचं अँड करणं आणि कवीचं कवन करणं हृदयस्पर्शी .              हे सर्व मला साहित्य मंथनने दिलं.

💐🌹💐🌹💐🌹🌹💐🌹💐🌹💐🌹
[4/2, 6:31 PM] ‪+91 99704 46447‬
विषय - साहित्य मंथन ने काय दिले

सर्वांना हिरक महोत्सवी स्पेर्धेच्या हार्दिक शुभेच्छा

खरे सांगायचे झाले तर साहित्य मंथन हा एक whatsup ग्रुप जो केवळ साहित्यिक अन साहित्याची जाण असणाऱ्या मंडळींसाठी बनलेला, आता त्यात मी काय करतोय हा प्रश्न सुरुवातीच्या काळात पडत असे तर उत्तर मिळे ते एकच की मी फक्त वाचक (जाणकार तर मुळीच नाही) तर मी फक्त वाचन करणे अन त्यातून काही शिकणे हेच उद्दिष्ट समोर ठेऊन सम्मिलित करण्यासाठी विनंती केली अन ती विनंती फलित झाली.
अचानक जुळून आलेल्या योगायोगाने मला साहित्य मंथन ह्या whatsup ग्रुप चा सदस्य होण्यास लाभले ते श्रेय मी मंदार अन श्री अरविंद काकाजी यांना देईन.शतशः आभारी अन ऋणी राहीन.
हा प्रवास सुरु झाला होता फक्त वाचन या प्रकाराने परंतु प्रवास लांबचा असो वा जवळचा म्हणतात ना सोबत असणाऱ्या मंडळीमुळे तो सुकर होत जातो बस अगदी तसेच काहीसे माझ्याबाबतीत घडले.
मला वाचण्याची आवड लिखाण कधी जमले नाही किंबहुना कधी वेळ अन प्रयत्न यांची सांगड घालणे मला जमलेच नाही, पण ह्या ग्रुप च्या सानिध्यात जोडल्या नंतर मला लिखाण कसे करावे विचारांना शब्दात कसे उतरवावे ह्याचे ज्ञान झाले अन हळूहळू मी ते प्रत्यक्षात आणत लिखाण करण्याचा प्रयत्न सुरु केला अन साहित्य मंथनातील अनेक मंडळींनी मला वेळोवेळी ह्याबद्दल मोलाचे प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले.सर्वच मंडळी नानाविध क्षेत्रातील तसेच आपापल्या क्षेत्रात पारंगत अशी ह्या परिवारात आहेत,त्यांच्यामुळे बरेच काही शिकण्यास मिळाले,
लिखानासोबत मला सामाजिक बांधिलकी तसेच त्याप्रति आपली जबाबदारी ह्याबद्दल वेळोवेळी उपक्रम राबवून घेतले जाणाऱ्या स्पर्धांतून शिकावयास मिळालें. तसेच विचार मांडणे मग ते गद्यात असो कि पद्यात हे हि इथेच दिग्गज मंडळींच्या सानिध्यात शिकावयास मिळाले.
विचारांना शब्द रूप येथे मिळाले

काय दिले काय दिले हा काय प्रश्न
आयष्याच्या वळणावर अनेक शिकलो
दिग्गजांची साथ लाभली अन
वाचता वाचता लिखाणही शिकलो

ह्या ग्रुपचे कर्तेधर्ते सर्वेसर्वा संस्थापक श्री अरविंद काका तसेच इतर खंदे कार्यकर्ते यांनी मला ह्या परिवारात सामील करून घेतले मला साहित्याचा काही गंध नसताही स्थान दिले ह्याबद्दल मी सदैव ऋणी आहे, राहीन.
आपला प्रवास मैलोन् मैल दूरवर चालत जावा अन् अनेकानेक कार्यात माझाही सहभाग असावा हीच इच्छा अन सदिच्छा.

मांडणी करण्यात काही उणीव असेल तर समजून घ्यावे

SP
💐🌹💐🌹💐🌹🌹💐🌹💐🌹💐🌹
[4/2, 7:08 PM] Surwase
साहित्य मंथन हे आज 50व्या भागा बरोबर च  वर्षपूर्तिकडे वाटचाल करत असताना माझ्या पामराच्या मनातील काही क्षण आणि आठवणी आपल्या समोर ठेवतो आहे ...

श्री .आप्पासाहेब सुरवसे
        लाखणगावकर
💐🌹💐🌹💐🌹🌹💐🌹💐🌹💐🌹

          नासा ग्रुप धर्माबाद मध्ये विचारधारा भाग (1) पहिला आणि तिथे माझा प्रथम क्रमांक आला आणि तेथील ग्राफिक्स हे ना .सा. सरांनी फेसबुक वर पोस्ट केले आणि मग काय तिथे हे साहित्य मंथनचे प्रमुख शिलेदार  जी. पी. सर आणि ग्रुप एडमिन श्री .उत्कर्ष देवणीकर हजर होते आणि विशेष म्हणजे ऑनलाइन होते लगेच मी उत्कर्ष सर यांना विचारणा केली की,मला पण साहित्य मंथन मध्ये यायचे आहे आणि मग काय 12 ऑक्टोबर उजाड़ला आणि माझा प्रवेश फॉर्म भरून घेऊन मला प्रवेश मिळाला....
त्या दिवशी माझे असे काही ग्रुप वर स्वागत झाले की,मला माझा स्वतः चा अभिमान वाटायला लागला आणि एके वेळी असेच हायसे ही वाटायला लागले की,आपण खरोखरच यांच्या अपेक्षेला सत्य उतरु की नाही....???
     आणि चारोळी ची स्पर्धा होती चौथी(4). विषय होता "संसार" आणि मी माझी चारोळी सादर केली तर तिथेही लगेच नंबर मिळाला..कौतुकाचा वर्षाव ग्रुप वर ही आणि फेसबुकवरही.एवढेच काय तर माझ्या शाळेत माझा सत्कार करण्यात आला आणि भारावुन गेलो आणि भानावर येत गेलो ....!!!!!!

                एकामागून एक स्पर्धा होत गेली प्रत्येक वेळी सहभागी होत गेलो आणि दर प्रत्येक वेळी सहभाग तर नक्की देत गेलो आणि नंबर ही मिळत गेला ....
        पुढे स्पर्धा आली आणि एके  दिवशी उत्कर्ष सरांचा फोन आला आणि मला ""पु .ल. देशपांडे"" या विषयावरील संयोजन , समीक्षण आणि परीक्षण करण्याची सुवर्ण संधी आली आणि मी त्या संधीचे सोने केले आणि नि :पक्षपाती पणानेे परीक्षण केले.आणि आजपर्यंत म्हणजे त्या स्पर्धेपर्यंत त्यांनी कधी ही स्व:ताला विजेत्यांच्या यादी मध्ये स्वीकारले नव्हते ..मला त्यांचे विचार पटले  आणि त्यांना विजेत्यांच्या यादीत घेऊन ग्राफिक्स वर दोन वेळ नाव लिहिण्याची संधी नव्हे विनंती केली....

         31 ऑक्टोबर म्हणजेच अर्थातच माझा वाढदिवस ....!!!! असा काही साजरा झाला की वयाची 31 वर्षे वाढदिवस साजरा केला नाही पण त्या दिवशी सौ ने हॉटेल कन्हैय्या 3 स्टार येथे साजरा करून मला एक सरप्राइज दिले....
           त्यातच नवरंग ची जोरदार तयारी  चालु झाली होती ..आणि कार्यक्रम जवळ आला होता मी आणि खुडे गुरूजी 25 तारखेला निघालो अह्मदनगरला आणि जामखेड वरून परत वापस आलो कारण ही तसेच होते माझे आजोबा देवा घरी गेले होते आणि मग मी  आणि  खुडे सर  काहीच न कळवता गपगुमाने परत वापस आलो .....नंतर  मला
अरविंद जी कुलकर्णी सरांनी फोन करत सर्व काही कुटुंबातल्या जवळच्या नातेवाकांप्रमाणे चौकशी केली खुप हायसे वाटत होते...

एक जानेवारी अर्थातच नववर्षीची भेट म्हणून मला अरविंद सरांनी एडमिन पदी बढ़ती दिली.....

आणि पुढे काही दिवस मी संयोजक पद ही उपभोगले आहे....
हां झाला माझा साहित्य मंथन चा माझा प्रवास
🙏&#0;🙏&#0;🙏&#0;🙏&#0;🙏&#0;🙏&#0;🙏&#0;

आणि आता महत्वाचे म्हणजे मला📚 साहित्य मंथन📚 ने मला  काय दिले..?हा प्रश्न नाही तर !!!!  एक  वैचारिक वादळाला प्रेरित होण्यासाठी दिलेली अफ़लातून GOLDEN OPPORTUNITY आहे...
💐💐💐💐💐💐💐
क्रमशः.......1
💐🌹💐🌹💐🌹🌹💐🌹💐🌹💐🌹
[4/2, 7:17 PM] ‪+91 95275 57069‬
साहित्य मंथनने मला काय दिले?
________________

      एक दिवस माझ्याच तालात व्हाट्सएप्प चाळत असताना एक मेसेज आला. ख्याली-खुशाली विचारून मग मला कळवले की आमच्या साहित्यमंथन परिवारात तुम्ही सहभागी व्हाल का? मी मागचा पुढचा विचार न करता होकार दिला. कारण आपले लाडके अॅडमीन काका आणि माझा एका ग्रुपवर परिचय झालेला होता. सुरवातीला मनात वाटले होते, असेल इतर ग्रुपसारखा सर्वसामान्य ग्रुप. पण हळूहळू कळत गेले की इथे आपले स्वतःचे, मनातील विचार शेयर केले जातात. एकमेकांच्या सुख-दुःखाची दखल घेतली जाते. काकांच्या, ह्या परिवारामुळे मला गझल म्हणजे काय असते हे समजले.
आठवड्यातील विविध वार-स्पर्धा, आजचा दिवस माझा सर्वच उपक्रम छान. मी नुकताच नोकरीवर रुजू झालो आहे त्यामुळे व्हाट्सएप्प निवांत असेल तेव्हा पाहत असतो तेही एकदम धावते, त्यामुळे चांगल्या पोस्टवर साद-प्रतिसाद द्यायचे राहून जाते. आणखी एक सोशल मिडियावर काय शेयर करावं काय नाही ह्याची शिस्त फार थोड्या ग्रुपवर अनुभवायला मिळाली.
         खरेतर मी ना कवी, ना लेखक. वर्षभरापूर्वी ग्रेजुएट झालेलो आहे. अवांतर वाचनाची आवड होती म्हणून काहीतरी (चारोळ्या वैगेरे) लिहायला लागलो. साहित्य मंथन परिवारामुळे आता वाटते की पेन आणि कागदाशी मैत्री करायला हवी. कारण इतरत्र भरमसाठ कवीता, लेख ई.साहित्य शेयर केले जाते, पण त्याचे संकलन किंवा पुस्तकरूपात उपलब्ध झाल्याचे ऐकिवात नाही.
  खूप छान चळवळ आहे ही. नक्कीच क्रांती घडवेल. ही चळवळ अशीच चालू रहावी, त्यासाठी सर्वांना उत्तम आरोग्य लाभो .
आणि
शेवटी शेवटी, कालच्या चारोळीस्पर्धा विजेत्यांचे अभिनंदन! संयोजकांचे आभार.

💐🌹💐🌹💐🌹🌹💐🌹💐🌹💐🌹
[4/2, 9:10 PM] ‪+91 97650 01266‬
" साहित्य मंथन ने मला काय दिले?"

साहित्य मंथन ने मला काय दिले? काय दिले म्हणण्यापेक्षा काय दिले नाही हे विचारा..!
साहित्य मंथन ग्रुपच राहिला नसून परिवारच झाला आहे. हजारों ग्रुप आहेत वाॅटस अप वर. पण खरोखर विचारांना चालना देणारे, सुप्त गुणांना वाव देणारे बोटांवर मोजण्या इतपत असतील. त्या श्रेणीत साहित्य मंथन नक्कीच येतो हे विशेष !
मी कशी आली साहित्य मंथन मधे मला आज ही आठवते. आमच्यासारखे आम्हीच या ग्रुपवर मी एक चारोळी पोस्ट केली होती. त्याच ग्रुपला अरविंद सर ही होते. त्यांनी चारोळी वाचताच लगेच ग्रुपला जोडण्याविषयी विचारले आणि मी साहित्य मंथन मधे सामील झाली. नवे लोक, नवे वातावरण होते. पण हळूहळू सर्व सहज होत गेले. इथेच साहित्याशी निगडीत कार्यक्रम चारोळी स्पर्धा, विचारमंथन, आजचा दिवस माझा.. अगदी व्यवस्थित पणे हाताळतांना दिसले. ग्रुपचे हित जपण्यासाठी रात्रंदिवस आपला अमूल्य वेळ खर्च करतांना दिसताहेत.
अरविंद सर, नासा सर, आप्पासाहेब, देवणीकर सर, सोवनी सर, अंजनाताई, जयश्री ताई...किती नावे घ्यावीत? त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत चलणारे क्रांती, योगेश, खुडे सर, जाधव काका, शरयू ताई हे ही आहेतच. साहित्य मंथनच्या उत्कर्षासाठी झटणारे ग्रुपमधील मोठया संख्येने  इतर साहित्यकारही आहेत.
अरविंद सरांनी साहित्य जगतातून एकेक हिरे शोधून आणले. इथे कुणी ही कमी नाही. प्रत्येक जण शंभरच्या तोडीचे आहेत. सर्व जण अतिशय आत्मीयतेने अन् आपुलकीने वागतात.
एवढयावरच हा ग्रूप थांबलेला नाही. मुक्त पक्ष्याप्रमाणे विशाल गगनात भरारी घेतच आहे. नक्कीच  एक दिवस इतिहास रचणार आहे सोशल मीडियाच्या दुनियेत.

यश मिळो हीच सदिच्छा..!

निर्मला सोनी.

💐🌹💐🌹💐🌹🌹💐🌹💐🌹💐🌹
[4/2, 9:20 PM] ‪+91 88057 99817‬ साहित्य  मंथन ग्रुप खुप छान आहे...........मी ह्या ग्रुप  मधे कर्णिक  मॅम मुळे आले...त्यांचे आणी सर्व  प्रशासकांचे आभार.🙏🙏
या ग्रुप विषयी काय बोलणार....या ग्रुप म्हणजे विद्वान ची खाण आहे..या ग्रुप मध्ये  उपक्रमांचा खजिना आहे....खरच खुप छान विषय आसतात ग्रुप मध्ये. मी खरच दिलगीरी व्यक्त  करते की मला फारसा वेळ  देता येत नाही...पण जेव्हा  वेळ  भेटतो तेव्हा प्रथम प्राधान्य   याच ग्रुप ला देते...आपला ग्रुप  खुप आप्रतिम आहे..आपला ग्रुप म्हणजे विदेयचे भंडार आहे.आसेच माझ्या  ज्ञानामृत  मिळावे ही विनंती 🙏🙏🙏
  धन्यवाद
स्वाती महानवर

💐🌹💐🌹💐🌹🌹💐🌹💐🌹💐🌹
[4/2, 10:41 PM] ‪+91 80973 18985‬
साहित्य-मंथन ने मला काय दिले ?
------------------------------
साहित्य मंथन ने मला काय दिले ?
खर तर उत्तराकरता शब्द नाहित... साहित्य-मंथन ने जे दिल ते शब्दात सांगण्याइतपत सोप्प नाहि, साहित्य-मंथन हा एक परिवार आहे व परिवारातुन मिळणार प्रेम, आदर्श, आस्था, सुरक्षतेची भावना शब्दात व्यक्त करने खरच कठिण.

मी मनापासुन अरविंद सरांचे आभार व्यक्त करतो ज्यांनी मला इतक्या सुंदर ग्रुपमध्ये समाविष्ट करुन घेतल, तसेच सर्व स्नेहि सभासदांच्या प्रेमाचा मी ऋणी राहिल.

आपलाच
प्रवीण रसाळ.
💐🌹💐🌹💐🌹🌹💐🌹💐🌹💐🌹
[4/2, 10:54 PM] ‪+91 88797 63591‬
विचारता काय
साहित्य मंथनने काय दिले
इथे प्रत्येक हृदयाचे
द्वार मला खुले मिळाले..!!

नावातच मंथन ज्याच्या
वेगळे आणखी काय वदु
घुसाळुंन शब्दांचा रवी
अमृताची वेळ साधु..!!

वटवृक्ष मैत्रीचा विशाल
शाखा देश विदेशात..
अभिमान आहे मजला
सहभाग माझा आहे त्यात..!!!

सामाजिक उपक्रमाची
एक अनोखी मुहूर्तमेढ..
प्रत्येक जण हिरीरीने करतोय
समाजाची परतफेड..!!

मंथनाचा महामेरु
सर्वोच्च शिखर गाठों..
शुभेच्छा देतो हृदयातुन
दरबार सुखाचा नित्य थाटो..!!
*****सुनिल पवार.....
💐🌹💐🌹💐🌹🌹💐🌹💐🌹💐🌹

[4/3, 5:59 AM] ‪+91 82752 31641‬
नमस्कार साहित्य मंथन .

साहित्य मंथनने मला काय दिले ?

सर्वप्रथम मी श्रीमती अंजना ताई कर्णिक यांचे शतशः आभार व्यक्त करतो ज्यांनी मला या परिवारात सामील करून घेतले .
येथे आल्यानंतर एकत्र कुटुंबात वावरत असल्याचे जाणवत आहे .

    मी माझ्या आयुष्यात प्रथमच चारोळी स्पर्धेत सहभागी झालो व प्रथम क्रमांक मिळवला .याचा आनंद मी शब्दात व्यक्त करू शकत नाही .

याचबरोबर कवितांचे विविध प्रकार ,त्यांचे नियम अवगत झाले .सुनित काव्य प्रकार माझ्यासाठी नविन होता तोही अवगत झाला .आता आणखी नविन शिकण्याची तयारी करत आहे .मला खात्री आहे मी त्यातही यशस्वी होईल .

         साहित्य मंथन चे असेच मार्गदर्शन दीर्घकाळ मिळत राहील हिच एक प्रार्थना .

     आपलाच
रत्नाकर जोशी
जिंतुर
💐🌹💐🌹💐🌹🌹💐🌹💐🌹💐🌹