नागोराव सा. येवतीकर

Thursday, 17 March 2016

📚 साहित्य मंथन Whatsapp ग्रूप  📚

........... आयोजित..........

🎼 🎵 🎹 काव्यमंथन 🎹 🎵 🎼

************************

📚 चारोळी स्पर्धा खुली  📚

************************

📢 होळी सणाच्या आगमनानिमित्त  📢

विषय:----👥  होळी 👥

₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹

💥 दिनांक :-18/03/2016

💥 वार : - शुक्रवार

💥 वेळ : - 10:00 ते  07:00 पर्यंत

==================================
💥ही स्पर्धा सर्वासाठी खुली आहे....

💥 एकास एकच चारोळी पोस्ट करता येईल

💥 चारोळीखाली आपले नाव, गाव व मोबाईल नंबर अवश्य लिहावे

💥 चारोळी स्पर्धेचा निकाल blog वर पाहण्यास मिळेल.  त्यासाठी वारंवार चौकशी करु नये .

💥साहित्य मंथन ग्रूपच्या बाहेरील मित्र परिवार या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात...त्यासाठी .
खालील पैकी कोणत्याही एका मोबाईल नंबरवर आपल्या चारोळ्या पोस्ट कराव्यात....
=======================================

🎬अॅडमिन कोअर कमिटी🎬

👤अरविंद कुलकर्णी, अहमदनगर
📱09689077239
=================
👤आप्पासाहेब सुरवसे, उस्मानाबाद
📱09403725973
=================
👤ना. सा. येवतीकर, नांदेड
📱 09423625769
===============
👤उत्कर्ष देवणीकर, उमरगा
📱09763116493
=================
👤सौ. जयश्रीताई पाटिल, वसमत
📱09421387623
===============
👤सौ. अंजनाताई कर्णिक, पुणे
📱09820758823
=================
 👤गजानन वारणकर नांदेड
📱9881384404
===================
👤डॉ .शिल्पाताई जोशी,मुंबई
📱09967708474
===================
🔦संकल्पना : - अरविंद कुलकर्णी
------÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷------
🎙संयोजक : - आप्पासाहेब सुरवसे,लाखणगांवकर
××××××××××××××××××××
🎗संकलक:--ना सा येवतीकर ,धर्माबाद
==========================
येथे आपल्या चारोळी आणि निकाल पाहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
http://nasayeotikar.blogspot.com/2016/03/whatsapp_10.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

🎤 परीक्षक : - निर्मला ताई सोनी,अमरावती

|||||||||||||||||||||||||||||||||||||||||||

💢 ग्राफिक्स  :- श्री.मारूती खुडे सर ,माहुर
📱9823922702
~~~~~~~~~ΨΨΨΨΨΨΨΨΨ~~~~~~~~



[3/18, 10:13 AM] ‪+91 94213 87623‬
❤💛💚होळी❤💛💚
" होळी यंदाची करूया नवखी
दहन कचरा,सिगारेट - गुटख्याचे
अपप्रवृत्तींच्या गोवरया रचून
पेटवू एरंड अंधश्रद्धेचे"
        .....जयश्री पाटील
          वसमतनगर.
🔸🔹🔺🔸🔹🔺
~~~~~~~~~ΨΨΨΨΨΨΨΨΨ~~~~~~~~

[3/18, 10:16 AM] ‪+91 99704 46447‬
चारोळी स्पर्धा

होळीच्या मुहूर्ती
करूयात निश्चित
थांबवुनी वृक्षतोडी
करूयात नवी सुरुवात

स्पर्धेसाठी
SP
~~~~~~~~~ΨΨΨΨΨΨΨΨΨ~~~~~~~~

[3/18, 10:19 AM] ‪+91 98212 23939‬
स्पर्धेसाठी .......
होळी

ईर्ष्या, मत्सर, हेवेदावे यांचे दहन करूया
संयमाने, आनंद-उत्साहात  होळी पेटवूया ।
बीभत्स "बोंबाबोंब",आणि 'वृक्षतोड' टाळूया
निसर्गाचे आणि वसुंधरेचे रक्षण करूया ।
---सुजाता मोघे
~~~~~~~~~ΨΨΨΨΨΨΨΨΨ~~~~~~~~

[3/18, 10:19 AM]
 उधळण करून
खेळू रंगाची होळी
एकमेका लावूनि रंग
भरू प्रेमाची झोळी
✏ नासा येवतीकर, धर्माबाद
~~~~~~~~~ΨΨΨΨΨΨΨΨΨ~~~~~~~~

[3/18, 10:38 AM]
~~~   🔥होळी🔥~~~
=======÷===========
कुप्रसिध्द विचारांची
करुया राख रांगोळी
या सणा होळी
करुया साजरी सत्कर्माने
खाऊनी पुरणाची गोड पोळी
🖊🖋🎯✏✒
श्री.आप्पासाहेब सुरवसे
      लाखनगांवकर
AMKSLWOMIAW
~~~~~~~~~ΨΨΨΨΨΨΨΨΨ~~~~~~~~

[3/18, 10:40 AM] ‪+91 99704 46447‬
टाळूयात पाण्याची नासाडी
होळीच्या दिवशी रंग खेळुनी
प्रेमाचे उधळूया ते रंग
शकुणाचा टीका माथी लावूनी

SP
स्पर्धेसाठी नाही
~~~~~~~~~ΨΨΨΨΨΨΨΨΨ~~~~~~~~

[3/18, 10:40 AM]
चारोळी स्पर्धा
🎯 होळी 🎯

पाण्याचा दुष्काळच यंदा
अपव्यय होणारा टाळा ।
काव्याचेच रंग उधळूनी
कोरडी होळी खेळा ।
 @ अरविंद कुलकर्णी
( स्पर्धेसाठी नाही )
~~~~~~~~~ΨΨΨΨΨΨΨΨΨ~~~~~~~~

[3/18, 10:43 AM] ‪+91 99690 71390‬
चारोळी स्पर्धा !
होळी !
होळी रे होळी पुरणाची पोळी,
अन् हा व्रुक्ष वल्ली जाळी!
करून पाण्याची नासाडी,
हा मानव स्वत:च्या स्वार्थासाठी ,
काढे शेतकर्यांच्या डोळ्यांतुन पाणी !
सौ. निलाक्षी विद्वांस .माहीम मुंबई
9969071390
~~~~~~~~~ΨΨΨΨΨΨΨΨΨ~~~~~~~~

[3/18, 10:43 AM]
 सण बहूरंगी होळीचा हा,
करु या असा साजरा..
नको पाण्याची उधळण,
नको वृक्षांचा तोड पसारा

         @ उत्कर्ष देवणीकर

  👆स्पर्धेसाठी नाही
~~~~~~~~~ΨΨΨΨΨΨΨΨΨ~~~~~~~~

[3/18, 10:50 AM]
 🔹🔹🔥होळी🔥🔹🔹

होळी करावी रूढी, चाली,
परंपरा ,रिती अन अनितिची
पोळी वाटावी सत्कर्माची,
यशाच्या उत्तुंग झेपेच्या गाथेची

 श्री.आप्पासाहेब सुरवसे
     लाखनगांवकर
AMKSLWOMIAW
~~~~~~~~~ΨΨΨΨΨΨΨΨΨ~~~~~~~~

[3/18, 10:51 AM] ‪+91 77158 54739‬
माल्यानें पसरली भिकेची झोळी
बँकांनी दिली त्याला पुरणाची पोळी
केली त्याने सरकारी पैष्यांची होळी
अन जाऊन बसला लंदनला गुपचीळी


धनद विजय पाटील बोरिवली मुंबई
7715854739
~~~~~~~~~ΨΨΨΨΨΨΨΨΨ~~~~~~~~
[3/18, 11:06 AM] ‪+91 98813 84404‬
 पळसाच्या फुलाने लागते,
होळीच्या आगमनाची चाहुल..
प्रियेचे गुलाबी गाल पाहुन,
मदहोश होतो माहोल....
🔵WARANKAR G🔵
     👉नांदेड👈             🔴  स्पर्धेसाठी-नाही  🔴
~~~~~~~~~ΨΨΨΨΨΨΨΨΨ~~~~~~~~

[3/18, 11:11 AM] ‪+91 98207 58823‬
होळी : चारोळीस्पर्धा
🌴🌳🌿🌱🌾🌴

१)होळी करा कुप्रवृत्तींची
व्यसनांनाही ठिणगी लावा
प्रतिज्ञा वृक्षराजी जतनाची
धुळवड नको पाणी वाचवा

२) कोतेपणा मनीचा जाळा
    हा अर्थ असे होळीचा
    रक्षिण्या प्रल्हाद बाळा
    ईश्वरे अंत केला कपटाचा
अंजना कर्णिक
~~~~~~~~~ΨΨΨΨΨΨΨΨΨ~~~~~~~~

[3/18, 11:20 AM] ‪+91 98696 43268‬
शेतकरी करतो देहाची होळी
गरीबांची होते राखरांगोळी    
बायकांची अवहेलनाची होळी
पुढारी करतो रंगेल होळी
छाया पाटील
9869643268
~~~~~~~~~ΨΨΨΨΨΨΨΨΨ~~~~~~~~

[3/18, 11:22 AM]
होळी करूया
दुष्ट विचारांची
रंग उधळू या
समृद्ध जीवनाची
✏ नासा
~~~~~~~~~ΨΨΨΨΨΨΨΨΨ~~~~~~~~
बिन पाण्याची तुम्ही आम्ही,
खेळू यंदा होळी.
नाहीतर मग स्नानासाठी,
घ्यावी लागेल गोळी.

डॉ.सुधीर अनंत काटे,निगडी,पुणे
9226130601
~~~~~~~ΨΨΨΨΨΨΨ~~~~~~~~
|| पाणी वाचवा ||
=◆=◆=◆=◆=◆=
अनिष्ट असंस्कृत प्रथांना
निश्चये होळीत जाळा..
पाणी हेच जीबन आपले
अपव्यय पाण्याचा टाळा..!
****सुनिल पवार....
~~~~~~~~~ΨΨΨΨΨΨΨΨΨ~~~~~~~~
सुलभा कुलकणीॅ
रंगारंगाची उधळण म्हणजे होळी,
सोबतीला असे तूप पुरणाची पोळी,
अनिष्ट प्रथा,चालीरीती यांना ती जाळी,
करी मनधरणी ती साराया दुष्काळी.
***£******£********
~~~~~~~~~ΨΨΨΨΨΨΨΨΨ~~~~~~~~
साहित्य मंथन साहित्य परिवार, स्पर्धेसाठी

दुष्काळात आहे आपला धनी,
माय म्हणते नका साळी चोळी...
घरात नाही खायला तुकडा,
नका करू हो साजरा होळी....

© कविकुमार तुषार पाटिल
~~~~~~~~~ΨΨΨΨΨΨΨΨΨ~~~~~~~~
🚩चारोळी स्पर्धा🚩


🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
  
होळीचे औचित्य साधूनी
पर्यावरणाचे करुया जतन
एकात्मतेचे रंग ऊधळूनी
भ्रष्ट दृजनांचे करुया दहन

🌱🌱🌱🌱🌱🌱
          (👆 स्पर्धेसाठी)

🌱🌱🌱🌱🌱🌱🌱

होळी सण साजरी करु
रंग ऊधळूनी स्नेहाचे
माणुसकीचे नाते सांगुनी
जतन करुया मूल्यांचे

🌱🌱🌱🌱🌱🌱

दुष्काळावर मात करण्या
निर्धार करु ठाम मनाचा
होळीच्या रंगात रंगताना
अपव्यय टाळू पाण्याचा

🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
       
                   🎯 मारुती खुडे
                    9823922702
~~~~~~~~~ΨΨΨΨΨΨΨΨΨ~~~~~~~~

स्पर्धेसाठी

अमंगळाची करुया आपण होळी
पवित्रतेची फिरवूया स्नेहझोळी
टाळूया पर्यावरणाची राखरांगोळी
खाऊया सारे प्रेमाची पुरणपोळी

            सुनीता सुरेश महाबळ
~~~~~~~~~ΨΨΨΨΨΨΨΨΨ~~~~~~~~

पुणीदांडी पाई व्हईनी लागस ओढ l
   व्हईना सणले सग्या खातंस गोडधोड ll
   या व्हईमा टाका गंध्या सवयीस्न गठोडं l
   मनमाई हाकला दादा व्यसनन बुच्च गधडं ll
~~~~~~~~~ΨΨΨΨΨΨΨΨΨ~~~~~~~~
🌷 चारोळीस्पर्धा🌷
   🔥होळी 🔥

"झाडे,पाणी,प्रदूषण वाचवून 
करु अपप्रवृत्तींची होळी,
आगीत न जळता 
पोटाची आग विझवेल ही पोळी"
   संगीता देशमुख,वसमत
~~~~~~~~~ΨΨΨΨΨΨΨΨΨ~~~~~~~~
होता जंगल तोड़ अनठायी 
काय उपयोग सजवूनी होळी 
खेळा इको फ्रेंडली रंगाने
निसर्ग देत असे आर्त हाळी.

मंदार कुलकर्णी,निगडी पुणे.
~~~~~~~~~ΨΨΨΨΨΨΨΨΨ~~~~~~~~
होळीच्या अवचित्य साधुनी
रंगा ऐवजी बरसल्या चारोळ्या
मस्त मस्त लिखाण वाचोनी 
थांबवू त्या होळीच्या आरोळ्या(बोंबाळ्या)

स्पर्धेसाठी नाही 
SP
~~~~~~~~~ΨΨΨΨΨΨΨΨΨ~~~~~~~~

स्पर्धेसाठीः-चारोळी 

       आली आरोळी आज सकाळी l
       पाण्याविणाच खेळुया होळी ll
    बघा होळी ती गाली हसली आणी म्हटली
        कोणी दिली यांना विवेक गोळी ?ll
  
****-------*******-------*******---

       होळी येता येते स्पुरण l
       प्रेमळ रंगांची होई धुळवण ll
      ठेवा बंधुंनो दुष्काळाचे स्मरण l
       नका करु पाण्याची उधळण ll
*******-------*******-------********

       होळी येते जोडण्या हृदयांचे नाते 
       वाईट कुजके सारे जाळुन जाते l
        रंगांचे नवतीशी नवेरुप जोडते 
       मनामनात जीवनासाठी हर्ष भरते ll
,.......**********.............*******..........

        जुनाट रुढींना जाळू होळीत
        आनंदी रंग घेऊनी ओंजळीत l
        विसरुनी सर्व धर्म नि जातपात
        मानवतेची करु खरी सुरुवात ...ll

      वरील चारोळ्या सर्वच स्पर्धेसाठी आहेत....
.राम जाधव.....
9637359723
~~~~~~~~~ΨΨΨΨΨΨΨΨΨ~~~~~~~~
__________________

रंगोत्सव हा होळीचा
शब्दांनीच साजरा करू..!
शब्दांनीच एकमेकांच्या
आयुष्यात रंग भरू..!!
____________________
© लक्ष्मण उगले
९९२३३५६३२८
~~~~~~~~~ΨΨΨΨΨΨΨΨΨ~~~~~~~~

स्पर्धेसाठी नाही...

रंगपंचमी करु या सुख- दुःखाची,
होळी करु या ईर्ष्या अन् द्वेषाची,
रंग आनंदाचे विखरु या जीवना ,
देवू या शिकवण जगाला मानवतेची....

निर्मला सोनी.
~~~~~~~~~ΨΨΨΨΨΨΨΨΨ~~~~~~~~
वॉव एक से एक चारोळ्या सगळ्या
कशाला हव्या पिचकारया वेगळ्या 😀
JP 
~~~~~~~~~ΨΨΨΨΨΨΨΨΨ~~~~~~~~
चारोळी...
साहित्य मंथन स्पर्धेसाठी....

‘होळी‘

दुष्काळातही असा करुया,
साजरा हा होळीचा सण।।
नकोस जाळू लाकूडफाटा,
वृक्षवेली हेच आपले धन।।

✒अनिल लांडगे उंडणगाव,
ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद
9689675050/9021261820
~~~~~~~~~ΨΨΨΨΨΨΨΨΨ~~~~~~~~
चारोळी स्पर्धा 
आला सण होळीचा
आनंद होतसे  मनी
लक्षात ठेवा बंधूनो
राखा पिण्यापुरते पाणी   
सुनिल बेंडे  वसमत
~~~~~~~~~ΨΨΨΨΨΨΨΨΨ~~~~~~~~
आदरणीय',"काव्यमंथन,
------------------------------------
स्पर्धेकरिता चारोळी पाठवीत आहे.कृपया समाविष्ट करावी.

         " चारोळी "
-------------------------------
खोट्या अन् दांभिकांचे,
खोटे ईतिहास चाळायचे
चल  मित्रा  होळी  मध्ये,
अशुद्ध विचार जाळायचे
------------------------------------
           
           का.रा.चव्हाण.
       "मातृतीर्थ"पेठपुरा,
              मेटकर रोड,
         यावली ( शहीद) .                     तालूका.जिल्हा.अमरावती             (     ८५५२८३३८३९     )
***********************
~~~~~~~~~ΨΨΨΨΨΨΨΨΨ~~~~~~~~
होळी करू अज्ञानाची
जलसाक्षरता वाढवुया
जपणूक करूया वृक्षांची
रेनडांन्सवर फुली मारूया


वृक्ष तोडीचे नकोच पातक
जलदानाचा  पायंडा पाडूया
कोरडे रंगही असती घातक
पुरणपोळी गरीबा खिलवूया

अंजना कर्णिक
~~~~~~~~~ΨΨΨΨΨΨΨΨΨ~~~~~~~~
!!  चारोळी  !!   

********************** 

वर्षाव व्हावा सप्तरंगांचा
नाती सारी बहरून यावी
दुःखे तथा सारी किल्मिषे 
होळीमध्ये जळून जावी.

***********************
नाव-श्री.मुटकुळे नरहरी दत्तराव 
गाव - परभणी.ता.जि.परभणी.
मोबाईल क्र.- 9405895130

%%%%%%%%%%%%%%%%
~~~~~~~~~ΨΨΨΨΨΨΨΨΨ~~~~~~~~
स्पर्धेसाठी .......चारोळी ----+-++++--++

    च(आरोळी )

     होळी आहे निर्गाचीच आरोळी 
     जेजे झाले जीर्ण कुचकामी l
     त्यात्या सर्व जुन्या वस्तू व रुढी 
     भस्म करणे मानवा तुझीच हमी ll

********------*********------*******

        नको मला लुगडी चोळी...,
        नको हवी खायला पुरणपोळी l
        धनी दुष्काळातही दिसावा डोळी..,
        साकडे घालुन पुजते मी होळी ll

********-------********------*******

     करुया आपण परीवर्तनवादी होळी ,
     जो तो रंगांना आनंदे उधळी l
     वापरुन रंगसर्व ईकोफ्रेंडली  ,
     करावी साजरी कोरडी रंगांची होळी ll

********-------*******-------*******
     
     वरील सर्व चारोळी स्पर्धेसाठी स्वीकार असावा.......
राम जाधव...
9637359723
~~~~~~~~~ΨΨΨΨΨΨΨΨΨ~~~~~~~~
नवरासांची पूरण पोळी करुनी
करुया होळी पुनव साजरी
नवरंगांची रांगोळी काढुनी
जपुया अंत:करण सारी
🖊✏✒✏🖋🖊
डॉ शिल्पा जोशी
~~~~~~~~~ΨΨΨΨΨΨΨΨΨ~~~~~~~~

सप्तरंगांची उधळण करून 
रंगांचा सण साजरा करावा .
दुष्काळाचा विचार करून 
पाण्याचा अपव्यय टाळावा 
   रत्नाकर जोशी 
         जिंतूर 
  ८२७५२३१६४१
~~~~~~~~~ΨΨΨΨΨΨΨΨΨ~~~~~~~~
कचरा आणि टाकाऊ काष्ट,
जाळुनी करा साजरी होळी!
नका करु वापर पाण्याचा,
करा साजरी कोरडी होळी!
             रामराव जाधव.
~~~~~~~~~ΨΨΨΨΨΨΨΨΨ~~~~~~~~
।।स्पर्धेसाठी।।

शिमगा आला,
पेटवा होळी...
नाचू-गाऊ
देऊ आरोळी...

डॉ.सखाराम भगत,इगतपुरी
मो.9527557069
~~~~~~~~~ΨΨΨΨΨΨΨΨΨ~~~~~~~~
राग ,द्वेष ,लोभ ,मत्सर 
दुर्गाणांची करुनी होळी
गोरगरीब अन शेतकऱ्यांस्तव
झाली एकरूप -एकसंध ही 
साहित्य मंथन ची टोळी.!
✍🏼✍🏼
नंदकिशोर सोवनी
~~~~~~~~~ΨΨΨΨΨΨΨΨΨ~~~~~~~~

चारोळी स्पर्धेसाठी
-------------------------------
जातीवादी राक्षसांची
करून टाका होळी
अन कुणाच्याही घरात
खा मस्त पूरणपोळी
-----ज्ञानेश्वर भामरे
~~~~~~~~~ΨΨΨΨΨΨΨΨΨ~~~~~~~~
आली होळी,खाऊ पोळी
दुर्गुण आगीत भस्म करोनी
नवरंग नभी उधळी
हर्ष रंगले मनोमनी
🖊✍🏼
नागेश काळे,चाकुर
~~~~~~~~~ΨΨΨΨΨΨΨΨΨ~~~~~~~~

होळी" निमीत्त स्पर्धेसाठी चारोळी.....

"चला चिमूकल्याची भरू
संस्काराने झोळी 
विकार आणि विकृतीची
करूयात होळी....!

               "राजेश रेवले"
                परभणी.
               मो.9623407165
~~~~~~~~~ΨΨΨΨΨΨΨΨΨ~~~~~~~~
वाईट नष्ट करण्या
साजरी होते होळी
तरीही घेतोच आजही
अत्याचार एखादा बळी
------ज्ञानेश्वर भामरे
~~~~~~~~~ΨΨΨΨΨΨΨΨΨ~~~~~~~~









~~~~~~~~~ΨΨΨΨΨΨΨΨΨ~~~~~~~~








डॉ. बाबासाहेब आंबेडकर गुणवत्ता विकास अभियान
जिल्हा परिषद नांदेड
आकलन क्षमता चाचणी
दिनांक 19 मार्च 2016
   📕📗📘📙📔📒📖📝📕📗📘📙📔📒📖📝                              
                               वर्ग : दुसरा

 📕📗📘📙📔📒📖📝📕📗📘📙📔📒📖📝     
वर्ग : तिसरा 

 📕📗📘📙📔📒📖📝📕📗📘📙📔📒📖📝     
वर्ग : चौथा 


 📕📗📘📙📔📒📖📝📕📗📘📙📔📒📖📝     
वर्ग : पाचवा 


 📕📗📘📙📔📒📖📝📕📗📘📙📔📒📖📝     
वर्ग : सहावा 


 📕📗📘📙📔📒📖📝📕📗📘📙📔📒📖📝     
वर्ग : सातवा 


 📕📗📘📙📔📒📖📝📕📗📘📙📔📒📖📝     
वर्ग : आठवा 




 📕📗📘📙📔📒📖📝T H E - E N D 📕📗📘📙📔📒📖📝  

धन्यवाद 



Monday, 14 March 2016

📚 कथा संग्रह 2016 साठी 📚

 सूचना -

* कथा स्वतः ची असावी
* कथा साठी शब्द मर्यादा 1000 शब्द
* कथा यापूर्वी प्रकाशित नसावी
* कथा text मध्ये खालील email id वर पाठविण्यात यावी
* कथा स्विकार करणे वा नाकारणे हे अॅडमिन समिती ठरवेल
* 31 मार्कच पूर्वी आपल्या कथा पाठविण्यात यावे
* कथेत काही सुधारणा असल्यास आपणांस कळविण्यात येईल
* सर्व निर्णय admin समिती कडे राखीव असतील
* email id  kathamala2016@gmail.com
* माझ्या पर्सनल 9423625769 या whatsapp अकाउंट वर सुध्दा पोस्ट करून कळवावे

📩 ज्यांना पोस्ट द्वारे कथा पाठवायाचे आहे त्यांच्या साठी पत्ता -
नागोराव सा. येवतीकर
मु. येवती पोस्ट येताळा
ता. धर्माबाद जि. नांदेड
मराठवाडा पिन 431809
मोबाईल - 9423625769

Sunday, 13 March 2016


📕📗🔴👜 🏃🏻🏃🏻🏃🏻🔴 📕📗🔴👜📕📗🔴👜 🏃🏻🏃🏻🏃🏻🔴 📕📗🔴
साप्ताहिक सदर ऑफ पिरियड 
मुख्याध्यापक खास ; तर शाळेचा विकास 



📕📗🔴👜 🏃🏻🏃🏻🏃🏻🔴 📕📗🔴👜📕📗🔴👜 🏃🏻🏃🏻🏃🏻🔴 📕📗🔴

🗽साप्ताहिक --विचारमंथन🗽
################
भाग :::::--47 वा--:::::::::
************************
⏰⌚⏰⌚⏰⌚⏰
वेळ::सकाळी 10:00 Amते सायंकाळी 7:00 Pm
+++++++++++++++++
विषय :-"""माझी शाळा""
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
संकल्पना:-अरविंद जी कुलकर्णी सर,अहमदनगर
''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''
संयोजक:-श्री.आप्पासाहेब सुरवसे,लाखनगांवकर,उ'बाद
((((((((((((((((((((((((((((((
संकलक:- श्री.ना. सा. येवतीकर सर ,धर्माबाद
))))))))))))))))))))))))))))))
परीक्षक:-- दिलीप धामणे सर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
ग्राफिक्स :-
श्री.क्रांति बुद्धेवार सर, धर्माबाद
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
श्री.मारूती खुडे सर,
माहुर जि:- नांदेड
.....................................
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
📕📗🔴👜 🏃🏻🏃🏻🏃🏻🔴 📕📗🔴👜📕📗🔴👜 🏃🏻🏃🏻🏃🏻🔴 📕📗🔴

[3/13, 10:15 AM] Aravind Kulakarni a"nagar: विचारमंथन स्पर्धेला सुरूवात झाली आहे , ही स्पर्धा सकाळी 10 ते सायंकाळी 7 वाजे पर्यंत चालेल !
ग्रूप मधे प्रत्येक जण शाळेत गेलेलाच आहे त्यांनी आपल्या शाळेतल्या आठवणी शेअर कराव्यात जे शिक्षक आहेत त्यांनी आपल्या शाळेची माहीती द्यावी ! प्रत्येकाने शाळे विषयी थोडी तरी माहीती सांगून आपला सहभाग द्यावा !🙏🙏
📕📗🔴👜 🏃🏻🏃🏻🏃🏻🔴 📕📗🔴👜📕📗🔴👜 🏃🏻🏃🏻🏃🏻🔴 📕📗🔴


📕📗🔴👜 🏃🏻🏃🏻🏃🏻🔴 📕📗🔴👜📕📗🔴👜 🏃🏻🏃🏻🏃🏻🔴 📕📗🔴
[3/13, 12:59 PM] ‪+91 94040 71984‬: 🎅माझी शाळा🎅
माझ्या  वडीलांची सरकारी नोकरी असल्याने मला  ब-याच शाळेत जावे लागले.  परंतु जास्त कालावधी गेला तो बीड मधील चंपावती विदयालय या शाळेत.  तेथील अनेक अाठवणी मनात साठवल्या अाहेत. मुख्य म्हणजे तेथील शिक्षक वर्गाच्या वागणुकीचे अत्यंत उत्कट अनुभव अाहेत.  मुख्याध्यापक श्री कुलकर्णी यांची वागणूक अत्यंत अादर्श होती.   मी फारच हुशार वगैरे नव्हतो पण हायर सेकंड क्लास कधीही न सोडणारा असा होतों. पण त्यांचा फारच लाडका विद्यार्थी   होतो.  ते मला  म्हणायचे शंकर,  कारण त्यांच्या एका मिञा सारखा मी दिसत असे.
अामच्या शाळेत अ. अाणि ब अशा दोन तुकड्या होत्या. अर्थात अ वर्गात अाघाडीचे विद्यार्थी तर ब वर्गात अामच्या सारखे विद्यार्थी होते. आमच्या वर्गात एक उन्मेश नावाचा मुलगा असला,तो माञ अत्यंत हुशार होता. अ अाणि ब वर्गात. स्पर्धा तर होतीच गुणवत्ता यादीत. येण्याची.  परंतु अाम्ही सदैव मागेच रहायचो.      उन्मेश मुळे आमच्या अाशा वाढ ल्या होत्या.
परंतु नववीत असताना उन्मेश शाळा सोडून गेला व सर्वच वर्ग हताश झाला अ वर्गातील मुले,,मुली चिडवायला लागल. एकदा कुलकर्णी सरांच्या तासाला काही मुलींनी ही तक्रार मांडली व दोन तीन मुलींच्या डोळ्यांत पाणी अाले तेव्हा  सरांच्या लक्षात हा प्रश्न आला व त्यांनी  पं. बिस्मिल्ला खान शहनाईवादक यांचे उदाहरण देऊन समजावले की मी नवीन उन्मेश तयार करीन ,पूर्ण  तासभर कुलकर्णी सरांनी फक्त अाम्हास  उत्साहीत करण्यात घालवला.  काही मुले /मुली यांनी अापणसुद्धा.गुणवत्ता यादीत येऊन अ वर्गाला दाखवून देण्याचे ठरवले,(त्यात मी सुद्धा)
  परंतु  गंमत म्हणजे  उन्मेश देखील. दहावीच्या वर्गात परत अाला. बोर्डाची गुणवत्ता यादी जाहीर झाली त्यात ब वर्गातील तीन (उन्मेश धरून) तर अ वर्गातील दोन विद्यार्थी आले. मी गुणवत्ता यादीत आलो नाही परंतु A+ श्रेणीत. उत्तीर्ण झालो..
    सुनील बेंडे वसमत🙏🏿🙏🏿🙏🏿
📕📗🔴👜 🏃🏻🏃🏻🏃🏻🔴 📕📗🔴👜📕📗🔴👜 🏃🏻🏃🏻🏃🏻🔴 📕📗🔴

[3/13, 2:06 PM] ‪+91 72495 90174‬: मी लहान असतांनाच(4वर्षाचा)मोठ्या बहिणी बरोबर शाळेत जायचो .मला सांभाळायला घरी कोणीच नव्हतं म्हणून.
बाप सालगडी म्हणून कामाला जात व माय  मोलमजूरीला शेतात जाई.
नंतर पाच वर्षाचा झाल्यावर माझे नाव  शाळेत टाकले(1979)
जि.प.मराठी शाळा नं -3 वाघाडी.
माझ्या शाळेचा परीसर खुप मोठा नाही पण बर्यापैकी आहे .शाळेत गुलमोहर चे पाच झाडे होती .
ती झाडं म्हणजे आमचे गप्पा मारण्याचे ठिकाण होते.
तिसरीला आम्हाला
रामदास गुरूजी होते त्यांचा आवाज दणकट व मोठा होता.
ते अजाण आम्ही तूझी लेकरे व देहाची तिजोरी या दोन प्रार्थना म्हणत .ज्या त्यावेळी त्यांचा आवाज सर्व गावात घुमायचा व आमच्यावर संस्कार करायचा.
चौथीला असतांना स्काॅलरशिप च्या परीक्षेत बसलो होतो .परीक्षेला पाच किलोमीटर पायी पायी गेलो होतो.
पास झालो नाही पण शिरपूर बघायला भेटले.हा आनंद मोठा होता.
शाळेत त्या वेळी दुध भेटायचे .आम्ही दुध आणायला डेअरी वर जायचो .रस्त्यात दुध पिऊन घ्यायचो व दुधाची कमी  होवू नये म्हणून पाणी टाकून द्यायचो.
दुध गरम करून आम्हीच वाटायचो.व उरलेल (उरवलेलं)आम्हीच दोन तीन जण पिऊन घ्यायचो.
चौथी पर्यत शाळेत वर्ग होते.पाचवी नव्हती .म्हणून शाळेचं महत्व फारच वाटायचं.
गावात कर्मवीर व्यंकटराव रणधीर यांनी हायस्कूल काढली म्हणून पुढे शिकायला भेटले.
या हायस्कूलने शिक्षणाबरोबर संस्कारही केलेत.
शाळा म्हणजे मायबाप नंतर शाळाच .....
तिचं महत्व अनन्य साधारण आहे जिवनात.
----ज्ञानेश्वर भामरे
📕📗🔴👜 🏃🏻🏃🏻🏃🏻🔴 📕📗🔴👜📕📗🔴👜 🏃🏻🏃🏻🏃🏻🔴 📕📗🔴

[3/13, 2:16 PM] ‪+91 94213 87623‬: माझी शाळा

"ही आवडते मज मनापासूनी शाळा
जशी लावते लळा माऊली बाळा"
.......एकंदर अशीच होती माझी शाळा.न्यू.इं.स्कू.जामनेरजि.जळगाव.येत्या 2019 मधे तिला शंभर वर्ष पुर्ण होतील.इंग्रजी  'ओ' आकारातील भव्य ईमारत.समोर सुंदर प्रवेशद्वार...त्यावर बोगनवेलीची छाया.परीपाठासाठी सानेगुरूजी सभागृह होते.दररोज पुर्ण परीपाठ होई.शनिवारी न चुकता कवायत व्हायची.वाणी सर व बॅंडपथक मस्तच घ्यायचे.शाळा दुमजली व दोन शिप्टमधे भरायची.आठ तुकड्या असायच्या.त्यात आमची सुपरतुकडी असायची.
       मध्यभागी मुख्याध्यापक व पर्यवेक्षक यांचे कार्यालय होते.शाळेच्या भिंती अतिशय बोलक्या होत्या नव्हे आजही आहेत कारण गेल्या बावीस नोव्हेंबरलाच आम्ही स्नेहमेळावा घेतला.अगदी भरभरून आम्ही तो दिवस जगलो.कारण बारावी सायन्स पर्यंत आम्ही तिथेच होतो.
       शाळेची प्रार्थना सुरू झाल्यानंतर कुणी शिक्षक जरी उशिरा ाले तरी बाहेर थांबावे लागे.कडक शिस्तीचे एन.सी.सी.चे लामखेडे सर बाहेर छडी घेवून उभे रहात.आणि विशेष म्हणजे गणवेशाला कधीच सुटी नसे.मुलींचा निळा-पांढरा व मुलांना खाकी हाप चड्डी व पांढरा सदरा.अगदी दहावी पर्यंत हाफ चड्डीच ्सायची हे विशेष.साळेत सतत स्पर्धा होत.मी कायम कबड्डी....खोखो व व्हालीबॉल खेळत असे.दर महिन्याला निबंध स्पर्धा...वत्कृत्व.....शुद्धलेखन स्पर्धा होत.एकदा माझ्यामुळे व्हॉलीबॉल जिंकलो म्हणून माझे काय कौतूक झाले होते.कबड्डीच्या राज्यस्तरीय वाढीव गुणांमुळे माझा डी.एड.ला नंबर लागली.हे शाळेचे ऋण कधीच फिटणार नाहीत.
       मी रागीट होते कधीकधी शिक्षकांसोबतही कट्टी करायचे.लामखेडे सर म्हणायचे...jayshri your range is on the top your nose...be cool.खरच किती काळजी घ्यायचे सर्व गुरूजन.सुसज्ज प्रयोगशाळा होती.तिथे सगळे प्रयोग प्रत्यक्ष करायचो.ग्रंथालयाचा पुरेपूर वापर करायचो.विसेष म्हणजे शाळेचा वाढदिवस दरवर्षी साजरा केला होतो.शाळेत तीन दिवस गणपती बसवायचे.खूपच छान वाटायचे.सांस्कृतीक कार्यक्रम व्हायचे.प्रजासत्ताक दिनानिमीत्त भरगच्च स्पर्धा व्हायच्या.मला बरयाचदा वत्कृत्वात बक्षिस मिळे तेव्हा परीपाठात कौतूक व्हायचं...कसलं भारी वाटायचं.
        गाईडचे शिबीर व्हायचे.तिथे श्रमदान व शेकोटी कार्यक्रमात मज्जा येई.फक्त संख्या भरपूर असल्याने सहल जात नसे.गुरूवारी बाजारामुळे आईची सकाळी शाळा असायची त्यादिवशी वडील स्वतः बॅंकेत जाण्यापूर्वी पोहे बनवून डबा आणून देत असत.
     तिन भाऊ व मी चारही जण त्याच शाळेत शिकलो.मी शिक्षीका...एक डॉक्टर व दोघं इंजिनीअर.शाळेन घडविलं अन आम्ही घडलो देखील.कृतज्ञता म्हणून नुकतेच स्नेहमेळाव्यात शाळेला छोटीशी भेट दिली व शिक्षकांनी सन्मानीत केले.......शाळेच्या आठवणीत सहाध्यायी व शिक्षकवृंद यांच्यासाठी ......"अशी पाखरे येती आणिक
स्मृती ठेवुनी जाती
दोन दिसांची रंगत-संगत
दोन दिसांची नाती! !"....जयश्री पाटील.
[3/13, 2:30 PM] ‪+91 98697 85379‬: माझी शाळा🏨⏲📓📕📗📘📙📔📝🖊.......समज आल्यापासून बाहेरच्या जगातली पहिली वाटचाल म्हणजे माझी शाळा!आता जरी तो ईतिहास असला तरिही माझी जडण घडण व शिस्त याचंश्रेय पाकांसोबत शाळेला व शिक्षकांना जातं....या संधीने त्यांचे मनोभावे आभार🙏मी एका "convent school " मध्ये शिकले.पण घरचे संस्कार व पाया पूर्ञ तया राष्टीृय स्वयंसेवक संघचा होता.शिक्षक वर्गाचं खास कौतुक वाटायचंकारण त्यांना विद्यार्थी  व वर्गाचा सतत ध्यास असायचा.५० जणांचा वर्ग सांभाळायचा,नव्हे  घडवायाचा असे.शिस्तिचे धडे मला माझ्या शाळेकडून मिळाले. काही तास संपूच नयेत तर मधल्या सुट्टीपूर्वीचे कधी एकदा संपतात असं व्हायचं .शेवटच्या तासाला तर चक्क "count- down" चालू व्हायचं .आयुष्याला "rewind button"  असतं तर?
📕📗🔴👜 🏃🏻🏃🏻🏃🏻🔴 📕📗🔴👜📕📗🔴👜 🏃🏻🏃🏻🏃🏻🔴 📕📗🔴

[3/13, 2:33 PM] Aravind Kulakarni a"nagar: @ विचामंथन @ भाग - 47

* विषय :-  माझी शाळा *
-----------------------
माझी शाळा जिल्हा परिषद प्रषाला -आष्टी जि , बिड
या शाळेत इयत्ता 5 वी ते इ.11 वी ( मॅट्रीक ) पर्यत मी सन 1965 ते 1971 पर्यत मी या हायस्कूल मधे शिकलो ,
इंग्रजी चे रेडेकर सर ,मराठी चे ना .वा कुलकर्णी सर ,गणिताचे गव्हाणे सर ,इतिहास भूगोल चे उर्णे सर कायम लक्षात राहातील
रेडेकर सर इंग्रजी शिकवित एक शब्द चुकला की 1 छडी दुसर्याला 2 ,अशा वाढत्या भाजणी ने शिक्षा वाढत जाई त्या मुळे इंग्रजी शब्द संग्रह खुप वाढला !

पुढे 11 वी ला (मॅट्रीक ) हेडमास्तर श्री ,नेत्रूडकर सर स्वतः इंग्रजी शिकवित असत .  संपुर्ण शाळेत त्यांचा खुप दरारा होता ,रिटायर्ड मिल्ट्री मॅन होते खुप कडक शिस्त !त्यांचा इंग्रजी व्याकरणावर भर होता .
एकदा त्यांनी मला News (न्यूज ) चे अनेकवचन विचारले .  मी  Newses (न्यूझेस ) असे सांगीतले आणि पुढच्या क्षणी कानाखाली अशी बसली की दिवसा डोळ्यापुढे चांदण्या दिसू लागल्या .पण वार्षिक परीक्षेत मला इंग्रजीत 81 मार्क पडले .
मी जेव्हा जेंव्हा जामखेड ते नगर एस टी ने प्रवास करतो तेंव्हा तेंव्हा आष्टी च्या या जि प शाळेजवळून जातो .शाळेतल्या सर्व आठवणी ताज्या होतात .व नकळत डोळ्याच्या कडा ओलावतात !

विचारमंथन साठी अरविंद कुलकर्णी -अहमदनगर
(स्पर्धेसाठी नाही )
📕📗🔴👜 🏃🏻🏃🏻🏃🏻🔴 📕📗🔴👜📕📗🔴👜 🏃🏻🏃🏻🏃🏻🔴 📕📗🔴


[3/13, 2:39 PM] ‪+91 98813 84404‬: Hi friends these many days I was trying to participate in vichar Manthan but I was unable to do so due to my exam. But now as my exams are over so I am having much free time to participate in it at least for 10 days . So today I am feeling very happy to participate in this vichar manthan and its topic is 💐🏫my school🏫💐.
There are many schools in Nanded district and one of them is my school kids Kingdom . In this area my school is much popular and is having a total strength of 2 k students . And to hold such a huge strength of the students my school building has been designed in a special manner. To make learning more fun my school is on the bank of river and it conducts many different activities.And has a huge library ,  vast ground ranging from basketball court to football ground & hockey ground . It has a huge number of digital class rooms . Due to such digital classrooms we can interact with each other and learn effectively . It has Biology , physics , chemistry and computer Labs . And manage to all these things my school has a large number of teaching and non-teaching staff .
Our teaching staff is very friendly and focus towards every student in the class equally . They always give us suggestions when needed and are always ready to help . Also our principal sir and director mam are too good at their work . And I would also like to tell you one thing that my school is like my second home so I never want to miss it .
This is 🐯🦁VaRaD . G🦁🐯 from vichar Manthan , Nanded
📕📗🔴👜 🏃🏻🏃🏻🏃🏻🔴 📕📗🔴👜📕📗🔴👜 🏃🏻🏃🏻🏃🏻🔴 📕📗🔴


[3/13, 3:06 PM] ‪+91 97650 01266‬: भाग- पहिला

विचारमंथन :- माझी शाळा

 शाळा...अत्यंत जिव्हाळयाचा विषय. बालपणात घेवून जाणारा विषय. बालपणींच्या कडू -गोड आठवणी जागृत झाल्या. आयुष्य परत एकदा शालेय जीवनात गेले असे वाटून गेले.
   माझे वडील स्टेट बँकेत असल्याने दर पाच वर्षांनी बदली व्हायची. मग नवे गाव, नव्या मैत्रीणी,नवीन शाळा...लाभत राहिली.
नेपानगर (म.प्र.) इथे पहिल्यांदा शाळेत पाऊल पडले. शाळेचे नाव आठवत नाही. पण हिंदी शाळा होती. आठवते एवढेच की, माझे रोजचे काम हेच होते की मी रोज टिफीन बाॅक्स हरवून यायची. बाबांच्या खूपच लाडाची होते मी. बाबा रोज नवा टिफीन घेवून ही यायचे. पण आई मार द्यायची. पण रोज कसा टिफीन हरवायचा काही ठावूक नाही.
  मग एक- दीड वर्षातच बाबांची बदली महाराष्ट्रात अकोला जिल्हयातील बाळापूर येथे झाली. इथे मराठी शिक्षण. घरची भाषा हिंदी होती. शिक्षण मराठीत सुरू झाले. मराठी समजत नव्हते. बोलता येण्याचा तर प्रश्नच नव्हता. त्यामुळे मी वर्गात गप्पच राहायची. माझी कुणी मैत्रीण ही व्हायला तयार नव्हते. एकटीच टिफीन खायची. एक दिवस माझा टिफीन कुत्र्याने मी जेवत असतांनाच माझा टिफीन खावून घेतला. मी पाहातच राहिले. कुत्रा निघून गेल्यावर एक मुलगी माझ्याजवळ आली आणि मराठीत काही तरी बोलली. काय बोलली समजले नव्हते पण टिफीन विषयी काही तरी बोलली असावी असे वाटून गेले. तिचे नाव साधना होते. तीच माझी पहिली मैत्रीण होती. तिच्या मदतीने मी मराठीत कशाला काय म्हणतात शिकू लागले. मराठी अवगत होवू लागली होती. मी हिंदी साईडर आहे हे माझ्या मॅडम लोकांना ठावूक होताच त्यांनी ही मला सांभाळून घेतले व खूप मदत पण केली.
मला आजही आठवते,माझे अक्षर खूपच खराब होते. हूशार होती पण अक्षर...? मला लांडे मॅडम होत्या त्या मॅडमनी माझ्या दोनशे पेजेसच्या बुकावर ....

पुढे......
[3/13, 3:10 PM] ‪+91 97650 01266‬: भाग- दुसरा

पेन्सीलने रेषा आखून दिल्या होत्या.
त्या बुकावर मला रोज पाच ओळी शुद्धलेखनाच्या लिहून न्यावेच लागे. ती सवयच झाली होती मला. बघता बघता माझे अक्षर कधी सुधरून गेले कळलेच नाही. आज जे छापीव मोत्यासमान माझे अक्षर आहे हे त्या मॅडमचीच देण आहे. मराठीत शिक्षण असूनही 5व्या वर्गापर्यंत पहिला नंबर कधीच सोडला नाही. मुख्याध्यापक मॅडमनी मला अगदी पहिल्या दिवशीच श्रीमुखात बजावली होती. त्यांनी कुठला तरी प्रश्न विचारला होता. पण मला मराठीच समजत नसल्याने मी उत्तर दिले नव्हते. सोपा प्रश्न असूनही उत्तर का दिले नाही म्हणून मार बसला. मग माझ्या मॅडमनी त्यांना सांगीतले तशा त्या खूप ओशाळल्या होत्या.
  बाबांची बदली अमरावतीला झाल्याने शाळा सोडून जाणे आलेच. पाचवीचा निकाल हाती घेतांना मुख्याध्यापिका मॅडमने माझी पाठ थोपटली होती. मराठी बोलायला जमू लागले होते. मैत्रीणी पण झाल्या होत्या. शाळेत दाखला घेतांना खूप रडायला आले मला. गाव सोडण्याआधी प्रत्येक मैत्रीणीच्या घरी जावून मी भेटली होती.
     अमरावतीला Goverment Girls Highschool ला सहावीला प्रवेश घेतला. नवे शहर, नव्या मैत्रीणी, नव्या मॅडम सर्व काही हळूहळू जमले. मजल दरमजल करीत नववीपर्यंत सुरळीत शिक्षण पार पडत गेले. 2,3,5 नंबरपर्यंत मी टिकून राहिले. एक हूशार विद्यार्थिनी म्हणून परिचित होत गेले. विविध स्पर्धेतही नाव होत राहिले. नववीत असतांनाच मधेच बाबांच्या डोळयांचे ऑप्रेशन झाले. आई ही खूप आजारी पडली. मी मोठी. पूर्ण जबाबदारी येवून पडली. आत्या, मावशीला बोलावले पण कुणीच आले नाही. मलाच करणे भाग होते. सर्व सांभाळावे लागत होते. शाळेत जाता येईना. शिक्षण सोडण्याची वेळ आली. वर्गात सतत तीन महीने गैरहजर राहिले. एव्हाना नाव काढले असेल असे वाटून शाळा शिकण्याचा विचार.....
[3/13, 3:12 PM] ‪+91 97650 01266‬: भाग:- तिसरा

सोडूनच दिला होता.
पण एक दिवस बागडे मॅडम माझ्या घरी आल्या. या मॅडम मला शिकवायला सातवी पर्यंतच होत्या. आठवी पासून दुस-याच मॅडम होत्या आणि मी नववीला होती. मॅडमला बघून मला खूपच आनंद झाला. शाळा आठवून गेली. माझे डोळे भरून आले. मॅडमनी आईला शाळेत का पाठवित नाही मुलीला, असे विचारले.
खरी परिस्थिती समजताच मॅडमनी मुख्याध्यापिकेशी बोलण्याचे व माझे शिक्षण पूर्ववत करण्याचे आश्वासन दिले. बागडे मॅडमच्या कृपेने माझे शिक्षण परत सुरू झाले. तीन महिने गैरहजर राहूनही मी वर्गात सहाव्या नंबरने पास झाली. निकालाच्या दिवशी खुद्द बागडे मॅडम आवर्जून हजर होत्या.
दहावीचे ही वर्ष निर्विघ्न पार पडले. दहावी पास होताच लग्न करुन देण्याचा मुद्दा उभा झाला. मग परत शिक्षणात अडथळा आला.पण आता मला शिकायचे होते. आई ऐकत नव्हती. मग मी पण जिद्दीला पेटले. मी बाबांना आपलेसे केले. अकरावी वाणिज्य शाखेला प्रवेश घेतला. मला बाबांसारखी बँकेत नोकरी करायची होती. अकरावीत कासट मॅडम खूप छान होत्या. अकांऊंट शिकवायच्या. खूप आवडायच्या मला. खूप जीव तोडून शिकवायच्या. त्यांच्याच सततच्या मार्गदर्शनाने मी बारावी 68%ने पास झाली.
परत बाबांची बदली झाली आणि चांदूर रेल्वेला अशोक महाविद्यालयात पहिल्या वर्षाला प्रवेश घेतला आणि पदवीधर झाले.

   समाप्त.

निर्मला सोनी.
[3/13, 3:16 PM] ‪+91 97650 01266‬: शेवटचा पॅरीग्राफ अर्धवटच पोस्ट झालाय.

अशोक महाविद्यालयात प्रवेश घेतला. इथे ही चांगल्या जीवलग मैत्रीणी भेटल्या ज्या आज ही येवून भेटतात. प्राध्यापक ही खूप चांगले लाभले. त्यांच्या उत्कृष्ठ मार्गदर्शनानेच पदवीधर होणे सोपे झाले.

निर्मला सोनी.
📕📗🔴👜 🏃🏻🏃🏻🏃🏻🔴 📕📗🔴👜📕📗🔴👜 🏃🏻🏃🏻🏃🏻🔴 📕📗🔴

[3/13, 3:29 PM] ‪+91 96375 71723‬: ll माझे  शालेय .....मंतरलेले दिवस ll

      मी व माझा जुळा भाऊ आमची 'राम व शाम' ची फार खट्याळ पण हुशार जोडी.आम्ही ज्या ज्या शाळेत गेलो त्यात्या शाळेतील आम्हाला लाभलेल्या सर्व आमच्या हित चिंतक
शिक्षकांना आजवर स्मणात रहीलेलो पराक्रमी ( सर्व क्षेत्रांत ) विद्यार्थी म्हणुन नंतर नंतर लौकिक मिळवलेले विद्यार्थी .
      ईयत्ता १ली ते ४थीचे वर्गशिक्षक मा.फुलसिंग ठाकुर गुरुजी त्यांनी ज्या आत्मियतेणे आम्हाला घडविले. जसे ओल्यामातीच्या  गोळ्याला कुंभार सुंदर माठाचा आकार देतो  व सुकवण्यासाठी कडकडीत ऊन्हात ठेऊन,दोन चार पाण्याचे हंडे ओतल्यावर तग धरू शकेल ईतकी कमाल क्षमता येण्यासाठी, आगिच्या भट्टीत शेकण्या सारखे बहुतेक प्रयोग व वैशिष्ट्येपुर्ण वैयक्तिक सामुहीक स्पर्धा यांचे रास्त अनुभव दिलेत.
         असाच एक अविस्मरणीय प्रसंग दोंडाईचे येथिल  जि.प.मराठी शाळेतील  ईयत्ता ४थीतला माझा नि माझ्या ठाकूर गुरुजींचा आहे. .यावेळची चित्रकला स्पर्धा संपुर्ण  शिंदखेडे तालुक्यातील ईयत्ता १ली ते ७वी च्या जि.प.मराठी शाळा स्तरावरील भरवण्यात आली होती.त्या स्पर्धेत सहभाग घेण्या पासुन ते दोंडाईचे ते शिंदखेडे येथे ने आण करण्याचासर्व
खर्च माझ्याच ठाकूर गुरुजींनी केला होता.त्या स्पर्धेत सर्व  शिक्षकांना ठाकुर गुरुजींनी मी रेखाटलेले व नंतर रंगवलेले चित्र एखाद्या जन्मदात्यांने आपल्या आपत्याचा कौतुक सोहळा लावावा ,तसे बोलवुन बोलवुन दाखविले. ते "मी पाहीलेला स्वनातील राक्षस "या विषयावरील चित्र दाखवतांनाची ठाकुर गुरुजींच्या डोळ्यातील चमक काही वेगळीच होती ती आजही मी आठवतो .नंतर त्या  स्पर्धेत माझा  प्रथम क्रमांक आल्यावर ,ठाकुर गुरुजी तर मला खांद्यावर धरुन भारावुन नाचले ही होते.हे सर्व पाहुन मोठे दादा गुरुजी शाळेचे मुख्याध्यापक फारच हासले होते त्यांनी ही माझे गोडगोड शब्दात कौतुक अभिनंदन व सत्कार केला होता.......मित्रांनो.........राम जाधव -कलाशिक्षक -धुळे
[3/13, 3:33 PM] ‪+91 96375 71723‬: मित्रांनो मला आजही तो क्षण ताजाच वाटतो आनंद अश्रू देणारा नि माझ्या शालेय .......मंतरलेले दिवसांत नेणारा वाटतो
          आयोजकांनी खरोखर मोठा जिव्हाळ्याचा विषय शालेय  दिवसांच्या  जुन्या आठवणी ताज्या करुन घेतल्या त्याही लिखित स्वरुपात..............धन्यवाद
📕📗🔴👜 🏃🏻🏃🏻🏃🏻🔴 📕📗🔴👜📕📗🔴👜 🏃🏻🏃🏻🏃🏻🔴 📕📗🔴

[3/13, 4:11 PM] 215 Sangita deshamukh Vasmat: 🌷विचारमंथन🌷
   🏡माझी शाळा 🏡
   माझी शाळा एका युगपुरुषाच्या,राष्ट्रपुरुषाच्या नावाने चालते,जे नाव उच्चारताच आपल्यात एक प्रकारचे चैतन्य निर्माण होते.ही माझी शाळा  म्हणजेच श्री शिवाजी माध्यमिक विद्यालय,सवना ता.महागाव ही होय. शाळेचा परिसर आणि त्या शाळेतील सर्व गुरुजनवर्ग हे  माझा व्यक्तिमत्त्व विकास घडविण्यास कारणीभूत घटक आहेत.
शाळेतील प्रत्येक बाब ही अभिमानास्पदच!विद्यार्थ्याचा फक्त बौद्धिकच नाही तर विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास कसा होईल,या दृष्टीने उपक्रम राबविले जायचे.शाळेची शिस्त फार कडक! प्रत्येक शिक्षक हे व्यासंगी!गाईडची कधी गरजच पडली नाही. कोणतीही समस्या घेऊन गेले की संबंधित शिक्षक चुटकीसरशी सोडवायचे. शिक्षकांसोबतचे संबंध हे फार जिव्हाळ्याचे होते. घरी जेवढा आईबाबांचा आधार वाटायचा तेवढाच शाळेत गुरुजनांचा वाटायचा. शाळेत सांस्कृतिक कार्यक्रमातूनही वैविध्यता जपली जायची.  २ऑक्टोबर "गांधी जयंती" ही संपूर्ण गाव,गावातील पाणवठे,या ठिकाणी स्वच्छता करुन साजरी केल्या जायची.सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे धडे तिथेच मिळाले.शाळेतील पारगावकर मॅडमची फार लाडकी!तशी सर्वच शिक्षकांची लाडकी होते कारण वर्गातील पहिला नंबर कधी सोडला नव्हता. सांस्कृतिक कार्यक्रम, खेळाच्या स्पर्धा,वक्तृत्व,वादविवाद अशा सर्व स्पर्धांमध्ये आवर्जून सहभागीच नाही तर पहिल्या तीन क्रमांकात असायचे.
        या शाळेचा  सर्वात जास्त मला अभिमान वाटावा असावी अशी बाब म्हणजे,या शाळेतील शिकविण्याची अभिनव पध्दती!मी आठवीला असताना आम्हाला विज्ञान एकत्र विषय नव्हता. जीवशास्त्र,रसायनशास्त्र,भौतिकशास्त्र असे तीन विषय असायचे. आठवड्यातून प्रत्येकी दोन तासिका. यातील प्रत्येक विषयाची एक तासिका ही वर्गात थिअरी म्हणून सर शिकवायचे आणि दुसरी तासिका ही प्रयोगशाळेतच व्हायची. तीनही विषयाच्या तीन वेगवेगळ्या तीन प्रयोगशाळा!याचे मला अप्रूप वाटण्याचे कारण म्हणजे आज मी आजूबाजूला नावाजलेल्या,प्रतिष्ठित शाळा पाहते.पण एकाही शाळेत प्रयोगशाळेचा वापर दिसत नाही. विज्ञानाची एकेक संकल्पना मनात अशाप्रकारे रुजविण्याचे काम माझ्या शाळेने केले.आज अकरावी-बारावीच्या विद्यार्थ्याना तर कोचिंगच्या हव्यासापायी प्रयोगशाळेची आवश्यकता उरली नाही. त्यांच्यात प्रयोगशीलता कुठून यावी?
  या शाळेने माझ्या संस्कारक्षम वयात खूप चांगला आकार देण्याचा प्रयत्न केला. शिक्षक समाजाची बांधणी करणारा अभियंता असतो,असे म्हणतात. ते लहानपणी कळत नव्हत पण आता माझ्या शिक्षकांना आठवताना मात्र ते खरोखर पटते.
         "या घरट्यातून पिल्लू उडावे
           दिव्य घेऊनी शक्ती,
          आकांक्षाचे पंख असावे,
           उंबरठ्यावर भक्ती."
 या काव्यपंक्तीप्रमाणे त्या घरट्यातून बाहेर पडून आता २४वर्षे पूर्ण झाली पण त्या शाळेच्या उंबरठ्यावर मात्र कृतज्ञतापूर्वक भक्ती ही आजही आहे.
   माझी शाळा लिहिण्याच्या निमित्ताने आठवणीचा पूर आला होता. त्यातील जेवढे साठवता येईल तेवढे साठवण्याचा प्रयत्न केला. संयोजकाचे आभार 🙏🏻. यानिमित्ताने बालपणात नेवून सोडले.
  संगीता देशमुख,वसमत

📕📗🔴👜 🏃🏻🏃🏻🏃🏻🔴 📕📗🔴👜📕📗🔴👜 🏃🏻🏃🏻🏃🏻🔴 📕📗🔴





📕📗🔴👜 🏃🏻🏃🏻🏃🏻🔴 📕📗🔴👜📕📗🔴👜 🏃🏻🏃🏻🏃🏻🔴 📕📗🔴


📕📗🔴👜 🏃🏻🏃🏻🏃🏻🔴 📕📗🔴👜📕📗🔴👜 🏃🏻🏃🏻🏃🏻🔴 📕📗🔴

[3/13, 5:14 PM] ‪+91 74989 64901‬: विचारमंथन भाग:४७/जागृती निखारे
विषय: माझी शाळा
****************************
     कौलारू अन् अवाढव्य परिसर असणारी माझी सुंदर शाळा! आजही जशीच्या तशीच नजरेसमोर उभी आहे.ही माझी पहिली शाळा! ह्या शाळेचा काही भाग वेशीजवळच्या छोट्या खोल्यांमध्येही भरत असे.मागच्या भागात सुंदरशी बाग होती.मोगरा, जुई, शेवंती अश्या सुगंधी फुलांनी बहरलेली! ही शाळा माझ्या माईची म्हणजे आजीची( आईची आई), ती मुख्याध्यापिका होती ह्या दोनही शाळांची झेड.पी.मध्ये.आमची आई टीचर्स ट्रेनिंगला होती ; त्यामुळे आम्ही भावंडे आजीकडे शिकायला, रहायला होतो.उमराणे येथे! गांव छोटेसेचं पण शाळा मस्तच! मोठ्या बाईंची नातवंडे म्हणून लाड होतच.पण अभ्यासाबाबत मात्र शिस्तीचा बडगा होता. खेडेगांवातील शाळा पण शिक्षण त्या काळाप्रमाणे अद्ययावत होते.जीवनावश्यक कला, ईतर विषयांसोबत शिकविल्या जात होत्या.शाळेच्या मोठ्या आवारात ;मला आठवतेय् की मोठ्या वर्गातील मुलांना ठराविक २×२चे चौकोन देत असत.त्यात मुलांना छोटे छोटे चर खोदायला लावत.माती भुसभुशीत करून तिला पाणी देऊन ओली करत मग त्यात वेगवेगळ्या बिया पेरायला सांगत.रोज निगराणी करायला लावून शेतीत पेरणी करण्याचे शिक्षणही दिले जात असे.त्या बियांची रोपे मोठी झाल्यानंतर मिळणारा आनंद आभाळाएवढा असायचा.रोजचा अर्धा तास असा चमत्कार करून दाखवायचा. वृक्षारोपणही तिथे शिकलो.पहिली पास झाल्यावर मग आईकडे आलो;मालेंगावला! हो तेच दंग्याचे मालेंगाव😊! मग म्युनिसिपालटीच्या शाळेत रवानगी झाली.येथे आईनी स्वतःच्या शाळेत घातले नाही. ती दुसर्या शाळेत ईंग्रजी शिकवायची.कॉन्व्हेंट स्टुडंट होती ती ! हुषार! त्या शाळेत अभ्यासावर, वत्कृत्वावर , शुद्धलेखन तसेच सुंदर हस्ताक्षर यावर भर होता.गायनाचा तास होता.पी.टी.असे सगळेच विषय सुंदर शिकविले जात.प्रत्येक मुलांकडे जातीने लक्ष दिले जात असे.पण प्रत्येकाची बौद्धिक क्षमता असतेच.मी हुषार गटातील विद्यार्थिनी होते. ४ थी पर्यंत शिक्षण या शाळेत पार पडले.मग आमची रवानगी रूक्मिणीबाई झुंबरलाल काकाणी कन्या विद्यालयात झाली.पांचवी , सहावी किल्याच्या शाळेत पार पडली.आमची शाळा मालेंगावच्या भुईकोट किल्यातल्या ईमारतीत भरत असे.जिथे राजे रहात होते.तेथे आम्ही शिक्षणाच्या निमित्ताने कां होईना पण वास्तव्य केले.कोनीन कोना हुडकून काढला किल्याचा! पी.टी.करतांना कोणी कुचराई केली तर कुलकर्णी मँडम किल्याभोवती पळायला सांगत! एवढा मोठ्ठा फेरफटका मारण्यापेक्षा सगळेजण मन लावून पी.टी.करत.खेळ खेळत.मी मुळात नाजूक असल्याने पळणे, सुईदोरा ओवणे,लिंबूचमचा शर्यत यात भाग घेत असे.त्याच शाळेत रात्री खगोलशास्त्राची माहिती विद्यार्थ्यांना मिळावी म्हणून आभाळाचे निरिक्षण केले जायचे.
नेहरू तारांगणातील छत्रीसारखी छत्रीही शाळेत होती.कापसेसर ती दाखवायचे.सुळेसर, सुळेमँडम म्हणजे शाळेचा आत्माच! नारळाचे रूप! कासार सर, वाडेकर सर, पुणतांबेकर ,कापसे, हिंगे, टोपे, येवलेकरमँडम कितीतरी नावे ह्दयाच्या कोपर्यात घट्ट रूजली आहेत.सातवीत शाळा गावातच भरू लागली.कापसे गल्लीत! ह्या शाळेचे वैशिष्ट्य असे की ही शाळा माझ्या बाबांचे घर होते; परिस्थितीमुळे दुसर्याचे झालेले;खुपच मोठ्ठे! आम्ही ज्या घरात राहू शकलो नाही त्याच घरात विद्यादान घडत होते.त्यामुळे दिवसातील ६ तास तेथे राहण्याचा आनंद लुटला.शाळेत सगळ्यांना हे माहित होते. तिथे वर्ग कमी पडत होते म्हणून आमचे काही वर्ग रथगल्लीत भरत असत्.तिथे एक वर्ष काढले. आमच्या शाळेत कार्यानुभवही शिकवत असत.नाटके, एकाकिका शाळेत होत असतं.मी पाचवीपासूनच नाटकात काम करत असे.वयम् मोठम् खोटम् ही पहिली एकांकिका.किल्ल्याच्या ज्या रंगमहालात राजेरजवाडे आपली करमणूक करून घेत त्याच रंगमहालात आम्ही स्टेज शो केले.शाळेची गँदरिंग्ज, ड्रॉईंगच्या परिक्षा, गाण्यांचे कार्यक्रम, निरोपसमारंभ असे अनेक सोहळे पार पडले.ह्याच सुंदर शाळेत आम्हाला नुसते शिकविले नाही तर घडविले आहे.शिवणापासून ते शास्त्रापर्यंतचे शिक्षण दिलेय.या शाळेने आम्हाला ईंग्रजी शिकविले नाही तर ईंग्रजांच्या देशात जाऊन त्यांच्यावर कुरघोडी करायला शिकविले आहे.या शाळेने आम्हाला विद्या विनयेन् शोभते म्हणून विनयही अंगी बाणवलाय्!
 माझ्या या शाळेतून खुप नामवंत व्यक्ति नावारूपाला आल्यात.पु.ल.देशपांडे ही माझ्या शाळेचा हिस्सा होत.शिरिष कणेकर मालेगांवचे! अजून कित्ती कित्ती गुण गाऊ! गुण गाईन आवडी; माझी शाळा पाहण्याजोगी!
प्रत्येक विषयाला त्यावेळीही लागणारी साधने वापरून तो विषय सहज सोपा करण्याची हातोटी आमच्या शिक्षकांमध्ये होती.शाळेचे मंत्रीमंडळ असायचे.विद्यार्थ्यांच्या बारीक सारीक तक्रारी शिक्षकांकडे न जाता परस्पर मंत्रीमंडळाकडे जात असत.तिथेच त्याचे निरीकरण होत असे.शांतपणाने. शाळेची प्रार्थना सकाळी आवारात ठराविक गोड आवाजातल्या मुलींसोबत होत असे.शाळा सुटल्यानंतर भग्वद्गीतेचा दुसरा, पंधरावा अध्याय आणि रामरक्षा पठण दिवस ठरल्याप्रमाणे होत असे. नवरात्रात नऊ दिवस शारदोत्सव असे.गुरूवारी गुरूदेवदत्ताची आरती असे.कपाळाला कुंकू नसेल तर उभे रहावे लागे शिक्षा म्हणून!  नववीपासून साड होती.दोन्ही खांद्यावरून पदर, दोन वेण्या लाल रिबन बांधून वर बांधलेल्या! प्रभात फेरीतून देशभक्ती रक्तात रूजली.😊
त्यातही फारच मजा होती.सुळे मँडम बोटांच्या तालावविद्यार्थ्यांची शिस्त सांभाळत.एक बोट दाखवित त्यावेळी पदर सांभाळा, दोन बोटे दाखविली की शांत रहा, तीन बोटे दाखविल्यावर बोला.अशी शिस्त चकार शब्द न उच्चारता राखू शकले; त्या आमच्या शिक्षकगणांना शतशः नमन.
खुप काही लिहिण्यासाऱखे आहे.कडक शिस्त असली तरी कधी कुणा विद्यार्थ्याची तक्रार पालकांकडे गेली नाही.कुणा पालकांनी शिक्षकांची तक्रार केली नाही.शिक्षकांनी छडी मारावी अशी परिस्थिती निर्माण झाली नाही.
हुषार, गरीब मुलामुलींना सुळे सर, मँडम फुकटात शिकवत.शाळेतही फुकटात कोचिंग क्लास होते.मग फुकटात कोणी येत नसे.मग अवघी ३ रू.फी ठेवली होती.👍😊
 शाळेच्या ट्रिपला जातांना आमचा नारा होता" आर.झेड.के.आर.झेड.के.वुई.आर द गर्ल्स ऑफ आर.झेड.के" सो आय एम द गर्ल ऑफ आर.झेड.के.हिप हिप हूर्रे!😊
आजही माझ्या पहिलीपासूनच्या, पाचवापासूनच्या मैत्रिणी फोनवरून आणि वॉटस्अँपवरून संपर्कात आहेत.कुठेही  असो आम्ही; शाळा आमुची एक असे.👍👌😊👬👫👫👫🎹🎼🎵💐🙏🏽

© जागृती सुधीर निखारे
[3/13, 5:51 PM] ‪+91 74989 64901‬: भाग-२
याव्यतिरीक्त वेगवेगळे सणही शाळेत साजरे केले जात असत.गुढीपाडव्यालापाटीवर सरस्वती काढून पाटीपूजन असे.दसर्याला शिवणसाहित्याची पूजा असे.नागपंचमीला नागाचे चित्र काढून आणायला सांगत असत.तसेच गणपतीउत्सवात गणपतीच्या चित्रांची रेलचेल असे.असे खुप काहिसे.१५ ऑगस्ट, २६ जानेवारीला तर जल्लोष असायचा.सगळ्या शाळा पोलीस परेड ग्राउंडवर जमा होत असतं आणि सामुहिक पी.टी.होत असे.स्पोर्टस् डे साजरे होत असतं.वत्कृत्व स्पर्धा  घेतल्या जात.शाळेत गरिबश्रीमंत हा भेदभाव नव्हता.
 खुप काही छानसं राबवणारी आणि संस्कारधन देणारी माझी शाळा!
आमची प्रार्थना सुंदरच आहे"
असंख्यात नांवे जया देती लोक" पुढे टाकीन गाऊन.
🙏🏽😊👫👫👫👫👫👫👫👫👫👫👫👫👫👫
📕📗🔴👜 🏃🏻🏃🏻🏃🏻🔴 📕📗🔴👜📕📗🔴👜 🏃🏻🏃🏻🏃🏻🔴 📕📗🔴

[3/13, 6:33 PM] ‪+91 99704 46447‬: शाळा

कोणीतरी एक कविता टाकली होती वॉट्स अप वर
एक बाक भेटून बोलतो या आशयाची (सर्वांनी वाचलीच असेल)

असो आज हा विषय निवडुन समस्त मंडळींनी सर्वांच्या च आठवणींना उजाळा दिला अन्  ब-याचशा विसरलेल्या गोष्टीही आठवल्या.
मला हलके हलके आठवते अजुनही ते दिवस माझा नविनच दाखला झाला होता शाळेत ते दिवस, तशी शाळा ही नविनच सुरूवात केलेली होती संस्थापकांनी, फार फार तीनच वर्षे झाली होती त्यामुळे त्यांचीही धडपड फारच, त्यातच परिस्थिती बेताचीच होती शाळेची कारण शुन्यातुन विश्व उभे रहात होते ती शाळा म्हणजे. सरांनी मला वय बसत नसताही दाखल करून घेतले होते साधारण वर्ष कमी होते वय तरीही वाढदिवसाच्या तारखेत बदल करून दाखल केले,खरे सांगायचे तर आमची अर्धी वर्ग संख्या तशीच दाखल झालेली परंतु तरीही इतक्या लहान वयाच्या मुलांना अगदी व्यवस्थित रित्या सांभाळायचे ते की सांगणे कठीण.
मी तर कठीणच कारण मला आजही चांगले आठवते समज कमी होती (सांगायला लाजही वाटते पण सत्य ते सत्य) मला आई शाळेत  सोडावयाची अन् जर माझ्या बाई (शिक्षिका) वर्गाला दिसल्या नाही तर माझ्या पेक्षा माझे पालक व इतर शिक्षक मंडळीच्या पोटात गोळा येत असे, कारण त्या नसल्या तर माझा एक तर अर्धा तास सुर लावुनी रडने किंवा पायरी वर बसुन घरी जाणेचा हट्ट धरणे हा नत्यनियम. 😜😜
अन् हे सर्व चालत असे 10X10 च्या चार रुम(म्हणजे दोन डबल रूम) मध्ये, हळुहळु दिवस मागे गेले शाळा विस्तारली समज आली माझे रडणे बंद झाले पण हट्ट नाही,शाळेत मला माझ्याच बाई वर्गाला हव्यात, आणि आमचे संस्थापकांनी माझ्या ह्या अजब हट्टापाई त्या बाईंना बढती देउन तिसरी पर्यंत माझी वर्ग शिक्षिका केले.करणे भाग पडले कारण मला आजही जुनी प्रगती पुस्तके आठवण करून देतात की मी अभ्यासात पैकीच्या पैकी मिळवायचो, माझे हट्ट चांगले वाईट,योग्य अयोग्य माहिती नाही पण आजही मला बाईंची शाबासकी मिळते की तु होता म्हणून बढती मिळाली अन् नाव चेह-याने ओळखतात मला.लाज वाटण्यापेक्षा आनंदच की बाईंची बढती मिळवून देण्यात माझा खारीचा वाटा 😜😊
असो तर शाळेत दंगा मस्ती सर्वच करतात मी ही केलीच आमच्या बरोबर वाढणारी शाळा आजही आठवते.
शाळेने शिक्षकांनी खुप दिले ती शिदोरी आजही जपुन ठेवली आहे अन् त्या वेळी शिकवले होते की नेहमी शिका तेच प्रयत्न आजही करतो अन् निरागस भावाने शिकतो आहे.
शाळेत शिक्षकांनी चुका क्षमल्या परंतु दंडितही केले अन् ते असे की चुका आयुष्यात कधी घडु नये पुन्हा, शतशः ऋणी आहे मी.
तशा शाळेत ब-याच तुकड्या तिसरी चौथी पर्यंत "अ" तुकडीत असायचो नंतर आलेख घसरून "क" तुकडीत थांबला तेव्हा माझे जुने प्रगती पुस्तक संस्थापकांनी त्यांच्या कार्यालयात पालकांसोबत दाखवले मलाच लाज वाटली अन् मार्ग विचारला असता ईतकेच सांगितले की ज्यामुळे आलेख ढासळला तेच कारण सुधारा समजण्यास वर्ष गेले मग सहावीत निकाल आल्यावर अक्कल आली, सातवी मध्ये "ड" तुकडीत जाण्याचे फर्मान हाती आले शिक्षकांना विनंती करून संस्कृत भाषा निवडली अन् "अ" तुकडी मिळवली परंतु कालमर्यादाही, ती अशी की आलेख खाली न जाता वर गेला सहामाही परिक्षेत तरच मला "अ" तुकडीत ठेवण्यात येईल अन्यथा...... तर बघता बघता दिवस गेले सहामाहीचा निकाल माझ्या पर्यंत न येता मलाच संस्थापकांच्या कार्यालयात बोलावणे आले आता सुचेना काही अन् निकाल हाती दिला गेला त्यात गुण फार वाढले नव्हते पण तरीही मला सांगण्यात आले आलेख ढासळला नसल्याने वर्ग शिक्षकांच्या जबाबदारी वर तुकडी बदल पुढे ढकलला आहे, वर्ग शिक्षकांनी मेहनतीत कसूर न पडु देता तयारी करवुन घेतली तशातच वडिलांचे सातवी ते दहावीचे शिक्षक योगायोगाने घरापासून काही अंतरावर रहाण्यास आले त्यांनी माझा शिक्षण आलेख उंचावण्याचे शिवधनुष्य उचलले अन् रोज नियमित सकाळ संध्याकाळ त्याच्या छत्रछायेत अभ्यास चालू झाला सातवीत मला 70% मिळाले.
ईतकेच नव्हे तर आलेख उंचावत जाऊन दहावीत संस्कृत विषयाला संपुर्ण शाळेत द्वितिय क्रमांक मिळविला. शिक्षकांच्या मेहनतीचे चिज झाले अन् द्वितीय क्रमांक मिळाल्या पेक्षा ही संस्थापक व शिक्षक यांचा विश्वास सार्थक केल्याचा आनंदच अधिक होता. ह्या पामरातला हा बदल शिक्षक अन् शाळाच करू जाणे.

ते दिवस मागुनही परत मिळत नाहीत.


🔔🔔🔔🔔🔔🔔
शाळा सुटली
😜😝😝😝.
SP.
📕📗🔴👜 🏃🏻🏃🏻🏃🏻🔴 📕📗🔴👜📕📗🔴👜 🏃🏻🏃🏻🏃🏻🔴 📕📗🔴
[3/13, 6:38 PM] नासा: माझी शाळा

मला लहानपणापासून शाळा आवडत होती काय ? या प्रश्नाचे उत्तर कदाचित नाही असेच येईल. मी घरात सर्वात लहान. त्यामूळे सर्वाचे माझ्यावर प्रेम असायचे. खास करून माझी छोटी बहीण. जिच्यामुळे मी शाळेत जायला शिकलो. माझे घर म्हणजे अगदी छोटे दोन रूमचे. वडील शिक्षक होते, पण ते दर आठवड्यास भेटायचे. त्यांच्याजवळ नेहमी एक सायकल आणि छत्री असायची.  पावसाळा असो उन्हाळा असो  वा हिवाळा. त्यांच्या विषयी माझ्या मनात नेहमीच आदरयुक्त भीती असायची. त्यांनी मला कधी रागावले नाही पण मनात एक वेगळीच धाक होती. अर्थातच मी पहिली आणि दुसऱ्या वर्गात रडत रडतच गेलो. तिसऱ्या वर्गात मात्र माझ्या सोबत ताई नव्हती कारण ती चौथी पास झाली आणि पुढील वर्ग त्या शाळेत नव्हते. त्यामूळे मला ताई शिवाय शाळेत जावे लागले आणि येथूनच कदाचित शाळेची गोडी लागली असावी असे वाटते.  या वर्गात शिकविणारे सर जेंव्हा बाजारात मला भेटतात तेंव्हा त्यांना खूप आनंद होतो हे त्यांच्या चेहऱ्यावर मला दिसून येते. त्यांना आनंदी पाहून माझे ही मन भरून येते. माझ्या पाऊलवाट पुस्तकाचे प्रकाशन झाल्याची बातमी वाचून माझे प्राथमिक शाळेतील शिक्षकानी चारचौघात कौतूक केले तेंव्हा मला जेवढा आनंद झाला त्यापेक्षा किती तरी पटीने आनंद  माझ्या गुरुजनांना झाला. मी तसा खूप हुशार असा विद्यार्थी नक्कीच नव्हतो पण पहिल्या दहा मध्ये नेहमीच असायचो. प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी धर्माबाद या मोठ्या शहरातील हुतात्मा पानसरे हायस्कूलमध्ये  शिकण्यासाठी आलो. मी खेड्यातून आल्यामुळे मला " ड " वर्गात प्रवेश देण्यात आला. या शाळेची पध्दतच होती की खेड्यातील मुलांचा वर्ग वेगळा ठेवण्याचा, ही शाळेची पध्दत मला कदापिच रुचली नाही तरी मला काही करता येत नव्हते. एक दोन वेळा प्रयत्न केला की अ किंवा ब या तुकडीत प्रवेश द्यावा पण मिळाला नाही. ड तुकडीच्या वर्गात सर्वच प्रकारची विद्यार्थी होती. अर्थातच सर्वगुणसंपन्न असा आमचा वर्ग. या वर्गातील सर्व विद्यार्थी जेमतेम होती त्यामूळे मी अभ्यासात वर्गात नेहमीच पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावर असायचो. याचा एक फायदा झाला की मी मन लावून अभ्यास करु लागलो. घरापासून आणि आईपासून दूर राहताना खूप दुःख वाटायचे. शनिवारी दुपारी शाळा सुटल्यानंतर गावाकडे जाण्याची ओढ लागायची. गावाकडील मित्र आणि त्यांच्या सोबत खेळण्याची मजा काही औरच.
या शाळेत भरपूर लिहिण्याचा योग आला ज्यामुळे माझे अक्षर लेखनात सुधारणा झाली. दररोज जवळपास सर्वच विषयांच्या एक दोन पान प्रश्नोत्तर लिहावे लागायचे आणि वही पूर्ण न केल्यास शिक्षा सुध्दा  मिळायची. इंग्रजी विषय शिकविणारे सर आमच्या ड वर्गाला " खेडे के येडे  " असे म्हणायचे तेंव्हा मनातून मला खूप राग यायचं पण काही करता यायचे नाही . बऱ्याच वेळा आलेला राग तसाच गिळले जायचे म्हणून कडची मी संयमी होऊ शकलो. शाळेत वेळेवर जाणे आणि दिलेले काम पूर्ण करणे या दोन चांगल्या बाबीच्या सवयी या शाळेतच घडले. म्हणूनच या माध्यमिक शाळेने मला घडविले असे मी आज ही मोठ्या अभिमानाने सांगू शकतो. आज ही या शाळेतील मला शिकविलेले माझे शिक्षक मला जेंव्हा भेटतात तेंव्हा माझी आस्थापूर्वक चौकशी करतात. माझ्या गावातील जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आणि धर्माबादची हुतात्मा पानसरे माध्यमिक शाळा यांना मी कधीच विसरू शकत नाही. शाळेच्या खूप आठवणी समोर येत आहेत मात्र त्यांना शब्दांत मांडणे होत नाही. ( माझ्या साऱ्याच गुरुजींनी मला घडविले. एका दोघाचे नामोंल्लेख करणे योग्य वाटत नाही. त्यामूळे नाव लिहिणे मुद्दाम टाळले आहे . धन्यवाद. )

- नासा येवतीकर
मु. येवती ता. धर्माबाद
📕📗🔴👜 🏃🏻🏃🏻🏃🏻🔴 📕📗🔴👜📕📗🔴👜 🏃🏻🏃🏻🏃🏻🔴 📕📗🔴

[3/13, 6:43 PM] ‪+91 83085 58995‬: माझी शाळा:

माझे वडिल सरकारी नोकरीत असल्याने आमच्या नेहमी बदल्या होत. त्यामुळे विंचवाचं बि-हाड पाठीवर या चालीवर माझ्या शाळा
भरपूर बदलल्या गेल्या

१) पहिली ...कोल्हापूर

२)दुसरी व  तिसरी...बदलापूर

३)चौथी ते सातवी ...नासिक

४)आठवी ...औंध, पुणे

५)नववी ते  अकरावी ...सोलापूर



१)   माझी पहिली कोल्हापूरला झाली. अजूनही मला ती शाळा
आठवते आति त्याबरोबर आमचा
आगाऊपणाही.

        आमचे एक शिक्षक पंतोजीटाईप होते .धोतर,कोट, आणि
मुंडासं. ते आम्हाला मोठ्या अक्षरात लिहायला सांगायचे आणि आम्ही
शाळेच्या भिंतीच्या दगडावर पेन्सिल घासून टोक करायचो आणि
पाटीच्या एकाच भागावर सगळे पाढे
बसवायचो. माझे अक्षर पहिल्यापासून सुवाच्य , छान असायचे, त्यामुळे त्यांना रागावताही येत नसे.

२) नंतर दुसरी तिसरी ठाणे जिल्ह्यात बदलापूर येथे झाली.
तिथे वेगळे लक्षात रहाणारे म्हणजे
सुतकताई आणि शेणानी वर्ग सारवायला लागायचे, तिथेच आम्हाला सहकाराचे धडे मिळाले.

३)नंतर चौथी ते सातवी नासिक
येथे म्युनिसिपल शाळेत झाले. त्या शाळेत माझा खरा सर्वांगिण विकास झाला. हस्ताक्षर चांगले असल्याने
फळ्यावर सुविचार लिहिणे, भारताचा नकाशा काढून त्यावर रोज वेगवेगळ्या बाबी दाखविणे
ही जबाबदारी माझी होती. आमच्या
वर्गशिक्षिका ...... म्हणून होत्या
त्यांची मुलं लहान ! त्यांना वह्या
तपासणं जमायचं नाही . ते काम माझ्यावर सोपवलं होतं . नंतरच्या वर्गात शिक्षिका.....मागच्या पानावरुन पुढे चालू. सातवीत तर मुख्यापिकांचही काम मी करायची

४) ८वी औंधला झाली

५)९वी ते ११ वी सोलापूरला सेवासदनमध्ये होते. मी पहिली कविता तिथे लिहिली आणि
आमच्या मुख्याध्यापकानी काचफलकात लावली नि वर्गावर्गात
वाचून दाखवली त्यामुळे प्रोत्साहन मिळालं . मँट्रिकला असताना  Humanitarian leage तर्फे मँट्रिकच्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रातील सर्व शाळांमधून दुसरा नंबर मिळाला. मला वाटते , माझ्या
साहित्यिक वाटचालीचा श्रीगणेशा
तिथे झाला.
   
        खरं तर शाळा हा माझा
खूप जिव्हाळ्याचा विषय!खूप लिहायचय. दिवसभर घरात पाहुणे असल्याने वेळ मिळाला नाही. पण
आपल्या या ग्रुपच्या कार्यक्रमात भाग घ्यायची इच्छा होती, म्हणून गडबडीत थोडं शेअर केलंय, धन्यवाद !
[3/13, 6:43 PM] ‪+91 83085 58995‬:
 सुनीता सुरेश महाबळ
📕📗🔴👜 🏃🏻🏃🏻🏃🏻🔴 📕📗🔴👜📕📗🔴👜 🏃🏻🏃🏻🏃🏻🔴 📕📗🔴

📕📗🔴👜 माझी शाळा👜🏃🏻🏃🏻🏃🏻🔴
""""""""""''''""""""""""""''"
आम्ही तिन भावंडं.
 वडील सैन्यात नोकरीवर मोठे वडील सरकारी शाळेत मास्तर.
     आजोबा ९० दीच्या घरात
आई माझी जेमतेम शिकलेली
पण शाळेत हुशार असल्याने
व तिला आई म्हणजे मला
आजी नसल्याने माझ्या आजोबांनी दुसरे लग्न केले.
आईच्या मामांनी तिला व माझ्या लहानग्या मामाला
आपल्या घरी वाढविण्यास
तथा संगोपणास घेऊन गेले
होते.
    माझ्या आईचे शिक्षण
तिथेच झाले.माझी आई
वर्गात नेहमी पहिली यायची.
पण पूर्वीची परिस्थिती व
आजोबांच्या अट्टाहासामुळे
आईला नोकरीवर असलेल्या
मुलाशी लग्न लावून द्यायचे
ठरल्या प्रमाणे माझ्या आजोबांनी माझ्या वडिलांची
निवड केली परंतु सैन्यात
असलेल्यांना पूर्वी मुलगी मिळत नसे पण आजोबांच्या
हट्टा पुढे आईच्या मामांनी
हो म्हटले सैन्यात नोकरी
म्हणजे जिवावर उदार होऊन
सैनिक लढत असत.
   माझ्या वडिलांनी १९६२,
भारत x चीन  युद्ध,
सन१९६५ भारत x पाक
सन १९७१ भारत x पाक
भारताने बांगला वेगळा केला
होता. माझे वडील शूर शिपाई
होते तिन्ही युद्धात भाग घेऊन
सीमेवर लढून यशस्वी चाकरी करीत देश सेवा करीत असत.
    ते सैन्यात आई मात्र आपल्या पिलांजवळ आम्ही
अगदी लहान असू तेव्हाच
आईच्या संसार वेगळा करून
देण्यात आला होता.मिळकत
बाबांची अगदी कमी.
महिना शंभर रुपये पगार.
   घरी मात्र वडील नियमित मनीऑर्डर पाठवित असत.
    खाणारे जीव चार त्यात
मामा घरात येणारे पाहुणे.
     पगाराला महिना कधीच
पुरत नसे.अशात बाबा एकदा
सुट्टीवर आले.म्हणाले आज
अनिल पाच वर्षांचा झाला.
    त्याला आता बालवाडीत
घातले पाहिजे मी आपला नाही म्हणालो.
मला अजून खूप खेळायचे
आहे व लहान आहे असे म्हणून रडू लागलो.
     काही वेळात विसरून
झोपी गेलो.दुसरा दिवस उजाडला आईने अंघोळ
घालून दिली मला कुठे जायचे
हे कळण्याच्या आतच बाबाही तयार झाले.
मला बोट पकड म्हणाले.
मी आपला फिरायला मिळते
म्हणून मोठ्या आनंदाने निघालो.
    गावातील चौकात खूप
मोठी जिल्हा परिषदेची शाळा
होती.सोबत बालवाडी जोडून असे.प्रत्येक वर्गाच्या चार-चार तुकड्या एक आजी
मुलांना शाळेत पोहोचवण्यासाठी घरी यायची. लवकरच शाळा आली.मी आपला नाही म्हणत
होतो मला नाही शाळेत जायचे.
    पण बाबांचा तोरा बघून
गप्प बसलो.हेड बाईंनी बालवाडीत नाव नोंदवून
घेतले.
     मी मात्र आता भोकाड
पसरणे सुरु केले होते.पण
माझी बाईंनी समजूत काढून
खाली बसविले.व माझ्या हातात एक मण्यांचे चौकोनी
आकाराचे छोटेसे खेळणे सोपवून दिले होते.बाबा आता
निघणार....!
    मी खेळण्यात गुंग झालो होतो लगेच माझ्या लक्षात आले कि ते मला सोडून निघून
जात आहेत ...पुन्हा मी रडू
लागलो.पण बाईंनी माझी समजूत काढली व थोड्याच
वेळात तुला या आजी घरी
सोडून देतील असे म्हणताच
मी गप्प झालो.पुढे काय झाले
मला काहीही आठवत नाही.
    काही दिवसात बाबा सेवेवर निघून गेले माझी बालवाडी मात्र आळीपाळीने
सुरु होती.कधी दांडी तर केव्हा शाळा.
    आई मला नेमाने डबा करून द्यायची.तिच्या हातचा
दूध भाकरीचा डबा किंवा ताक भाकरीचा डबा मला
अद्यापही खूप चांगला आठवतो डब्याची कडी
पकडून शाळेला जातो म्हणत
टाटा करायचो.
    घरा शेजारी मात्र एक सवंगडी होता जरा बिलंदर
पण स्वभावाने गरीब.
    सोबत जाणे-येणे सुरु
असायचे.
  गावाच्या मध्य भागी एक
शिवाचे "बेंबळेश्वर संस्थान"
होते समोर बेंबळा नदी वाहत
असे या मंदिराच्या सभोवती
दाट गर्द वडाची प्राचिन झाडे
होती पारंब्याना लटकणे खूप
आवडायचे या मंदिराचे वैशिष्ट्य असे कि पांडव काळात त्यांनी अगदी उथळ
नदी किनारी बांधले असून
मंदिरात पाण्याने भरलेली
चार मोठी कुंड होती .त्यातून
पाण्याचे पाट सतत वाहत असत मनोहारी दृश्य असल्याने तिथून कुणीच
आल्यानंतर लवकर निघत
नसे.
    सवंगड्या सोबत मंदिराच्या परिसरात माझे
शाळेला दांडी मारून रोज
वडाच्या पारंब्या खेळण्या
साठी जाऊ लागलो.आईला
वाटे माझा बाळ शाळेत गेला.
    मंदिर शाळेच्या पाठीमागूनच असल्याने शाळा
सुटली कि घरी जाणे सुरु झाले ...!
    वय वर्ष पाच काहीही समजत नसे.
     असेच भराभर दिवस निघून गेले. मी या सोबतच
आईच्या आजोळी म्हणजे
आईचे माहेर गावातच होते तिथे जाऊ लागलो. माझ्या
आईची आई म्हणजे माझी
आजी आईच्या बालपणीच
 हे जग सोडून गेली होती.
         मात्र आईची आजी
ठणठणीत होती ती मायाळू
पण होती. मला तिने तान्हा
असता पासून वाढविले होते.
    तिच्या कडेही मी ज्या वेळेला मंदिराकडे जात नसे
त्यावेळी मी आजी कडे दांड्या मारीत असे.
   आजीकडे बागायती शेती होती.
    सोबत बैलजोडी अन गाडीही होती.मग काय मज्जाच मज्जा मी आजी
सोबत शेतात बैलगाडीत जात असे.आजीने मला कधीही
शाळेविषयी विचारले नाही
त्यामुळे मला ती खूप आवडायची. गरम गरम जेवण वाढीत असे.
   मला तिच्या हातची भाकरी
देखिल गोड लागायची.
    आता मात्र माझ्या शाळेला दांड्या वाढतच होत्या.
   अचानक माझा मामा निरोप
घेऊन आला.अनिल तुझे बाबा
सुट्टीवर आले आहेत.तुला लवकर घरी बोलावले.
मी म्हणालो,"जा रे मामा,उगाच मस्करी करू नकोस."
मामा "अरे हो खरेच आले की....! तुला गळ्यात घालायला
साई बाबांचे लॉकेटही आणले
आहे."
   तरीही मला खरे वाटत नव्हते.पण बिचाऱ्याने माझी
कशीबशी समजूत काढली होती.मी सुद्धा मारायच्या
धाकाने चालू लागलो.माझे
वडील कडक शिस्तीचे असत
   बरेचदा ते सर्व भावंडांची
यथेच्छ धुलाई करून टाकायचे.मला चांगले ठाऊक
होते की आज आपल्याला
शाळा बुडविली म्हणून नक्की
मार मिळणार .
     मी मुकाटपणे घरचा रस्ता
धरला थोड्याच वेळात कळले
की बाबा खरोखर घरी आले
असून आता आपले काही खरे नाही.
    मामा व मी घरी पोहोचलो.
बाबांना बहुतेक आईने समजावले असावे.आज मात्र
माझी मार बसण्यापासून
सुटका झाली होती.
  आज मला या गोष्टी आठवल्या नंतर खूप हायसे
वाटते.
..........अनिल हिस्सल,
             बुलडाणा
📗📕📗📕📗📕📗📗📗📕📕📗📕📗📕📗📕📗📗📗📕📕