नागोराव सा. येवतीकर

Friday, 12 February 2016

 ‪+91 74989 64901‬:
🚩मराठी भाषा पंधरवडा🚩
📝 गझलची तोंड ओळख - भाग 15 📝
✒संकलन : डॉ. अमेय गोखले. ✒

💐💐💐💐💐💐💐💐💐

♻ आज काही निवडक , गाजलेल्या मराठी गझल देत आहे ♻


तरुण आहे रात्र अजुनी राजसा निजलास का रे ?
एवढ्यातच त्या कुशीवर तू असा वळलास का रे ?

अजुनही विझल्या न गगनी , तारकांच्या दीपमाला
अजुन मी विझले कुठे रे ? हाय ! तू विझलास का रे ?

सांग, ह्या कोजागरीच्या , चांदण्याला काय सांगू ?
उमलते अंगांग माझे.. आणि तू मिटलास का रे ?

बघ तुला पुसतोच आहे , पश्चिमेचा गार वारा
रातराणीच्या फुलांचा , गंध तू लुटलास का रे ?

उसळती हुदयात माझ्या , अमृताच्या धुंद लाटा
तू किनार्‍यासारखा पण , कोरडा उरलास का रे ?
                      (सुरेश भट)


मालवून टाक दीप , चेतवून अंग अंग
राजसा किती दिसात , लाभला निवांत संग

त्या तिथे फुलाफुलात , पेंगते अजून रात
हाय तू करू नकोस , एवढयात स्वप्नभंग

दूर दूर तारकांत , बैसली पहाट न्हात
सावकाश घे टिपून , एक एक रूपरंग

गार गार या हवेत , घेऊनी मला कवेत
मोकळे करुन टाक , एकवार अंतरंग

ते तुला कसे कळेल , कोण एकटे जळेल
सांग का कधी खरेच , एकटा जळे पतंग

काय हा तुझाच श्वास , दरवळे इथे सुवास
बोल रे हळू उठेल , चांदण्यावरी तरंग
                 (सुरेश भट)


आताच अमृताची बरसून रात गेली
आताच अंग माझे विझवून रात गेली

मजलाच, हाय, माझे जपता न भान आले
मजलाच ऐनवेळी उधळून रात गेली

उरले जराजरासे गगनात मंद तारे
हलकेच कूस माझी बदलून रात गेली

अजुनी सुगंध येई दुलईस मोगर्‍याचा..
गजरा कसा फुलांचा विसरून रात गेली ?
                 (सुरेश भट)


सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या , तुझेच मी गीत गात आहे
अजुन ही वाटते मला की , अजुन ही चांद रात आहे

कळे ना मी पाहते कुणाला , कळे ना हा चेहरा कुणाचा
पुन्हा पुन्हा भास होत आहे , तुझे हसू आरशात आहे

सख्या तुला भेटतील माझे , तुझ्या घरी सूर ओळखीचे
उभा तुझ्या अंगणी स्वरांचा , अबोल हा पारिजात आहे

उगीच स्वप्नांत सावल्यांची , कशास केलीस आर्जवे तू
दिलेस का प्रेम तू कुणाला , तुझ्याच जे अंतरात आहे
                           (सुरेश भट)


केव्हातरी पहाटे , उलटून रात गेली
मिटले चुकून डोळे , हरवून रात गेली

कळले मला न केव्हा , सुटली मिठी जराशी
कळले मला न केव्हा , निसटून रात गेली

सांगू तरी कसे मी , वय कोवळे उन्हाचे ?
उसवून श्वास माझा , फसवून रात गेली !

उरले उरात काही , आवाज चांदण्याचे..
आकाश तारकांचे , उचलून रात गेली !

स्मरल्या मला न तेव्हा , माझ्याच गीतपंक्ती
मग ओळ शेवटाची , सुचवून रात गेली !
                  (सुरेश भट)


रंगुनी रंगांत साऱ्या रंग माझा वेगळा!
गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा!

कोण जाणे कोठुनी ह्या सावल्या आल्या पुढे;
मी असा की लागती ह्या सावल्यांच्याही झळा!

राहती माझ्यासवे ही आसवे गीतांपरी;
हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा!

कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो
अन् कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा ?

सांगती 'तात्पर्य' माझे सारख्या खोट्या दिशा :
'चालणार पांगळा अन् पाहणारा आंधळा !'

माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी :
माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा !
                     (सुरेश भट)


डोळ्यांत सांजवेळी आणू नकोस पाणी
त्या दूरच्या दिव्यांना सांगू नको कहाणी

कामांत गुंतलेले असतील हात दोन्ही
तेव्हा नको म्हणू तू माझी उदास गाणी

वाटेवरी खुणेच्या शोधू नको फुले ती
ना ठेविते फुलांची माती इथे निशाणी

कळणार हाय नाही दुनिया तुला मला ही
मी पापण्यांत माझ्या ही झाकिली विराणी
                 (मंगेश पाडगावकर)


मलमली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे
मोकळ्या केसात माझ्या तू जीवाला गुंतवावे

लागुनि थंडी गुलाबी शिरशिरी यावी अशी ही
राजसा माझ्यात तू अन् मी तुझ्यामाजी भिनावे

तापल्या माझ्या तनूची तार झंकारुन जावी
रेशमी संगीत स्पर्शाचे पुन्हा तू पेटवावे

रे तुला बाहूत माझ्या रुपगंधा जाग यावी
मी तुला जागे करावे तू मला बिलगून जावे
                     (सुरेश भट)


भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले !
एवढे मी भोगिले की मज हसावे लागले !

ठेविले आजन्म डोळे आपुले मी कोरडे
पण दुज्यांच्या आसवांनी मज भिजावे लागले !

लोक भेटायास आले काढत्या पायांसवे
अन्‌ अखेरी कुशल माझे मज पुसावे लागले !

गवसला नाहीच मजला चेहरा माझा कधी
मी कशी होते मलाही आठवावे लागले !

एकदा केव्हातरी मी वचन कवितेला दिले;
राखरांगोळीस माझ्या गुणगुणावे लागले !
                   (सुरेश भट)
💐💐💐💐💐 🙏🙏🙏🙏💐💐💐💐
91 97650 01266‬
गजल

असा केलास तू पाठीत वार मित्रा,
कशी माझीच केली तू शिकार मित्रा...

असू दे गोडवा वाणीत थोडा-सा,
कशाला आणतो शब्दांस धार मित्रा...

कशाला खंत बाळगतोस हरण्याची,
अशी मानायची नसतेच हार मित्रा...

मनाला डागण्या देवून जग गेले,
अता हृदयी कसा झेलू प्रहार मित्रा ...

मित्रांनो, या जरा भेटून जा मजला,
असे रे, जिंदगीचे दिवस चार मित्रा...

तया दे आसरा ज्यांना गरज आहे,
तयांची कर मदत होवून यार मित्रा...

निर्मला सोनी.
💐💐💐💐💐 🙏🙏🙏🙏💐💐💐💐
91 97650 01266‬
दुनियेस असे हास म्हणाले,
घे मुक्त जरा श्वास म्हणाले ....

घाल गवसणी आकाशाला,
विजयाचा घे घास म्हणाले ...

होतील फुले दुःखाची ही,
जीवन आहे खास म्हणाले....

माझ्यावर जग हसले तेव्हा,
जगण्याला मी भास म्हणाले ....

सांग बिघडले गणित कुठे, जर,
प्रेमाला मी आस म्हणाले. ...

सुख-दुखांच्या फुगडयांना,
आयुष्याचा व्यास म्हणाले ...

जगण्याची तर बातच न्यारी,
मृत्यूला ही ध्यास म्हणाले ....

करणार क्षमा कोण मला, जर,
मी देवाला दास म्हणाले ....

निर्मला सोनी.
💐💐💐💐💐 🙏🙏🙏🙏💐💐💐💐
ना. सा. येवतीकर, नांदेड
दिल के आईने में मैने सौ बार झाँक के देखा
मगर तेरा चेहरा नजर नहीँ आया
जैसे ही मैने अपनी पुरानी किताब निकाली
उसमे तेरा वह प्यारा खत नजर आया - नासा
💐💐💐💐💐 🙏🙏🙏🙏💐💐💐💐
ओठात गजल वेड्या
फुकटात येत नाही
काळीज जाळल्यावर
मिळतात शब्द काही
नुसतीच टूम म्हणूनि
लिहितात कैक हौशी
कसदार मात्र गजला
लाखात फक्त कांही
 * प्राचार्य श्री .सतिष देवपूरकर सर
💐💐💐💐💐 🙏🙏🙏🙏💐💐💐💐
91 86002 06207‬
तुझ्या भल्या साठी रे बाळा,
बाप रानी वनी होता फिरला,
तरी ही ठेवलेस वृध्दाश्रमी,
कावा तुझा न कळला,

        सुरेश माळी......
💐💐💐💐💐 🙏🙏🙏🙏💐💐💐💐
91 97650 01266‬
गजल

केलास रे कशाला, पाठीत वार मित्रा,
माझी करून गेला, तू तर शिकार मित्रा...

बोलून गोड वाणी, जिंकून घे जगाला,
आणू नको कधी ही, शब्दांस धार मित्रा...

का वाटते कळेना, तुज खंत हारण्याची,
मानायची कशाला, जगण्यात हार मित्रा...

बघ डागण्या मनाला, देवून लोक गेले,
झेलू कसा कळेना, हृदयी प्रहार मित्रा ...

भेटून एकदा जा, दे धीर या मनाला,
असतात जिंदगीचे, हे दिवस चार मित्रा. ...

निर्मला सोनी.
💐💐💐💐💐 🙏🙏🙏🙏💐💐💐💐
91 99227 14065‬
एक शेर सहज
सरणावरुनी उठून आलो आयुष्या तू हाक दिल्यावर
येताना पण मृत्यूलाही कवाड उघडे ठेव म्हणालो
धनु.
💐💐💐💐💐 🙏🙏🙏🙏💐💐💐💐
91 90046 23534‬
 जिंदगीचे हेच गाणे गुणगुणत मी राहिलो
समिकरण या जीवनाचे सोडवत मी राहिलो

आजही वाटेवरी त्या हुंदका बोलत असे
दूर तू गेलीस अन का ये म्हणत मी राहिलो

कालच्या रात्रीस माझ्या रंग होता वेगळा
काकणा समवेत रात्री किणकिणत मी राहिलो

वादळाशी झुंझ केली मी पुन्हा डोळ्यातल्या
आसवे डोळ्यामधे मग थोपवत मी राहिलो

बदलला सारा जमाना काळ सुद्धा बदलला
बदल ना जातीत झाला पूर्ववत मी राहिलो

धर्म हिरवा धर्म भगवा धर्म मग झाला निळा
कोणता झेंडा नव्याने फड़कवत मी राहिलो

ओळखाया लागले बघ लोकही तुजला 'शशी'
माझिया नावा प्रमाणे चंद्रवत मी राहिलो
                         -शशिकांत कोळी(शशी)
💐💐💐💐💐 🙏🙏🙏🙏💐💐💐💐
91 90280 22322‬
नितीन देशमुख
कापूस हिरवा निळा झाला
कापूस भगवा पांढरा झाला
सार्या झेंड्यांचा कपडा
शेतातून आला

91 98907 99023‬
यात कांही गझला आहेत तर कांही कविता आहेत ज्या आनंदकंद वृत्तात आहेत.
१)ओठात हाक येते -- स्वानंद गीत गाता
येणार नाथ आता -- येणार नाथ आता
गायिका आशा भोसले
२)स्वप्नातल्या कळ्यांनो -- उमलू नकाच केंव्हा
गोडी अपूर्णतेची -- लावील वेड जीवा
गायिका आशा भोसले
३)त्या सावळ्या तनूचे -- जडले मला पिसे गं
न कळे मनास आता -- त्या आवरू कसे गं
गायिका माणिक वर्मा
४)जेंव्हा तुझ्या बटांना -- उधळी मुजोर वारा
माझा न राहिलो मी -- हरवून हा किनारा
गायक सुरेश वाडकर
५)चल ऊठ रे मुकुंदा -- झाली पहाट झाली
बाहेर चांदण्यांना -- हलकेच जाग आली
गायिका सुमन कल्याणपूर
मी प्रत्येक मिसर्‍यात डॅश दिला आहे सर्वांना पूर्वार्ध आणि उत्तरार्ध कळावा खणून.  वाचक मायबाप म्हणतील की मी सारी जुनीच गाणी दिली आहेत. पण आजकालच्या मुक्त छंद आणि चारोळ्याच्या जमान्यात वृत्तात कोण लिहितो? अजून एक. गाणी ऐकताना किंवा आठवताना मात्रा आणि लगावली जाणण्याचा छंद लागावयास हवा आता. तुम्ही  सर्वजण आठवून बघा; या वृत्तात अजून कांही गाणी आहेत क? असल्यास समूहावर जरूर पोस्ट करा.
आता शेवटी मी माझी एक गझल याच वृत्तातील खाली देतो. लक्ष देऊन वाचा.
बरसात भोवताली

सुकल्याच आसवांची बरसात भोवताली
समजावतो मनाला "मी मस्त भाग्यशाली"

मी धुंद फुंद जगलो हिरवळ, वसंत नसुनी
ऋतुराजची हरवली गर्विष्ठ मस्तवाली

मुर्दाड लोक असता क्रांती कशी घडावी?
गेले कुठे निखारे? विझल्या कशा मशाली?

रेंगाळलेत खटले, न्यायालयांस सांगा
प्रतिमाह वाद इतके, काढायचे निकाली

बाळास खुष कराया, खोटीच फोनवरती
दु:खी, तरी कळवतो नसतेच जी खुशाली

पाहून अंधश्रध्दा, सारे तुझे पुजारी
नावे तुझ्याच देवा! करतात रे दलाली

जातात वाममार्गे श्रीमंत ते यशस्वी
करतात सत्त्यवादी आयुष्यभर हमाली

रुजतेय संस्कृती का लोकात मुखवट्यांची?
सभ्यात, प्रश्न पडतो, दडलेत का मवाली?
💐💐💐💐💐 🙏🙏🙏🙏💐💐💐💐
+44 7584 120268‬
पलटून नजर तेव्हा तू हासली वगैरे
अलवार स्पंद माझे तू स्पर्शली वगैरे
- राहुल गडेकर

 आली बरीच वळणे मार्गात त्या पुढेही
माझीच वाट पाहत तू भासली वगैरे...
- राहुल गडेकर

क्षणभर स्मृतीत आता मी पूर्ण व्यापलेलो
घेऊन आठवांना तू दाटली वगैरे .....
- राहुल गडेकर
💐💐💐💐💐 🙏🙏🙏🙏💐💐💐💐
91 99301 74010‬
हातात हात माझ्या श्वासात श्वास दे ना
राहिल श्वास जोवर जगण्यास आस दे ना.
आनंदकंद वृत्त =
गालगा गाल गागा  गालगा गाल गागा
=तनुजा ढेरे
💐💐💐💐💐 🙏🙏🙏🙏💐💐💐💐
91 97631 16493‬
ही बात का मनाला लावून रात गेली
राञभर काळजाला चावून रात गेली

सांगुन दु:ख लोका होईल का कमी ते
दावून  आस थोडी धावून रात गेली

तोडून बंधनेही बाधूनी सर्व नाते
बाकीच यातनाह्या लावून रात गेली

व्याकुळ या मनाला वाटूनी आज गेले
साऱ्याच भावनाला खावून रात गेली

वंदुन मानवाला मिळणार काय येथे
सारे जणु अधाशी पावून रात गेली
💐💐💐💐💐 🙏🙏🙏🙏💐💐💐💐
+44 7584 120268‬
माझी तृषा मलाही कळली कधीच नाही..
आलो मधुर झर्याशी अन् मन अशांत झाले..
- राहुल गडेकर
💐💐💐💐💐 🙏🙏🙏🙏💐💐💐💐
91 99301 74010‬
हातात हात माझ्या श्वासात श्वास दे ना
राहील श्वास जोवर जगण्यास आस दे ना...
💐💐💐💐💐 🙏🙏🙏🙏💐💐💐💐
91 98337 79457‬
वृत्त-आनंदकंद
लगावली
गागाल गालगागा गागाल गालगागा

अंधार किर्र सारा, भरला नभात आहे.
अन् झुंड काजव्यांची,चमकून जात आहे.

निष्पर्ण साग झाले, उरल्यात फक्त काड्या
अन त्यात बाभळीही,हसते वनात आहे.

हा मोगरा फुलोनी ,हसतो उगीच वेडा
जास्वंद लाल रंगी लाजून जात आहे

आल्यात मंजिऱ्या अन् ,ही तुळस डोलताहे
आले सुमन अळूला, ही खास बात आहे.

जाते तुझ्या घराशी,थांबून वाट माझी
अन् सुप्त वेदनेचा, लाव्हा मनात आहे.

#उर्मिला  बांदिवडेकर
💐💐💐💐💐 🙏🙏🙏🙏💐💐💐💐
91 97650 01266‬
गजल

गागाल गालगागा गागाल गालगागा

मागू कशास गगना, तुज सूर्य चंद्र तारे,
आहे कवेत माझ्या, ब्रम्हांड आज सारे. ...

दुनिया मुठीत ज्यांच्या, नभ ठेंगणे तयाला,
यश जीवनात त्यांच्या, जे चालती निखारे ....

गेला कुठे बळी हा, सोडून या जगाला,
त्याच्या विना बघा तर, ओसाड ही शिवारे ....

दे साथ तू तयांना, नाही कुणीच ज्यांना,
तू हास्य दरवळू दे, हसतील मग बिचारे...

हरणेच शक्य नाही, उत्तुंग ध्येय माझे,
यश दूर जरी हे, पण दूर ना किनारे...

निर्मला सोनी
💐💐💐💐💐 🙏🙏🙏🙏💐💐💐💐
91 98337 79457‬
वृत्त-आनंदकंद
लगावली
गागाल गालगागा गागाल गालगागा

अंधार किर्र सारा, भरला नभात आहे.
अन् झुंड काजव्यांचा चमकून जात आहे.

निष्पर्ण साग झाले, उरल्यात फक्त काड्या
बाभूळ त्यात वेडी,हसते वनात आहे.

हा मोगरा फुलोनी ,हसतो उगीच वेडा
जास्वंद लाल रंगी लाजून जात आहे

आल्यात मंजिऱ्या अन् ,ही तुळस डोलताहे
आले सुमन अळूला, ही खास बात आहे.

जाते तुझ्या घराशी,थांबून वाट माझी
अन् सुप्त वेदनेचा, लाव्हा मनात आहे.

#उर्मिला  बांदिवडेकर
💐💐💐💐💐 🙏🙏🙏🙏💐💐💐💐
+44 7584 120268‬
नव्हते चितारले मी, हे विस्कळीत जगणे..
जी आस काळजाला, ती कास शुष्क निघणे..
- राहुल गडेकर
💐💐💐💐💐 🙏🙏🙏🙏💐💐💐💐
91 99222 36870‬
वृत्त - आनंदकंद
लगावली- गागाल गालगागा गागाल गालगागा

स्वप्नातल्या परी तू साक्षात भेट द्यावी
तुजला मिठीत घेता  धुंदी मला चढावी

हातात हात माझ्या अाजन्म तू मिळू दे
नीती अनीतिची चिंता आज का पडावी
        -- दिलीप
💐💐💐💐💐 🙏🙏🙏🙏💐💐💐💐
------------जरासे--------------
•••••••••••••••••••••••••••••••
मी होता पाठमोरा ते हासले जरासे
अन वैरी समान ते भांडले जरासे

सुखाच्या मंडपात होतो आम्हीच सारे
ओंजळ सावरता मी ते सांडले जरासे

नात्यात माणसांनी केलेत कैक वार
सोसून वेदना ती मी मांडले जरासे

खोट्याच पध्दती ने ते जिंकले सदैव
खर्यास शिक्षा न खोटे कोंडले जरासे

आईस गाठतो मृत्यू  भेटला न तेव्हा
 प्रेतास देता खांदा  अश्रू सांडले जरासे
•••••••••••••••••••••••••••••••••
-------ज्ञानेश्वर भामरे
    7249590174
💐💐💐💐💐 🙏🙏🙏🙏💐💐💐💐
91 80973 18985‬
प्रतिभाशाली शायर निदा फाजली साब को भावपुर्ण श्रध्दांजली....

उनकी यादमे उनके ही चंद नग्मे....
सरफरोश
---------------
होशवालो को खबर क्या
बेखुदी क्यी चीज है
इश्क किजे फिर समझीये
आशिकी क्या चीज है |
----------------------------------------
सुर
---------
आभी जा आभी जा
ये सुबहा आभी जा
रात को कर विदा
दिलरुबा आभी जा
************
~निदा फाजली.

 बच्चा बोला देखकर मस्जिद आलिशान
एक अकेले अल्लाह को इतना बडा मकान
- निदा फाजली.
💐💐💐💐💐 🙏🙏🙏🙏💐💐💐💐
91 94044 64814‬
🙏अर्पण दोन ओळी🙏
अंतरीचा ध्यास माझा गझलनामा
स्पंदनाचा श्वास माझा गझलनामा
सारिका बकवाड
💐💐💐💐💐 🙏🙏🙏🙏💐💐💐💐
91 88057 76222‬
आता उनाड शब्द वळावयास लागले !
..सारे लबाड अर्थ कळावयास लागले !

केले न मी उगीच गुन्हेगार सोबती
आरोप आपसूक टळायास लागले !

आली पुन्हा मनात नको तीच चिंतने ..
काही मवाळ चंद्र ढळायास लागले !

घायाळ मी असून रणी खूप झुंजलो
ज्यांना न घाव तेच पळायास लागले !

माझ्या मिठीत सांग मला पाप कोणते ?
हे चांदणे व्यर्थ चळायास लागले !

माझ्याच झोपडीस कुठे आग लागली ?
सारे गरीब गाव जळाव्यास लागले !

केलास हा सवाल नवा तू कसा मला ?
आता जुने सवाल छळायास लागले !

कोणी नभात सूर्य विकायास काढला ?
येथे प्रसन्न ऊंन्ह मळायास लागले !

आणू तरी कुठून रडायास आसवे ?
डोळ्यामधून रक्त गळायास लागले !

जात्यात गात गात उडी मीच घेतली …
आयुष्य सावकाश दळावयास लागले

– सुरेश भट
💐💐💐💐💐 🙏🙏🙏🙏💐💐💐💐
91 97650 01266‬
 गजल
आहे अशक्य माझे, जगणे तुझ्या विना,
नाही कठीण आता,  मरणे तुझ्याविना....

ही ताटवे फुलांची, झाली उदास का,?
बघ विसरली फुले ही, हसणे तुझ्याविना....

हा चंद्र पौर्णिमेचा, बघ जाळतो मला,
नाहीच शक्य त्याला, दिसणे तुझ्याविना....

जावू नको कुठे ही, आहे शपथ तुला,
ना मान्य या मनाला, जळणे तुझ्याविना...

घेवून कोण आले, या चांदण्या नभी,
नाही कबूल त्यांना, सजणे तुझ्याविना...

निर्मला सोनी.
💐💐💐💐💐 🙏🙏🙏🙏💐💐💐💐
91 88057 76222‬
"मला कधी प्रेम झाले नाही "

मला कधी प्रेम झाले नाही
मी केले पण तिन्हे नाही

हाेती न हाेती जीवनात अावतरली
पण कधी नडलाे नाही
लाली गुलाबी लाली ती अाेठावरली पाहूनी प्रेमात  पडलो नाही

पाहिल्या अति सूंदर कळी गुलाबाची
पण मन कधी व्याकुळ झाले नाही
असा मनी जीवनाची पण हट्ट कधी धरला नाही

 अपेक्षा स्नेहात स्नेह बंधनाची
धुंदीत बेधुंद, सुगंध पण गंध चढला नाही
स्वप्न फक्त जीवनाचे याैवंनाचे कधी पाहीले नाही।

कवि  संदीप राठाेड
8805776222
💐💐💐💐💐 🙏🙏🙏🙏💐💐💐💐
91 72495 90174‬
पहाटेच्या वेळी धुंद
धुक्याने भरलेली वाट
अरे मी  तूझ्या नादात
चुकलीनं घराची वाट
---ज्ञानेश्वर भामरे

 पारीजात कळतो
पण मी कळत नाही
अगं पारीजातही काही
उगीच रडत नाही
------ज्ञानेश्वर भामरे

 धरावा असा
पदर नाही
खर्या प्रेमाची
कदर नाही
----ज्ञानेश्वर भामरे

 पहाटे प्रिये येते
पक्षांनाही जाग
अन तू सांगते
जरा प्रेमाने वाग
----ज्ञानेश्वर भामरे

 पैशांवर हल्ली
 प्रेम मिळतयं
कुत्र खातयं पिठ
अन आंधळ दळतयं
----ज्ञानेश्वर भामरे
💐💐💐💐💐 🙏🙏🙏🙏💐💐💐💐
+91 98234 90680‬:
गझल

देवा पसंत मजला वैकुंठगाव नाही
आई समान तुझिया डोळयात भाव नाही

यावे तथागताच्या छायेत आसवांनी
पारात पिंपळाच्या तो भेदभाव नाही

संपावरी निघाल्या सा-याच चांदण्या त्या
मंजूर या नभाचा त्यांना लिलाव नाही

करण्या शिकार माझी वाघास बोलवा रे
कुत्र्यास फाडण्याचा माझा स्वभाव नाही

प्रज्ञा नि शील करुणा संजीवनी जगाची
मायेस जिंकणारा कुठलाच डाव नाही

       विजय वडवेराव
💐💐💐💐💐 🙏🙏🙏🙏💐💐💐💐

🔶साहित्य मंथन 🔶
🎶आयोजित काव्य मंथन 🎶
⚪ चारोळी स्पर्धा ⚪
भाग:: 22::
🇮🇳 विषय :- शहिद जवान 🇮🇳
🔆सहभागी🔆

१) रामराव  जाधव काका
२) अरविंदजी कुलकर्णी. ..
३) ज्ञानेश्वर भामरे
४) डाॅ सुधीर काटे
५) नागोराव सा.येवतीकर
६) उत्कर्षजी देवणीकर
७) क्रांती बुद्धेवार
८) गजानन पवार
९) आप्पासाहेब सुरवसे
१०) सुलभा कुलकर्णी
११) जागृती निखारे
१२) निर्मला सोनी
१३) संगीता देशमुख
१४) प्रा.सौ.संगीता भालसिंग
१५) जयश्री पाटील
१६) डाॅ.शरयू शहा
१७) सुनील बेन्डे
१८) अंजना कर्णिक
१९) सौ सुरेखा जाधव
२०) कुंदा पित्रे
२१) संजय पाटील
२२) हरिश्चंद्र भोईर शहापूर ठाणे
२३) अनिल हिस्सल
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
     🇮🇳जय हिंद🇮🇳


📚📚साहित्य मंथन📚📚
!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
                  द्वारा आयोजित
*************************
🎹🎼काव्य मंथन🎼🎹
*************************
🏆🎓चारोळी स्पर्धा🏆🎓
"""""""""""""""""""""""""""""""""""""
 📢 भाग ::::::22::::::::📢
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
🇮🇳विषय :-शहीद वीर जवान🇮🇳
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
संकल्पना :-श्री अरविंद जी कुलकर्णी सर
--------------------------------------
संयोजक  आणि परीक्षक
श्री.आप्पासाहेब सुरवसे सर
==================
देशाच्या रक्षणासाठी तत्पर,
जवान राहतात उभे सीमेवर!
कैकदा बेतते त्यांचे प्राणावर,
शहिद विर जवान  रहे अमर!

              रामराव जाधव.
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
लान्स नायक हनुमंताप्पा
झाला विर जवान ।
साहित्यमंथन ची श्रद्धांजली
सार्या देशाला तुझा अभिमान
     📝📝📝📝
@ अरविंद कुलकर्णी
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
----- स्पर्धेसाठी चारोळी-----
•••••••••••••••••••••••••••••••
देशासाठी शहिद
होती विर जवान
 म्हणून आहे आजही
मेरा भारत महान

✏✒----ज्ञानेश्वर भामरे
7249590174
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
शहीद झाला देशासाठी,
जवान तो शूरवीर.
पायघड्या तूज मम शरिराच्या,
शिर साष्टांग नमस्कार.
        ✏✒✏
डॉ.सुधीर अनंत काटे,पुणे.
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
देशासाठी लढतो
माझा वीर जवान
म्हणूनच सुरक्षित
आपले सर्वांचे प्राण
✏✒
- नागोराव सा. येवतीकर
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
मृत्युचा या गाढ छायेत,
विसावलाया शहिद विर..
संघर्ष त्याचा वर्णण्यासी,
होतात पहा शब्द ही अधिर...
             ✏✒✏
       @ उत्कर्ष देवणीकर

👆स्पर्धेसाठी नाही
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
      -शहीद वीर जवान -

मागे न हटणार आम्ही जवान कधीही,
होऊ हजार वेळा कुर्बान,
एकच प्रार्थना तुम्हा वीर भारतियांना,
करा आमच्या कुटुंबांचा सन्मान.
          ✒✏✒
     @ क्रांती बुद्धेवार
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
शहीद वीर जवान

प्राणाची बाजी लागताना
मरणालाही लज्जा वाटली !
वीर पुत्राला निरोप देताना,
भूमाता धरणी हळहळली !!

  ✏✒____ गजानन पवार
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
------कुर्बानी-----

शहिद विर जवान
लढती देशासाठी
मातृभूमी चे रक्षण
प्राणाने करण्यासाठी

हि मातृभू तयांना
असे प्राणाहून थोर
तिला रक्षण्यासाठी
करती युध्द घनघोर

लावती जिवाची बाजी
छातीत झेलती वार
मेलो तरी बेहत्तर
ना घेती कधी माघार

 तिरंगा फडकत राहो
ध्येय एकच हे मनात
या तिरंग्या साठी
 कुर्बानी किती देतात

-----ज्ञानेश्वर भामरे
    7249590174
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
📚साहित्य मंथन📚

                  द्वारा आयोजित

🎤काव्य मंथन🎤

🇮🇳शहीद वीर जवान🇮🇳

हनुमंतअप्पा झाले शहीद
हाच खरा प्रखर राष्ट्रवाद !
मग कशाला हवा तरुणांनो
इसिसचा बेगडी जिहाद ?

      ✒🎯🎯🎯✏
श्री. आप्पासाहेब सुरवसे
     AMKSLWOMIW
(नॉट फॉर कॉम्पिटेशन)
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
⚪चारोळी स्पधाॅ⚪
विषय :शहीद वीर जवान
जिंकू किंवा मरू या वचनाने
बांधले धागे देशरक्षणाच्या कतॅव्याने
निसगॅ नियमाला डावलले नि:शब्दतेने
मृत्यूला कवटाळले वीर जवान हनुमंताने.
   ✏___सुलभा कुलकणीॅ.बोरीवली.
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
परकियांची असहिष्णूता,
सियाचीनची प्रतिकूलता
जवान मनांची अनुकूलता,
देशसेवेची मानसिकता
 मह्नमंगला मातृभूमीचा,तूच सन्मानदाता
तूच आम्हा जनतेचा, आहे खरा रक्षणदाता.
*******
✏© जागृती सुधीर निखारे.
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
तुझ्या कर्तृत्वाने दरवळला भारत,
तुझ्या जाण्याने हळहळला भारत,
सलाम तुला वीर जवाना, हनमंता,
या बलिदानाने कळवळला भारत ....

निर्मला सोनी.
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
सलाम तुजे मेरे हनमंत
सोडुन तू गेलास आमची संगत
पूर्ण भारत तुझीय पुढे नतमस्तक
✏___ हुसेन शेख सर
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
 आप्पासाहेब सुरवसे: 📚साहित्य मंथन📚

                 द्वारा आयोजित

🎌   काव्य मंथन    🎌

🇮🇳  शहीद वीर जवान  🇮🇳


पांघरुनी बर्फाची चादर
झाला शहीद हिमवीर
सियाचीनची रक्षुणी सीमा
रोशन होई गांव ते बेटादूर

श्री.आप्पासाहेब सुरवसे
        लाखनगांवकर
    ✒🎯🎯🎯✏
  AMKSLWOMIW
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🙏🏻चारोळी स्पर्धा 🙏🏻
🇮🇳वीर जवान 🇮🇳

"रक्षिण्या देशार्थ,
केलास जन्म सार्थ.
वीर जवान शोभलास,
जावो न बलिदान व्यर्थ"

✏-संगीता देशमुख,वसमत
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🌷 साहित्य मंथन समूह 🌷
चारोळी स्पर्धा
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

1
मरावे परि, कीर्तिरूपी उरावे
शूरवीराने उक्ति केली सार्थ
शुभ्र हिमावर रक्त सांडले
बलिदान न होणार कधी व्यर्थ

2
हिमगिरीच्या वीर हनुमंता
भारतभूला दिलेस बलिदान
आन बन शान दावुनीया
राखलेस या मातीशी ईमान

3
भारतमाता रडू लागली
पाहून तुझे बलिदान
ये परतून जन्माला
तुला भारतमातेची

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
✏.....प्रा. सौ.संगिता भालसिंग
अहमदनर
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
 **आजची चारोळी**

"हनमंतप्पा शहीद होवून 😔
स्वर्गात पोहोचलाच असाल
 शेतकरीबांधवासाठी देवाकडे
पावसाचं साकडं घालाल? "
✏............जयश्री पाटील
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

🌿 आजची चारोळी🌿
         🍂स्पर्धा🍂

वीर जवान तो भारतभू प्रेमी
स्व देशाचा अति अभिमानी
अर्पिते भावपूर्ण श्रध्दांजली
अमुच्या ओलावल्या नेत्रांनी
                 ✏__ डाॅ. शरयू शहा
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🍁 चारोळी - स्पर्धा 🍁

देशास्तव ज्यांचे बलिदान
असे कितीक शहीद जवान।
कुटुंबियांना करून मदत
राखावा बलिदानाचा मान ॥
                  ✏___डाॅ.शरयू शहा

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
 👣साहित्यमन्थन चारोळी स्पर्धा करिता
👣
देशासाठी  शहीद झाले
हनुमन्त अप्पा  वीर ठरले
इतरासाठी प्रेरणा दायी
स्मरणमाञ फक्त उरले
      ✏__ सुनील बेन्डे
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
देशा साठी शहिद झले हन्मन्त  आप्पा
सियाचीन मधे पहरा देने
नही केवळ गप्पा
जवें tiynchiya वव्न्शा
तेव्हा कळे जय हिंद
✏✒
हुसेन शेख
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🔶 चारोळी स्पर्धा:🔶
ऊन्मत्त कोसळती हिमकडे
गाडती पायी वीर जवान झुंजूनी मृत्युशी जो लढे
त्या शहिदाचे धैर्य महान
✏___अंजना कर्णिक
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🔶चारोळी स्पर्धा🔶
  निधड्या  देहाची धडपड
वीर शहीद असा झुंजला
सियाचीनच्या शिखरांवर
हनुमंतप्पा अमर जाहला।
✏___अंजना कर्णिक
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

 सिमेवर रक्षण करण्या
ठेविली कठोर देशभक्ती
हे विर जवान हनुमंथप्पा
 तू होता मातृभूची शक्ती
✏----ज्ञानेश्वर भामरे
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
 🔶साहित्य मंथन
चारोळी स्पर्धा🔶

शहीद झाला देशासाठी हनुमंत्ताप्पा
वीर लढला देशासाठी हनुमंत्ताप्पा
जवान इतिहासामधी अजरामर  हनुमंत्ताप्पा
आदरांजली तुला आमची हनुमंत्ताप्पा
✏___उर्मिला  बांदिवडेकर
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🔶चारोळी स्पर्धा 🔶
माती विश्वातली
अमोल तिची महती
शुरवीर जन्मले येथे
अमर रहे गीत सर्व गाती
✏________ गजानन पवार
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
अमर रहे देऊनी नारा,
अखेरचा सलाम हनुमंता वीरा
साक्षी ठेवूनी सियाचीनचा नारा
वचनी गुंतला भारत देश सारा.
जय हिंद. अमर जवान.
✏___ सुलभा कुलकर्णी
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

भारतमाते साठी मरनाशी
वीराने कड़वी झुंज दिली
मरणाला ही कीव ना आली
प्राणजोत शहिदाची मालवली
✏____सौ सुरेखा जाधव
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

जवानांचे दुःख न कळे
नागरी जीवनी जनतेला
सियाचीनला हनुमंता मिळे
नतमस्तक लवले शौर्याला
✏______कुंदा पित्रे
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🔶चारोळी स्पर्धा 🔶

मातृभूमी रक्षाया शहीद होता वीर जवानहो,
नतमस्तक होउनी वंदितो तुम्हास, तुमच्या कर्तुत्वास |
उणे अंशाचा विचारही न स्पर्शे तुमच्या मनासहो,
मातृभूमी रक्षायाचा तुमच्या ठायी असे एकच ध्यास ||

✏_____संजय पाटील

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

देशासाठी लढता लढता,
तमा नसते वीरांना,                 मनोमनी वंदन करितो
हनुमंत अप्पा जैशा नरवीरांना!!!!

✏______हरिश्चंद्र भोईर,शहापूर,ठाणे
09226435827
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

विरभूमी पुत्र हणमंतप्पा
भारत भू केले रक्षण तुम्ही
केली देशसेवा निस्वार्थ
अश्रुंनी दाटली भारतभूमी
✏............ अनिल हिस्सल
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
'' शुरवीर जवान हणमंतप्पा
शहिद झाला भारत भू वरी
सोडून गेला इहलोक अधांतरी
गहिवरूनी आले भारत मातेसही.''
✏......... अनिल हिस्सल.
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
संकलन::--
श्री.गजानन पवार पाटील सर
    वरूडदेवी ,हिंगोली
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

Sunday, 7 February 2016

पाऊलवाट च्या जोरदार स्वागतानंतर 
मी घेऊन येत आहे " संवेदना - मनामनातील " 
या विषयी माझा लेखसंग्रह खालीलप्रमाणे 

1) शेतकऱ्यांना जगवायचे असेल तर . . !
2) नोंदणीचे महत्व
3) जागरूक पालकच खरे मालक
4)शिक्षक विद्यार्थी नाते घडते बिघडते
5) व्यसनी शिक्षकावर करडी नजर
6) मोबाईल क्रांती आणि जीवन
7) दुष्काळ उठला शेतकऱ्यांच्या मुळावर
8) रुपयाला अच्छे दिन येतील काय
9) दारूबंदी महत्वाचे की दारूमुक्ती
10) शिक्षकाच्या हातात खडु द्या
11) युवकांच्या चांगल्या सवयी
12) मुलींच्या शिक्षणात शासनाची भूमिका
13) अनाठायी खर्च टाळू या
14) गावाला शाळेचा अभिमान असावा
15) पूरक वाचनाचा एक तास
16) शाळेची वेळ वाढविल्याने गुणवत्ता वाढेल ?
17) मोबाईल महत्वाचे की शौचालय
18) जीवनात हसण्याचे महत्व
19) मी भारतीय आहे
20) मुख्याध्यापक खास तर शाळेचा विकास
21) छडी लागे (ना) छम छम
22) बालविवाह रोखण्यासाठी जनजागृती आवश्यक
23) महिलांच्या प्रगतीत पुरुषांची भूमिका
24) टी व्ही न पाहण्याचा संकल्प
25) जीवनात वाचनाचे महत्व
26) जनतेचा आधार
27) अभ्यासाशिवाय पर्याय नाही
28) शाळा व्यवस्थापन समितीची यशस्वीता
29) तस्मै श्री गुरवे नमः
30) तंबाखूमुक्त जीवन जगता येईल ?
31) श्रध्दा आणि अंधश्रद्धा
32) स्त्री जन्माचे स्वागत करू या
33) अप्रगत मुलांची प्रगती होईल ?
34) जीवनातील अनमोल मित्र
35) देशासाठी माझे योगदान काय ?
36) पर्यावरण आणि मानवी जीवन
37) माझे गुरु : एक आठवण
38) जिंदगी का नाम दोस्ती
39) पितृदेवो भव किंवा वडिलांची सजग भूमिका
40) जेथे मनाई तेथेच घाई
41) परिपाठातून संस्कार
42) प्राथमिक शिक्षणाची स्थिती सुधारण्यासाठी
43) शून्य टक्के निकाल का लागतो ?
44) शाळेचा पहीला दिवस
45) शाळेतून हद्दपार करावी जातीभेदपणा
46) मुलां-मुलींत अंतर कशासाठी ?
47) बेरोजगार तरुणांचा देश
48) बालिका वधू कशी थांबेल ?
49) यशस्वी जीवनात शिस्तीचे महत्व
50) मोबाईल क्रांती
51) स्वयंशिस्त हाच प्रभावी उपाय
52) मोबाईलचा अति वापर टाळावे
53) आधुनिक तंत्रज्ञानाचा विपरित परिणाम
54) आई म्हणजे संस्काराचे माहेरघर
55) बालविवाह थांबविण्याचे उपाय
56) गोष्ट लहान पण काम महान
57) जगाला प्रेम अर्पावे
58) मोफत जमान्यातील मोफत वाचक
59) शालेय पोषण आहार योजनेचा इतिहास
60) सर, मला गणवेष द्या ना . . !
- नागोराव सा. येवतीकर